राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, १३ ऑक्टोबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, October 13, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - संघर्ष टाळण्याचा प्रयत्न केल्यास अपेक्षित गोष्टी साध्य करता येतील. नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल. नियमांचे पालन करा, वादविवादाचे प्रसंग टाळा.

वृषभ - आपण घेत असलेल्या परिश्रमांची चा मोबदला व्यवस्थित मिळेल, अपेक्षित यश मिळू शकते. महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळेल, मात्र रागावर नियंत्रण ठेवा.

मिथुन - कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य दिल्यास खरे समाधान प्राप्त होईल. नोकरदारांना दिलासा मिळेल, आर्थिक बाजू सावरता येईल. विवाहेच्छुक व्यक्तींना जोडीदारांची साथ मिळण्याची शक्‍यता राहील.

कर्क - इच्छित गोष्टी साध्य करता येतील. ग्रहांची साथ मिळणार असल्याने योजना कार्यान्वित होतील. आर्थिक बाजू सावरता येईल. नोकरदारांना वरिष्ठांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा.

सिंह - स्थावर मालमत्ते संबंधी प्रश्न सोडवले कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या. कला क्षेत्रातील व्यक्तींना उत्तम दिवस आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतीलकौटुंबिक नाराजी दूर कराल.

कन्या - मनोबल चांगले असल्यामुळे, मनातील अनेक योजना साकार करणे शक्य होईल. स्थावर मालमत्ते संबंधी चे प्रश्न सोडवा. नोकरदारांना दिवस चांगला.

तुळ - आपली मानसिकता चांगली ठेवण्याचा प्रयत्न करा. नियमांचे कटाक्षाने पालन करा. कोणत्याही प्रसंगांनी वातावरण बिघडणार नाही याची दक्षता घ्या.

वृश्चिक - आजच्या दिवसात आनंदाचे क्षण उपभोगायला. अपेक्षित आनंदित घटना घडतील. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. विवाह ठरण्याचे योग आहेत. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

धनु - आज आपण आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जास्त लक्ष घालणार आहात. नोकरदार व व्यापार व्यवसायातील लोकांना धावपळीचा दिवस.

मकर -आपल्या कष्टाला अपेक्षित यश मिळणार आहे. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना आजचा दिवस चांगला जाईल. प्रतिष्ठित व्यक्तींचे सल्लागार म्हणून काम करता येईल.

कुंभ - आपल्या वागण्यामुळे बोलण्यामुळे कोणी दुखावणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. हितशत्रूंच्या कारवाया डोके वर काढतील, नीट लक्षपूर्वक काळजी घेणे आवश्यक.

मीन - सर्व बाबतीत निर्णय शांतपणे व विचारपूर्वक घेतल्यास अपेक्षित गोष्टी साध्य करता येतील. परिश्रमांना योग्य न्याय मिळेल. व्यापार व्यवसायिकांना चांगला दिवस आहे.

मुंबईकरांनो, पाण्याचा गैरवापर केला तर कारवाई! २०२७ पर्यंतच्या पाणी नियोजनाचे आव्हान, १० टक्के पाणीकपात कायम

Mumbai : महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे अपहरण; १४ हजार लुटले, तिघा सराईत गुन्हेगारांना अटक

सर्वोच्च न्यायालयावर दबावाचा प्रयत्न - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Mumbai : कोस्टल रोडच्या भरावात अनधिकृत मातीचा वापर; कंत्राटदाराला पालिकेची नोटीस

रॉबर्ट हॉल, मायकेल वूडफर्ड यांना अर्थशास्त्राचे नोबेल