मेष - आपली दैनंदिन कामे सुरळीत होतील. कामामध्ये यश मिळेल. महत्त्वाच्या कामांमध्ये आपण आपल्या जोडीदाराचा सल्ला घ्या, तो आपणास लाभकारक ठरणार आहे.
वृषभ - नोकरी करणाऱ्यांना आजचा दिवस चांगला जाईल. काम जास्त असलं तरी कामात अडचणी येणार नाही. मात्र आज कोणाचेही सहकार्य मिळणार नाही हे लक्षात असू द्या.
मिथुन - आपणास आज जिद्द व चिकाटीने काम पूर्ण करावे लागणार आहे. नवीन ओळखी होतील. ओळखीचा फायदा सामाजिक क्षेत्रात आपणास होईल सामाजिक क्षेत्र विस्तारेल.
कर्क - आज आपले मनोबल उत्तम राहील. आत्मविश्वासाने कामे कराल. प्रॉपर्टीच्या कामांमध्ये लक्ष घालाल, मात्र प्रॉपर्टीचा बाबत महत्त्वाचे निर्णय घेताना विचारपूर्वक निर्णय घ्या.
सिंह - खूप दिवसापासून रेंगाळलेली महत्त्वाची बोलणी किंवा पत्रव्यवहार करून घ्या. स्वतःच्या धाडसाने व धडाडीने केलेले व्यवहार यशस्वी ठरतील. व्यापार व्यवसायाची वृद्धी होईल.
कन्या - कुटुंबातील चिंता दूर होतील. बोलताना विचार पूर्वक बोला अन्यथा कमीज बोलणे चांगले, गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या.आर्थिक चणचण भासणार नाही.
तुळ - एकाच वेळी अनेक कामे करावीशी वाटतील.स्वतःच्या उत्साह योग्य काढण्यासाठी वापरा. एकावेळी एकच काम करा, त्यामुळे काम नीट व व्यवस्थित होईल.
वृश्चिक - कामांमध्ये अडचणी आल्यामुळे, मन निराश होण्याची शक्यता आहे. काम करू नये असे वाटले तरी कामामध्ये सातत्य ठेवा. कामाला उशीर लागू शकतो.
धनु - बुद्धी कौशल्याने व्यक्तींची मने जिंकाल, आपल्याकडून लोकशिक्षण घडेल. समोरच्या व्यक्तीवर वर्चस्व राहील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
मकर - नोकरीमध्ये मनासारखी स्थिती राहील.व्यापार-व्यवसायात आपला आलेख उंचावणार आहे. ध्येय धोरण निश्चित कराल. त्यानुसार निर्णय घ्याल. कामाच्या सातत्याने यश मिळणार आहे.
कुंभ - आपल्या स्वतःच्या कार्यक्षेत्र साठीमहत्वाची बातमी समजेल. त्यानुसार आपल्या कामामध्ये कसा बदल करायचा आहेत हे तुम्ही ठरवा. आपल्याला गुरुकृपा आहेच.
मीन - आज आपण आपले मनोबल वाढवले पाहिजे. उगाचच नकारात्मक विचार करू नका आर्थिक लाभ होणार आहेत. मन शांत ठेवून निर्णय घ्या..आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.