आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, ७ फेब्रुवारी २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, February 7, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - आजचा दिवस आपल्यासाठी अतिशय सरळ आणि शांतपणे जाणार आहे. कामाची दिशा आपली ठरलेली असेल, त्यामुळे कामात काही फारसे अडथळे येणार नाहीत.

वृषभ - आज आपणाला काही शुभ संदेश मिळणार आहेत. महत्वाच्या कामासाठी प्रवास करावे लागण्याची शक्यता आहे. आपले प्रवास सफल होणार आहेत.

मिथुन - मानसिक मनोबल उत्तम असणार आहे. कामाचा उत्साह वाढल्याने कामामध्ये चांगली प्रगती होणार आहे. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. उधारी उसनवारी वसूल होण्याचा दिवस आहे.

कर्क - आज आपण अतिशय सकारात्मक दृष्टीने प्रश्न सोडवणार आहात. विद्यार्थ्यांना यश येणार आहे. व्यवसाय वाढवण्यासाठी नवीन संधी येणार आहेत.

सिंह - आजचा दिवस फारसा समाधानकारक असणार नाही. कामामध्ये अचानक बदल होण्याची शक्यता आहे. कुठल्याही प्रकारे व्यापार-व्यवसायात नोकरीमध्ये धोका पत्करू नका.

कन्या - आज कामामध्ये उत्साह राहणार आहे. तुमची तत्वे व्यक्तिगत आणि सामाजिक पातळीवर राबवण्यात तुम्ही यशस्वी होणार आहात. सहकारी व्यक्तींचे सहकार्य लाभणार आहे.

तुळ -तुमच्या मनात सध्या अनेक कल्पक आणि नवनवीन कल्पना येत असतील, पण त्याचा चांगल्या आणि वाईट बाजूने दोन्ही बाजूने विचार करणे आवश्यक आहे. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

वृश्चिक - तुमच्या कुटुंबातील व्यक्तींच्या प्रकृतीचे प्रश्न समोर येण्याची शक्यता आहे. तसेच घरातील प्रश्‍नांकडे लक्ष देणे फार आवश्यक आहे. वाहन सांभाळून चाल लावणे.

धनु - तुम्ही जे काम हाती घ्याल त्यात यशस्वी होणार आहात. तुमच्या प्रयत्नांना चांगले यश मिळणार आहे. आपण सर्व अडचणींवर चांगली मात करणार आहात.

मकर -आपणाला आपल्या जोडीदाराकडून काही आनंदाचे क्षण मिळणार आहेत. आपल्याला व्यापार व्यवसायातून लाभ मिळणार आहेत.

कुंभ - आपल्या आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची शक्यता आहे. आरामदायी वस्तूंवर आणि चुकीच्या वस्तूंवर खर्च होण्याची शक्यता आहे. लहान सहान कारणांवरून वाद-विवाद करू नये.

मीन -आपण आपले काम पूर्ण क्षमतेने करणार आहात.आज कुठल्या तरी कारणाने आनंदित राहणार आहात.आपली कामे सफल होणार आहेत.आपल्या नियोजनाचे आपल्याला फायदा होणार आहे.

गणरायाच्या आगमनात खड्ड्यांचे विघ्न! ऑगस्ट महिन्यात साडेतीन हजारांहून अधिक तक्रारी; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे मंडळांची चिंता वाढली

सुटे तेलविक्री बंदीविरोधात व्यापारी आक्रमक; सरकारला १५ दिवसांचा अल्टिमेटम, राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

सट्टेबाजीमुळेच कांद्याची दरवाढ - केंद्राचा दावा; किरकोळ दरात ५९ टक्क्यांची वाढ, सरकारचा 'कांदा एक्स्प्रेस'चा धडाका

दिवाळीपर्यंत साखरेची ‘शंभरी’? ऐन सणासुदीत सर्वसामान्यांना दरवाढीचा फटका

डिजिटल अरेस्ट : मुंबईत ED कडून दोघांना अटक