आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, ३० डिसेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, December 30, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - नोकरीत वरिष्ठांची मर्जी सांभाळू शकाल व्यवसायिक जुनी येणी वसूल होतील जमीन विषयक व्यवहार गतीमान होतील. आर्थिक लाभ होतील.

वृषभ - जमीन विकणे घेणे अशा व्यवहारात लाभ संभवतो. नोकरीत बदलाची सत्यता सौंदर्यप्रसाधने व्यवसायात प्रगती करू शकाल. कौटुंबिक सुख मिळेल.

मिथुन - हितशत्रूंच्या कारवाया वाढू शकतात राजकारणात विरोधकांच्या कारवाया काबूत ठेवण्यासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता. इच्छा आकांक्षांची पूर्ती होण्याचे योग.

कर्क - प्रकृतीस्वास्थ्य जपा. खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. पाठदुखीचा त्रास संभवतो. स्वभावात चिडखोरपणा डोकावेल. शांत रहा.आप्तेष्टांच्या गाठी भेटी होतील.

सिंह - वाहन तसेच वास्तु योग. सरकारी नियमांचे पालन आवश्यक एखाद्या समारंभाचे आयोजन संभवते राजकीय क्षेत्रातील मंडळींना हा दिवस उत्तम संधी देईल.

कन्या - आपल्या बोलण्यापेक्षा कृती वरती भर देणे जास्ती गरजेचे ठरेल. आपल्या कामाचा ज्ञानामध्ये अद्ययावत रहा धार्मिक कार्यात सहभागी व्हाल प्रकृतीची व खाण्यापिण्याची पथ्ये पाळा.

तुळ - बौद्धिक क्षेत्राला वाव मिळेल अनावश्यक खर्च टाळा स्थावर बाबतीतील योग संभवतो. कौटुंबिक सुख मिळेल प्रगती करण्याच्या संधी प्राप्त होतील.

वृश्चिक - राहत्या घराचे प्रश्न सुटतील. घरातील सुख सुविधांवर खर्च करा. नूतनीकरण, सुशोभीकरण यासाठी खर्च कराल. पैशाची आवक चांगली राहील.

धनु - अविवाहितांचे प्रश्न सुटण्यास मदत होईल योग्य निर्णय घेतले जातील. कुटुंबातील ज्येष्ठांच्या चिंता मिळतील. डोळा व कानाच्या दुखण्या पासून सावध राहा.

मकर - मित्रमंडळी कुटुंबीयांसमवेत बाहेर जाण्याचा बेत निश्चित होईल कोणत्याही प्रकारचे चुकीची व बेकायदेशीर कामे करू नयेत तसेच कुसंगती पासूनही दूर राहा.

कुंभ - सरकारी नोकरीत दिलासा मिळेल प्रवासाचे योग येतील तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य संधी मिळेल नावलौकिकात भर पडेल . स्नायू दुखीचा त्रास संभवतो.

मीन - रोजच्या कामात व्यस्त राहाल. घरगुती कामांची जबाबदारी वाढेल. नोकरीत सहकाऱ्यांचे सहकार्य लाभू शकते. महत्त्वाचे काम झाल्यामुळे दिलासा मिळेल.

BMC Election 2026 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर ; एकूण ९४ शिलेदार निवडणुकीच्या रिंगणात, वाचा सर्व उमेदवारांची नावे

BMC Election 2026 : शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार ठरले; कोणत्या प्रभागात कोणाला संधी?

आधी लाथा-बुक्क्या, आता जादू की झप्पी; व्हायरल झालेल्या 'त्या' डॉक्टर आणि पेशंटचं भांडण मिटलं, नेमकं प्रकरण काय?

'मला सतत मेसेज करायचा'...; सूर्यकुमार यादवबाबत खळबळजनक दावा करणारी खुशी मुखर्जी कोण?

चीनचा तीळपापड! 'इतिहास बदलू शकत नाही'; सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान'चा ट्रेलर बघून तीव्र प्रतिक्रिया