मेष : घरातील वातावरण खेळीमेळीचे ठेवण्याचा प्रयत्न करा. छोट्या-मोठ्या तक्रारी विचारविनिमयाने सोडवणे आवश्यक आहे. महत्वाच्या निर्णयांमध्ये घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घ्या.
वृषभ : लहान भावंडांना मदत करावी लागेल त्यामुळे घरामध्ये वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. पण तुम्ही तुमचे कर्तव्य करा तुमच्यासाठी त्यांच्या मनात आदराची भावना उत्पन्न होईल.
मिथुन : खर्चाचे प्रमाण वाढणार आहे . खर्चावर नियंत्रण ठेवणे खूपच आवश्यक आहे. अनावश्यक खर्च टाळावा, उत्पन्न कमी खर्च वाढेल अशी स्थिती होऊ देऊ नका
कर्क : व्यवहार करताना भावानेचा विचार करू नका.आर्थिक नुकसान होईल नंतर वाईट वाटून घेण्यात काही अर्थ नाही. महत्त्वाची कामे सहजतेने करा ती यशस्वी होतील.
सिंह : प्रवासाचे योग आहे हे महत्त्वाचे व्यवहार करताना नीट विचार करा नियम व अटी पाळून मगच व्यवहार करा. गुंतवणूक करताना कागदपत्रे नीट पहा मगच सही करा.
कन्या : आर्थिक बाजू बळकट राहील. व्यवसायामध्ये यश मिळेल. आर्थिक खर्च होणार आहे. जोडीदाराचे ऐकावे लागेल. मुलांना तुमचा आधार वाटेल, घरामध्ये वातावरण आनंदी असेल.
तुळ : नोकरी-व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल. महत्त्वाच्या कामांना प्राधान्य दिल्यास ती लवकर होतील. अडचणीतून मार्ग निघेल काही व्यक्तींच्या कामांमध्ये बदल होण्याची शक्यता.
वृश्चिक : निरनिराळी कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न कराल ती सहजरीत्या मार्गी होतील.व्यवसायिकांच्या व्यवसाय चांगल्या प्रकारे होईल विक्री चांगली झाल्यामुळे फायद्याचे प्रमाण जास्त राहील.
धनु : कितीही मोठा फायदा मिळणार असला तरी नियम अटी पाळून हाच व्यवहार करा. नंतर त्रास होऊ शकतो, त्यासाठी मनोबल वाढवावे लागेल त्मविश्वासपूर्वक काम करा.
मकर : समाजसेवा करण्यास खूप वेळ द्यावा लागेल, त्यामुळे स्वतःची कामे राहणार नाहीत याची काळजी घेणे आवश्यक आहे. व्यवसायात प्रतिस्पर्धी सुरज निर्माण करण्याची शक्यता आहे.
कुंभ : कामानिमित्त धावपळ करावी लागेल. दगदग होणार आहे. कामे कष्टपूर्वक पूर्ण करावी लागतील आपल्याला आज थकवा जाणवणार आहे. गाडी वाहन चालवताना लक्षपूर्वक चालवावे.
मीन : धार्मिक कार्यासाठी प्रवास होऊ शकतो. महत्वाचे कामाचे नियोजन चांगले होईल. कामे सहजतेने होतील.सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचा सहयोग मिळेल प्रतिष्ठा प्राप्त होईल.