आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, ९ फेब्रुवारी २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, February 9, 2026 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - आज तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहात. नातेवाईकांची सुसंवाद होईल.विवाहित जीवन सुखाचे असणार आहे.विद्यार्थ्यांना शैक्षणिक यश मिळणार आहे.

वृषभ -आज आपली निर्णय घेण्याची क्षमता जास्त चांगली असणार आहे.आपल्याला आपल्या कामात बदल करावयाचा असल्यास जरूर करणे. दैव तुमच्या बाजूने आहे.

मिथुन - प्रवास करण्यासाठी आज अत्यंत अनुकूल काळ आहे. तुमच्याकडे येणाऱ्या सुखाचा उपभोग घ्या. तुम्ही यशाची फळे चाखू शकता. तुमच्या कष्टाचे चीज आज होणार आहे.

कर्क - तुमचे आरोग्य चांगले असणार आहे. आपल्या कामामध्ये चांगली प्रगती होणार आहे. व्यापार व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. आवडत्या व्यक्तींची भेटीगाठी होण्याची शक्यता आहे.

सिंह - आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. आज तुम्ही उत्साही आणि आनंदी असणार आहात. नवीन संधी येईल पण विचारपूर्वक निर्णय घेणे फार आवश्यक आहे.

कन्या -आजच्या दिवसात तुमचे वर्तन साधारण राहील. तुम्ही कामातून मिळणा-या फायद्यापेक्षा कामाकडे लक्ष देणे फार आवश्यक आहे.

तुळ - आजचा दिवस तुमच्यासारख्या चतुर व्यावसायिकांना अत्यंत चांगला जाणार आहे. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढणार आहे. आपले आपले ध्येयाकडे वाटचाल राहणार आहे.

वृश्चिक -बुद्धीजीवी लोकांना आजचा दिवस चांगला जाणार आहे. आपले कामाचे नियोजन चांगले असल्यामुळे काम पूर्ण होणार आहेत. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.

धनु - नवीन करार किंवा एखादा प्रकल्प घेण्याचे पूर्णपणे टाळा.आपल्या कार्यक्षेत्रामध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे.पण आपण पूर्णपणे आत्मविश्वासाने कामे करा.

मकर -आजचा दिवस आपल्यासाठी अतिशय अनुकूल आहे. तुमच्या नशिबाचे गाणी तुमच्या प्रमाणेच पडणार आहे.भागीदारीमुळे व्यवसाय मध्ये वाढ होऊन आर्थिक प्रमाण वाढणार आहे.

कुंभ - जवळच्या व्यक्तींची वाद-विवाद होण्याची शक्यता आहे. दुसऱ्याच्या भांडणात स्वतःला अडकवू नका. तुमच्या आरोग्याची स्थिती फारशी चांगली नसणार आहे.

मीन -वरिष्ठ आणि प्रभावशाली व्यक्तींकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळणार आहे. व्यावसायिक पातळीवर तुमची प्रगती होणार आहे. आजचा दिवस चांगला आहे. नवीन संधी येण्याची शक्यता आहे.

हा सरकारच्या भोंगळ कारभाराचा ट्रेलर

Valentine's Week : जोडीदाराच्या आवडीनुसार निवडा परफेक्ट चॉकलेट; Chocolate Dayसाठी 'हे' ऑप्शन्स ठरतील बेस्ट

दररोज थोडं चॉकलेट खाल्लं तर काय होतं? जाणून घ्या कारण

झटपट आणि हेल्दी! नाश्त्यासाठी घरीच बनवा टेस्टी संत्र्याचा जाम, नोट करा रेसिपी

Bigg Boss Marathi 6 : ‘माझ्याशिवाय बिग बॉस अधुरं’; चर्चांना पूर्णविराम देत राखी सावंतची वाइल्ड कार्ड एंट्री