डॉ. सविता महाडिक, ज्योतिष भूषण
मेष रास
यश निश्चितपणे मिळेल
मेष रास ही मंगळाची रास आहे. त्याचप्रमाणे ही विषम रास आहे. राशीचक्रामध्ये ही रास एक आकड्याने दर्शविली जाते. या राशीला पुरुष रास समजले जाते. या राशीमध्ये सोशिकता व कडकपणा आढळतो. त्याचप्रमाणे धाडस, साहस, अहंकार, मानी तसेच प्रेम, शौर्य, निर्भयता, कर्तृत्व, स्वावलंबित्व, काटकपणा, दुसऱ्यावर हुकूम चालविण्याची आवड तसेच अधिकार लालसा असते. ही रास चररास आहे. त्यामुळे चंचलता, हिंडणी, फिरणे, प्रवास करणे, अस्थैर्य वास्तु व वस्तू आणि व्यवसायात वारंवार बदल करणे, असे गुण या राशीमध्ये आढळतात. ही रास अग्नितत्त्वाची आहे. त्यामुळे या राशीत धमक - तडफ बाणेदार स्वभाव, पित्त प्रकृती उन्हाळा व उष्णता सहन होत नाही. पायाची व डोळ्याची जळजळ होण्याची शक्यता असते. पित्तकारक पदार्थ सहन न होणे हे वैशिष्ट्य असते. ही रास असलेल्या जातकांना फार लवकर राग येतो.
शिक्षण :- चालू कालावधीमध्ये आपल्याला शिक्षणात यश मिळवण्यासाठी मन शांत ठेवणे गरजेचे आहे. चित्त जागेवर असेल तर अभ्यास होईल. त्याचप्रमाणे अभ्यासामध्ये सातत्य ठेवावे लागणार आहे. आपल्या स्वभावात सृजनशीलता या प्रवृत्ती व्यक्त होतात. त्यामुळे आनंद व आत्मविश्वास प्राप्त करता येतो. त्यामुळे यश येईलच. टेक्निकल क्षेत्र तसेच कला - क्रीडा क्षेत्रात यश मिळण्यासाठी सदरचा कालावधी निश्चितच अनुकूल आहे. त्यासाठी आपले प्रयत्न व प्रामाणिकपणा उपयोगी पडेल. आपल्या यशामध्ये अडथळे न येण्यासाठी आपल्याला अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे ठरेल. त्यासाठी अभ्यासामध्ये सातत्य ठेवणे गरजेचे ठरेल. प्रयत्नांची साथ हवी. परदेशी जाऊन उच्च शिक्षण घेण्याचे प्रयत्न यशस्वी होतील.
पारिवारिक :- आपल्या कुटुंब परिवारात आपल्याला जास्तीच्या जबाबदाऱ्या या काळामध्ये स्वीकाराव्या लागणार आहेत. कुटुंबातील सदस्यांचे वाढते सहकार्य मिळेल. परंतु त्यांच्या गरजाही वाढतील. त्यामुळे त्यांच्या गरजा पूर्ण करण्याकरिता आपण आपले प्रयत्न चालू ठेवणे गरजेचे ठरेल. त्यामुळे यश लाभेल. कुटुंब परिवारात काही समज गैरसमज झाले असल्यास ते सोडवण्यासाठी सामंजस्याची भूमिका घ्यावी लागेल. थोडक्यात, आपल्याला पुढाकार घेणे गरजेचे ठरेल. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. परंतु खर्चही त्याच प्रमाणात राहणार आहे आनंदासाठी किंवा मौल्यवान वस्तूंच्या खरेदीसाठी खर्च होईल. सहकुटुंब - सहपरिवार प्रवासाची शक्यता आहे. धार्मिक प्रवास पण होऊ शकतात. अध्यात्मक आवड निर्माण होण्याची शक्यता आहे.
नोकरी-व्यापार-व्यवसाय :- कार्यक्षेत्रात तसेच कुटुंब परिवारात कोणतेही निर्णय घेताना वस्तुस्थिती काय आहे, याचा विचार करून शांतपणे निर्णय घेणे गरजेचे. काही वेळेस अनपेक्षित समस्या संभवतात. नियोजनात बदल करावा लागण्याची शक्यता यामुळे जास्तीची काळजी घेणे हितावह ठरेल. नातेवाईक आप्तेष्ट यांच्याशीदेखील संबंध चांगले ठेवणे आवश्यक आहे. स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे राहील.
