आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, ६ ऑगस्ट २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, August 6, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष : स्वतःबद्दल आपणास आत्मविश्वास असणार आहे. अचानक प्रवास संभवतो. या प्रवासात आपणास चांगले फायदे मिळण्याची शक्यता आहे. बहिण भावंडा कडून आपणास आनंद मिळेल.

वृषभ : व्यवसायिक म्हणून काम करत असाल तर आजचा दिवस आपणास चांगला जाणार आहे. आपल्या कामातील अडथळे दूर होतील. निश्चित अशी प्रगती होणार आहे.

मिथुन : आजचा दिवस तसा मिश्रित स्वरूपाचा जाणार आहे.आज पैशापेक्षा कामात सुधारणा करण्याकडे आपण लक्ष द्यावे. नवीन काम येतील त्यातले योग्य पर्याय निवडायला लागणार आहे.

कर्क : मुख्य म्हणजे आपला आत्मविश्वास वाढवायला पाहिजे.आपल्यासमोर दोन प्रश्न आहेत एक तर स्वतःचे आरोग्य आणि कामातील अडथळे शांतपणे आणि सातत्याने काम करणे.

सिंह : मित्र आणि सहकार्‍यांशी सांभाळून वागा. निर्णय घेण्यामध्ये तरतमभाव जाणून मगच निर्णय घ्या. आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

कन्या : प्रकृतीस्वास्थ्यचा प्रश्न असल्या मुळे थकवा येणारे काम करू शकणार नाही. प्रत्येक प्रश्न सद्सद्विवेक बुद्धीने घ्या. राहत्या घरामध्ये काही त्रास असू शकतो. पण नोकरीमध्ये प्रगती आहे .

तुळ : आजचा दिवस आपणास खूप आनंदाचा जाणार आहे. छोट्या छोट्या कारणांनी चिडचिड करू नका .आजच्या दिवसाचे नियोजन केल्यास सर्व कामे नीटनेटकी होणार आहेत.

वृश्चिक : आज आपण सर्व बाबतीत सकारात्मक विचार केले पाहिजेत .कामात जरी अडथळे आले तरी प्रयत्नाने ते सुटणार आहेत. आर्थिक प्रश्‍न सुटणार आहेत. सहकारी वर्गाशी वाद टाळेव.

धनु : स्वतःच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवा. आपले प्रवास होण्याची शक्यता आहे. प्रवासामध्ये महत्त्वाचे निर्णय योग्य ठरणार आहे. आपला जोडीदार आपणास सर्व प्रकारे सहाय्य देणार आहे.

मकर : नोकरीमध्ये जास्त कष्ट पडणार आहे. जास्त काम करावे लागणार आहे. त्यामुळे मनोबल कमकुवत होण्याची शक्यता आहे. पूर्ण आत्मविश्वासाने काम करणे आवश्यक आहे.मनोबल वाढवा.

कुंभ : आजचा दिवस चांगला जाणार आहे. आपल्या कामाचे श्रेय आपल्याला मिळणार आहे. आपल्या स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पडल्यामुळे आपण खुश असणार आहात.

मीन : मालमत्तेच्या व्यवहारात मधून आपणाला चांगला फायदा मिळू शकतो. आर्थिक प्रश्न सहजतेने सुटणार आहेत. कामामध्ये चांगली प्रगती होणार आहे. व्यवसाय वृद्धि करण्याकडे लक्ष असणार आहे.

ऑगस्ट महिना कसा जाईल? बघा कुंभ आणि मीन राशीचे भविष्य

चॉकलेटचा हट्ट करणाऱ्या मुलांसाठी घरीच बनवा पौष्टिक एनर्जी बार; चवही मस्त, पोषणही भरपूर

विमा नाही तर पेट्रोल नाही? सुप्रीम कोर्टाचा मोठा प्रस्ताव; तुमच्या गाडीचा इन्शुरन्स कसा काढायचा, जाणून घ्या

राज्यात ॲनालॉग पनीरवर बंदी; हॉटेल्स, रेस्टॉरंट्सना FDA चे आदेश

Nagpur : इंस्टाग्रामवर मैत्री, 'ते' फोटो व्हायरल करण्याची धमकी अन्... १६ वर्षीय मुलीला ओलीस ठेवून अत्याचार, ठाण्याच्या तरुणाला अटक