मेष : सकारात्मक माधान देणार्या घटना घडल्यामुळे आलेला मनावरील ताण नाहीसा होईल, हलके वाटेल एखादी मोठी अडचण दूर होईल आरोग्यात सुधारणा होईल.
वृषभ : महत्त्वाची कामे सहज झाल्यामुळे आश्चर्य वाटेल. काहींना महत्त्वाच्या कामासाठी लांबचे तसेच दूरचे प्रवास करावे लागतील. महत्त्वाची कागदपत्रे सांभाळून ठेवणे गरजेचे ठरेल.
मिथुन : महत्त्वाच्या कामाला दुपारनंतर यश मिळेल तोपर्यंत संयमाने वागणे आवश्यक आहे. जोडीदाराचा लहरीपणा सांभाळावा लागेल. अडचणींवर यशस्वी मात कराल.
कर्क : महत्त्वाचे नियोजन यशस्वी झाल्यामुळे उत्साह वाढून कामात गतिशीलता निर्माण होईल. इतरांचे सहकार्य अपेक्षेप्रमाणे मिळेल. व्यावसायिक स्थिती समाधानकारक राहील.
सिंह : व्यवसाय-धंद्यात उलाढाल वाढून त्याचे प्रमाण वाढेल आर्थिक आवक चांगली राहील त्यामुळे आपणही सढळ हाताने खर्च कराल आरोग्य सुधारेल.
कन्या : आपल्या जीवनसाथीची आपल्याला उत्तम साथ मिळेल महत्त्वाच्या कामात आपल्या जोडीदाराचा सल्ला ठरेल आपण स्वतः मात्र वाद-विवाद टाळणे हितकारक ठरेल.
तुळ : दिवस अनुकूल राहील. अनुकूल वातावरणामुळे आनंदी आणि उत्साही राहा आरोग्याची काळजी दूर होईल आरोग्यात सुधारणा होईल मात्र खाण्यापिण्याची काळजी घ्या.
वृश्चिक : आर्थिक स्थिती बळकट राहील यामुळे आपण आपले नवे नियोजन प्रत्यक्षात उतरवू शकाल . महत्त्वाची कामे सकाळच्या वेळेसच ओळखून घ्या प्रवास करण्याची शक्यता.
धनु : एकाच वेळेस अनेक कामे करण्याचे टाळा. कामाचा प्राधान्यक्रम ठरवून त्याप्रमाणे नियोजन केल्यास यश लाभेल अडचणी दूर होतील इतरांच्या मताला प्राधान्य द्या.
मकर : व्यवसाय धंद्यात आणि नोकरीत अनुकूल घटना घडल्यामुळे समाधानी राहा मात्र सरकारी नियम कसोशीने पाळा. कौटुंबिक सुख मिळेल.
कुंभ : आर्थिक आवक चांगली राहील काहींना प्रवासाची शक्यता प्रवासात दगदग होण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र मदत मिळेल.
मीन : गृहसौख्य चांगले राहील नोकरीतील तात्पुरत्या आलेल्या अडचणी दूर होतील. कौटुंबिक आघाडीवर इतरांना समजून घ्या. मुलांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने बघा.