आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, ३१ जानेवारी २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, January 31, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - अचानक उद्भवणाऱ्या प्रसंगांना चांगल्या प्रकारे तोंड द्याल. महत्त्वाचे निकाल मनाप्रमाणे लागतील. आपल्यामध्ये उत्साह आणि आत्मविश्वास चांगला असणार आहे.

वृषभ - आपल्या कामामध्ये आपल्याला आपल्या स्मरणशक्तीचा चांगला फायदा झालेला दिसेल. आपल्या कामाच्या अनुभवाचा आपल्या कार्यक्षेत्रात चांगला उपयोग होणार आहे.

मिथुन - आजच्या दिवसात समोरच्या व्यक्तीवर पूर्णपणे विश्वास टाकू नका. आर्थिक बाबतीत देण्याघेण्याचा व्यवहार खूप जपून केले पाहिजेत. नुकसान होऊ शकते.अनावश्यक प्रवास टाळणे पाहिजेत.

कर्क - आपल्या मध्यस्थीमुळे कामे होणार आहेत. आपले मन प्रसन्न राहील. तुमच्या मनाप्रमाणे सर्व कामे मार्गी लागतील. जुने मित्र भेटण्याची शक्यता. मनोरंजनाकडे कल असणार आहे.

सिंह - नोकरी-व्यवसायात चांगली परिस्थिती राहणार आहे. कामे मार्गी लागणार आहेत. मात्र कामासाठी धावपळ होऊ शकते. अपेक्षित नवीन कामे येतील. धार्मिक कामामध्ये सहभाग असेल.

कन्या - सार्वजनिक कामामध्ये सहभाग असेल. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर आपले काम होईल. आर्थिक आव्हान चांगली असेल. नावलौकिकात वाढ होणार आहे.

तुळ - आज आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. धार्मिक कार्यामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती ठीक असणार आहे. ग्रहमानाची हवी तशी साथ मिळणार नाही.

वृश्चिक - नोकरीमध्ये अस्थिरता जाणवण्याची शक्यता आहे काहींना बदलीला सामोर जावे लागणार आहे हे अनावश्यक खर्चाला आवर घातला पाहिजे.

धनु - कुठलेहि निर्णय घाई घाईने घेऊ नका. महत्वाचे काम करताना खूप काळजी घेणे आवश्यक आहे. कामाचा प्राधान्यक्रम ठरवून काम करा, तर काम पूर्ण होतील व व्यवस्थित होतील.

मकर - कलाकार व लेखक यांना नवीन संधी येणार आहेत. कामामध्ये चांगले बदल घडतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासात नीट लक्ष देऊन अभ्यास करावा. अत्यंत उत्पादनशील दिवस जाणार आहे.

कुंभ - आपल्यासाठी आजचा दिवस अतिशय चांगला आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचा फायदा घ्या. तुम्हाला ताणातून आणि अडचणीतून दिलासा मिळणार आहे.

मीन - प्रभावशाली व्यक्तींकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. व्यावसायिकदृष्ट्या तुम्ही खूप प्रगती कराल. उद्योग अथवा व्यवसाय मध्ये समृद्धी मिळणार आहे. नोकरी मधले प्रश्न सुटणार आहेत.

मुंबई महापालिकेत 'नवा भिडू, नवे राज्य'

कार्यकर्त्यांचा आधार, विकासाची दिशा

हिवाळ्यात अंजीर खा आणि निरोगी राहा; वाचा महत्त्वाचे फायदे

Mumbai : १ फेब्रुवारीपासून मुंबईत नवीन वाहतूक नियम; कोंडी कमी करण्यासाठी निर्णय, कोणत्या वाहनांना परवानगी? कोणाला नो एंट्री?

"दादा… कुठं हरवलात तुम्ही? तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय..."; अजित पवारांच्या आठवणीत रोहित पवारांची भावूक पोस्ट