आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, ६ जून २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, June 6, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष : अनुकूलतेमुळे आपल्या उत्साहात आणि उमेदीत वाढ होईल आपल्या समोरील कामे आपण वेगाने पूर्ण करू शकाल कुटुंबातील मुला मुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल.

वृषभ : व्यवसायात वृद्धी होईल. व्यवसायात केलेले नियोजन यशस्वी झाल्यामुळे त्याचे चांगले परिणाम मिळतील. भागीदारी विषयी विचारणा होऊ शकते. आर्थिक परिस्थिती मजबूत राहील.

मिथुन : हातात घेतलेले काम जिद्दीने पूर्ण करू शकाल . काम पूर्ण झाल्यामुळे उत्साहात वाढ होईल सार्वजनिक तसेच धार्मिक कार्यात सक्रिय योगदान द्याल.

कर्क : वैवाहिक जीवनात जोडीदाराबरोबर मतभेदांची शक्यता वाद-विवाद टाळा. कलह सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकला.

सिंह : व्यवसाय धंद्यात आर्थिक मदतीची आवश्यकता भासू शकते कर्जप्रकरणे मंजूर होतील थोरा मोठ्यांचे तसेच वरिष्ठांचे सहकार्य लाभल्यामुळे महत्त्वाची कामे हातावेगळी करू शकाल.

कन्या : सकारात्मक विचारांच्या व्यक्तींच्या सहवासात आल्यामुळे आपल्या वैचारिक पातळीत अनुकूल परिवर्तनाची शक्यता आहे. धार्मिक बाबतीत रस निर्माण होईल.

तुळ : कोणत्याही कामाविषयी इतरांवर अवलंबून राहू नका स्वतःची कामे स्वतः करा कोणाच्याही आश्वासनावर ती विश्वास ठेवू नका. फसवणूक होऊ शकते.

वृश्चिक : मित्र मंडळींचे सहकार्य लाभेल त्यामुळे एखादे महत्त्वाचे काम करू शकाल कुटुंबामध्ये चांगले वातावरण राहील मात्र व्यवसायात उधारी वाढवू नका.

धनु : आपल्या मौल्यवान वस्तू व महत्त्वाची कागदपत्रे जपा हरवण्याची किंवा गहाळ होण्याची शक्यता आहे प्रवासात सावधान राहा. सामाजिक कार्यात मानसन्मान मिळेल.

मकर : मित्र मंडळ यांच्याबरोबर काही अनोळखी व्यक्तींच्या संबंधात याल.सावध राहणे आवश्यक ठरेल. फसवणुकीची शक्यता. लहान मोठे आर्थिक व्यवहार सांभाळून करा.

कुंभ : व्यवसाय धंदा तसेच नोकरीमध्ये नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील त्यामुळे आपल्या रोजच्या कामात बदल घडू शकतो कामाविषयी आपले ज्ञान अद्ययावत ठेवण्याची आवश्यकता.

मीन : सरकारी स्वरूपाच्या कामात यश लाभेल ओळखी मध्यस्थी उपयोगी पडतील. कोर्टकचेरी विषयक काम पूर्ण करू शकाल महत्त्वाच्या व्यक्तींच्या गाठीभेटी होतील.

सामान्य माणसाच्या कल्याणासाठी काम करा; अर्थमंत्री सीतारामन यांचे प्राप्तिकर विभागाला निर्देश

Nashik : भरधाव ट्रक फ्लायओव्हरवरून थेट ५० फूट खाली कोसळला; सिन्नरमधील भीषण अपघाताचा VIDEO व्हायरल

महाराष्ट्रात ८७.७९ टक्के मतदार अर्जांचे वाटप पूर्ण; १ लाखाहून अधिक BLO कडून मतदार याद्यांचे पुनरीक्षण

Mumbai : तीन वर्षांची असताना गिळलं टोपण; टीबी-दमा समजून डॉक्टरांनी ७ वर्षे केले चुकीचे उपचार, अखेर मुलीच्या फुफ्फुसाचा भाग काढला

Mumbai : पोलिसांची गाडी रोखणाऱ्या 'त्या' तरुणीची सायबर सेलमध्ये धाव; ऑनलाइन छळ, अश्लील ट्रोलिंगविरोधात तक्रार