आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, ८ ऑगस्ट २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, August 8, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - आरामदायी वस्तूंवर खर्च होण्याची शक्यता आहे. शारीरिक कष्टाचे काम जास्त होऊ शकणार नाही. पत्नी आणि नातेवाईक यांच्याकडून आपणास सहकार्य मिळणार आहे.

वृषभ - आपल्या विपरीत परिस्थितीतूनही आपण चांगल्या प्रकारे काम करणार आहात. कौटुंबिक सौख्य आपणाला चांगल्याप्रकारे लाभणार आहे. मात्र बहिण भावांची परिस्थिती चांगली नसणार आहे.

मिथुन - आजचा आपला दिवस कार्यक्षेत्रामध्ये चांगला जाणार आहे. कामातून किंवा व्यवसायातून मिळणारी उत्पन्न आपली पत उंचावणार आहे यातून अधिक लाभ होण्याची शक्यता आहे.

कर्क - घराकडे फार दुर्लक्ष करू नका. उलट जास्त लक्ष देण्याची गरज आहे. कुटुंबातील समस्या व त्यातून निर्माण होणारा त्रास त्याच्याशी जुळवून घेणे फार कठीण जाईल.

सिंह - जास्त आक्रमक कोणत्याही परिस्थितीत होऊ नका. भांडणे यापासून लांब राहणे चांगले नात्यांमध्ये दुरावा होऊ शकतो. आयुष्यात येणाऱ्या विविध प्रसंगांना शांतपणे आणि समजूतदारपणे सामोरे जावे.

कन्या - आजचा दिवस आपल्या कार्यक्षेत्रात चांगला जाणार आहे. आपल्या हातून काहीतरी चांगले काम होणार आहे. स्वतःवर सर्व प्रकारचे नियंत्रण हवे. आर्थिक लाभ होतील.

तुळ - आपली मानसिकता आणि आरोग्य चांगले राहणार आहे कामामध्ये चांगली ऊर्जा राहणार आहे. वरिष्ठांचे संबंध चांगले होणार आहेत. महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्या.

वृश्चिक - कुठली अशी महत्त्वाची जबाबदारी आपल्या हातून चांगली पार पडणार आहे. सहकारी किंवा भागीदारीतून आपल्याला चांगला फायदा होणार आहे. भाग्याची साथ असेल.

धनु - आपणास आजचा दिवस संमिश्र घटनांचा काळ आहे. आरोग्याच्या किरकोळ तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. आपल्या मार्गामध्ये कठीण परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे.

मकर - नोकरीमध्ये आपणास यश मिळणार आहे. नियोजित कामे चांगल्या प्रकारे पूर्ण होतील. व्यावसायिकांचा व्यापार चांगला वाढणार आहे. आर्थिक फायदे चांगले होतील.

कुंभ - स्वतःचे मनोबल वाढवण्याची गरज आहे. कामांमध्ये अडथळे येण्याची शक्यता आहे. विचारपूर्वक व आत्मविश्वासाने काम केल्यास कामांमध्ये अडचणी दूर होतील.

मीन - आपल्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोण सकारात्मक असणार आहे. प्रेमप्रकरणात यश मिळणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपली ऊर्जा चांगली राहणार आहे.

शाळा बंदी + शिक्षक बंदी = शिक्षण बंदी

Independence Day 2026: ऑफिसमध्ये स्टायलिश अन् प्रोफेशनल दिसायचंय? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स

श्रावणात 'हे' पदार्थ खाल तर निरोगी राहाल; उपवासातही मिळेल भरपूर ऊर्जा

Video : थायलंडमध्ये विद्यार्थ्याचा रक्तरंजित हल्ला; आधी आजी-आजोबांना संपवलं, नंतर शाळेत अंधाधुंद गोळीबार अन् शेवटी...

Video : मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर भीषण अपघात; फॉर्च्युनरची टेम्पोला जोरदार धडक, एकाचा जागीच मृत्यू, चार जण जखमी