आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, ८ मे २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, May 8, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - मनोबल उत्तम राहून आरोग्य उत्तम राहील उत्साह आणि उमेद वाढल्यामुळे आपल्या समोरील कामे आपण वेगाने पूर्ण करू शकाल व्यवसाय धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहील.

वृषभ - कुटुंब परिवारात शुभवार्ता मिळतील कुटुंबातील वातावरण चांगले राहील नातेवाईकांचे सहकार्य लाभेल तसेच मित्रमंडळींची मदत मिळेल. व्यवसायिक जुनी येणी येतील.

मिथुन - आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील त्यामुळे आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. व्यवसाय धंद्यातील रखडलेली कामे मार्गी लावू शकाल आपली देणी चुकती करू शकाल.

कर्क - समाजातील मान्यवर तसेच गुरुतुल्य व्यक्तींच्या मार्गदर्शना बरोबर सहवास लाभेल. मानसन्मानाचे योग उत्साह उमेद वाढेल आरोग्य चांगले राहील.

सिंह - मनोबल वाढवणाऱ्या घटना आजूबाजूस घडल्यामुळे आत्मविश्वास वाढेल काही बाबतीमध्ये निर्णय धाडसाने घ्याल त्या निर्णयाचा आपल्या भविष्यात चांगला फरक पडेल.

कन्या - रोजच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे चिडचिड वाढण्याची शक्यता महत्त्वाची कामे आज नको तो सरकारी कामांना विलंब लागेल. खर्चातही वाढ होऊ शकते. तुळ - मन आशावादी व आनंदी राहील उत्साह वाढेल नोकरी विषयक प्रश्न सुटून रोजगार मिळेल पूर्वी दिलेल्या मुलाखतीतून बोलावणे येऊ शकते.

वृश्चिक - महत्त्वाची कामे पुढे ढकलावी शक्यतो प्रवासही पुढे ढकलावा. सामाजिक कार्यात सक्रिय योगदान देऊ शकाल मानसन्मानाचे योग.

धनु - बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना यश मिळू शकते घेतलेले निर्णय अचुक ठरतील. आपल्याजवळील व्यक्तींचे सहकार्य मिळेल. मात्र इतरांना कमी लेखू नका.

मकर - दीर्घकाळ रखडलेली शासकीय कामे पूर्ण करण्यात यश मिळेल ओळखीचा उपयोग होऊ शकतो मात्र खर्च करावा लागेल. वाहने चालविताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण आवश्यक राहील.

कुंभ - व्यवसायिक येणी आल्यामुळे आर्थिक परिस्थिती मजबूत राहील व्यवसायात काही महत्त्वाचे बदल करू शकाल कामगार यांचे सहकार्य लाभत शकते. मनोबल व आत्मविश्वास वाढेल.

मीन - व्यवसायिक उधारी उसनवारी वसूल होईल. आर्थिक मदत लागल्यास ती ही उपलब्ध होऊ शकेल आपण घेतलेले निर्णय अचूक ठरले यामुळे त्याचा आपल्याला व्यवसायात फायदा होईल.

सोमनाथ आणि भारताचा अजेय विश्वास

साध्या वेशात बसस्टॉपवर उभी राहिली 'लेडी सिंघम'; छेड काढणाऱ्या ४० नराधमांना ३ तासांत ठोकल्या बेड्या! VIDEO

मुंबईकरांची प्रतीक्षा संपणार! मोनोरेल महिनाअखेरीस पुन्हा धावणार; अंतिम सुरक्षा तपासणी पुढील आठवड्यात

Summer Tips : शहाळं घेताना फसू नका! भरपूर पाणी असलेलं नारळ ओळखण्यासाठी वापरा 'या' सोप्या ट्रिक्स

Health Tips : वारंवार तोंड येतंय? उष्णतेमुळे होणाऱ्या Mouth Ulcers वर करून पाहा हे घरगुती उपाय