मेष - शत्रूवर विजय मिळवाल. अनावश्यक बोलू नका चर्चेने प्रश्न असू शकतात आक्रमकपणा टाळा. दिवस चांगला राहील. शुभवार्ता मिळतील
वृषभ - समोरच्या व्यक्तीवर ती डोळे झाकून विश्वास ठेवू नका. अंतर्मनाचे ऐका. शांतपणे निर्णय घेतल्यास ते फायदेशीर ठरतील. अचानक धनलाभाचे योग.
मिथुन - घरामध्ये पाहुण्यांचे आगमन होण्याची शक्यता आपल्या बोलण्यात स्पष्टपणा ठेवा. पाहुण्यांसाठी खर्च करावा लागेल. मदत करा.
कर्क - भागीदारीच्या व्यवसायात भागीदार यांचे मत लक्षात घेता फायद्याची ठरेल. नवीन नवीन तंत्र व्यवसायात अंगीकृत करण्याचा प्रयत्न करावा. महत्त्वाच्या निर्णयात घाई गर्दी अजिबात करू नका.
सिंह - विचारांना गती प्राप्त होईल नवनवीन कल्पना अमलात आणाल. महत्त्वाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे. समारंभाचे आमंत्रण मिळेल.
कन्या - आजचा दिवस अनुकूल ठरेल सर्व महत्त्वाची कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर असतील परंतु आपल्या प्रयत्नात कमी पडून देऊ नका.
तुळ - योग्य वेळेस योग्य विचार करूनच बोला. लोकांच्या मनात आपल्याबद्दल आदराची भावना निर्माण होईल विचार सकारात्मक ठेवण्याची आवश्यकता.
वृश्चिक - जुनी येणी वसूल होतील व्यवसायात प्रगती कराल समोरच्या व्यक्तीवर आपल्या बुद्धिचातुर्याने व व्यवहार कौशल्याने जिंकाल मात्र रागावर नियंत्रण आवश्यक.
धनु - व्यवसाय धंद्यात महत्त्वाच्या संधी येतील त्या संधीचे सोने करून घेणे आपल्या हाती आहे हे लक्षात ठेवा, आजचे काम उद्यावर ढकलू नका आळस झटका.
मकर - घडलेली सरकारी कामे गतिमान होतील ज्या गोष्टीबद्दल आपल्याला पुरेशी माहिती नाही त्या गोष्टीबद्दल माहिती घ्या.
कुंभ - विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाकडे पूर्णपणे लक्ष देणे गरजेचे आहे कुसंगत टाळा. वेळेचे नियोजन उपयोगी येईल.
मीन - हातातील कामे नियोजन पूर्वक होतील अवास्तव खर्च करणे टाळा. विवाह ठरवण्याच्या बाबतीतील बोलाचाली फलद्रूप होतील.