आजचे राशिभविष्य  
राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, १८ ऑक्टोबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, October 18, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - कामाचे नियोजन करावे लागणार आहे. नाहीतर खूप धावपळ होण्याची शक्यता आहे. कामांमध्ये अडचणी येऊ शकतात, सहकारी सहकार्य करण्यास नाराज असतील.

वृषभ - व्यापार-व्यवसायात देण्याघेण्याचे व्यवहार सुरळीत होतील.कामाचा व्याप वाढणार आहे.भागीदाराचे सहयोग मिळेलच, त्यामुळे कामातील अडचणी कमी होतील व मार्ग सापडतील.

मिथुन - तुमच्या मनातील तणाव दूर करा, तरच काम सुरळीत होतील. आनंदी राहा आणि कामाला लागा.उत्साहाने काम केल्यास सुरळीत कामे होतील.

कर्क - आपल्या कल्पकतेचा व सृजनशीलतेची साहित्यिक लेखक कवी यांना चांगला फायदा होईल. नवी कामे मिळतील, आर्थिक फायदा निश्चितच होणार आहे.

सिंह - प्रॉपर्टीचा कामांमध्ये लक्ष घालावे लागणार आहे. मालमत्तेसंबंधी जे काही प्रश्न आहेत ते सर्वांनी मिळून सोडवावे लागणार आहे. त्यामध्ये ज्येष्ठांचा सल्ला आपणास फायदेशीर ठरेल.

कन्या - नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. तुमच्या कलागुणांना वाव मिळेल.तुमचे कौतुक पण होईल. आनंदित राहाल. आज कोणत्याही प्रकारचा ताण असणार नाही.

तुळ - घरातील आर्थिक व्यवहारांच्या बाबतीत कुटुंबातील व्यक्तींशी चर्चा करणे फायदेशीर ठरणार आहे.त्यामुळे तुमचे चांगले नियोजन होईल.

वृश्चिक - तुमच्या कर्तृत्वाला उजाळा मिळणार आहे. चांगल्या संधी येणार आहे, संधीचे चांगले सोने कराल. व्यवसाय वृद्धी चे प्रयत्न चांगले होतील.

धनु - व्यक्तिगत घडामोडी स्वतःच्या नियंत्रणात ठेवा. व्यापार व्यवसायामध्ये जास्त गुंतवणूक करावी लागणार आहे की नाही याचा विचार करून मगच निर्णय घ्या.

मकर - जिद्द व सातत्य यामुळे आपण काम पूर्ण करू शकता. त्यासाठी मित्र व सहकारी यांचे सहकार्य घ्याल .आर्थिक चणचण कमी होईल, त्यामुळे समाधानी राहील.

कुंभ - कामाचा उत्साह राहणार आहे. बुद्धी कौशल्याने कामे करून घ्याल. लोकांची मने जिंकाल. सामाजिक कार्य व लोकशिक्षणाचे कार्य यामध्ये सहभागी व्हाल.

मीन - कामामध्ये लक्ष केंद्रित असेल, त्यामुळे कामे चांगली होतील. मोठे निर्णय घ्याल ते बरोबर ठरतील. त्यामुळे उद्योग व्यवसाय वाढवण्यासाठी आपल्याला सहाय्य लाभणार आहे.

Maharashtra Rain : अतिवृष्टीग्रस्त २३ जिल्ह्यांसाठी महाराष्ट्र सरकारकडून मदत जाहीर; ३,२५८ कोटींची मंजूरी

मतदार यादीत गोंधळ! संभाजीनगरात ३६,००० डुप्लिकेट नावे; निवडणुका पुढे ढकला, विरोधी पक्षानंतर महायुतीच्या आमदाराची मागणी

Nandurbar : ऐन दिवाळीत भाविकांवर काळाचा घाला; चांदशैली घाटात भीषण अपघात, अस्तंबा यात्रेवरून परतणाऱ्या ६ जणांचा मृत्यू

Pakistan-Afghanistan War : ३ खेळाडूंच्या मृत्यूनंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय; पाकिस्तानला मोठा फटका बसणार?

Pakistan-Afghanistan War : युद्धविरामानंतरही पाकिस्तानकडून हवाई हल्ला; अफगाणिस्तानच्या ३ खेळाडूंचा मृत्यू