शुभ दिनांक : २, ५, ६, १५, २१, २२, २३, २५, २९
अशुभ दिनांक : १, ४, १०, १७, १८, १९, २०, २७, ३०, ३१
वृषभ रास
भाग्योदय होतील
वृषभ रास ही शुक्राची रास आहे. राशीचक्रामध्ये दोन या आकड्याने दर्शविली जाते. शिवाय ही समोरास आहे व स्थिरसुद्धा आहे. त्यामुळे बदल फारसा होताना दिसत नाही. घर किंवा नोकरी तसेच व्यवसाय धंदा सहसा बदलले जात नाहीत. ही सौम्य राशी आहे. त्यामुळे निरुपद्रवता, दुसऱ्याच्या मतांना प्राधान्य देणे समजूतदारपणा व शांतपणा हे गुण सामान्यतः दिसतात. तसेच स्त्री राशी म्हणून लज्जा, विनम्रता, विनय, ममता, वात्सल्य, संगोपन, संसारसक्ती, घर करून राहण्याची वृत्ती, परावलंबी, दुसऱ्याच्या मदतीने पुढे येणे, कोमलता, हळवेपणा इत्यादी स्त्रीकडे असणारे गुण या राशीमध्ये समाविष्ट असतात. प्रवासाची आवड नसते. फिरण्याचा कंटाळा येतो. ही राशी पृथ्वीतत्त्वाची असल्यामुळे प्रमाणशीर अवयवरचना नीटनेटकेपणा, व्यवस्थितपणा याची आवड असते. तसेच सौंदर्यात विशेष रुची असते. निरनिराळ्या कलांच्यामध्ये निष्णात असतात.
शिक्षण :- कोणत्याही क्षेत्रातील शिक्षण घेण्यासाठी सदरचा काळ अनुकूल असला तरी आपणास विशेष कष्ट घ्यावे लागण्याची शक्यता आहे. तसेच अभ्यासामध्ये सातत्य ठेवण्याची गरज असणार आहे. वेळेचे नियोजन विशेष उपयोगी पडू शकते तसेच खूप संगती पासून दूर राहणे हितावह ठरेल. अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित करणे गरजेचे ठरेल. अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित करताना निरनिराळे अडथळे येण्याची शक्यता असल्याने त्याकडे लक्ष देणे गरजेचे ठरेल. कला व क्रीडा क्षेत्रातही अपेक्षित यश मिळू शकते. परदेशी जाऊन उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न साकार होईल. टेक्निकल क्षेत्रामध्ये थोडे जास्त प्रयत्न करावे लागतील. तसेच आपले मन व चित्त शांत ठेवणे गरजेचे ठरेल. म्हणजेच उज्वल यशाकरिता प्रयत्नांची गरज आहे.
पारिवारिक :- आपल्या कुटुंब परिवारात खर्चाचे प्रमाण वाढेल. त्यामुळे आवश्यक त्या ठिकाणीच खर्च करणे गरजेचे ठरेल. त्याचप्रमाणे त्याचे नियोजन करणेही आवश्यक आहे. कुटुंबातील सदस्यांच्यामध्ये लहान सहान कारणांवरून समज गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. वादविवाद टाळणे गरजेचे ठरेल. त्यामुळे त्यांची जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल. कुटुंबात झालेले गैरसमज संपुष्टात आणण्यासाठी आपल्याला विशेष प्रयत्नांची गरज आहे. तुमच्या प्रयत्नांमुळे कुटुंबातील शांतता टिकवून ठेवता येईल. त्यामुळे घरातील वातावरण चांगले राहील. घरातील सदस्यांच्यामध्ये आपल्याविषयी आदर भावना वाढेल. कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या आपण आत्मविश्वासाने पूर्ण करा. आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे.
नोकरी-व्यापार-व्यवसाय :- अनुकूल ग्रहमान आहे. शुभग्रहांचे सहकार्य आपणास खूपच अनुकूल ठरणार आहे. बुद्धिजीवी, कलाकार, साहित्य इत्यादी क्षेत्रातील जातकांना विशेष अनुकूल आहे. भाग्योदय होतील. आपल्या कार्यक्षेत्रात आपण प्रगती करू शकाल. कार्यात अनुकूलता लाभल्याने उत्कृष्ट कार्य होतील. आपणास त्यामुळे मानसन्मानाचे योग आहे. सामाजिक तसेच धार्मिक क्षेत्रात सक्रिय योगदान द्याल.
शुभ दिनांक : ६, ८, ११, १२, १३, २३, २५
अशुभ दिनांक : १, ४, १०, १७, १८, १९, २०, २७, ३०, ३१