मेष - विविध मार्गांनी धनलाभ झाल्यामुळे आर्थिक परिस्थिती चांगली राहील परंतु खर्चावर नियंत्रण ठेवा. काहींना दूरचे प्रवास करावे लागतील.धार्मिकtते कडे कल राहील.
वृषभ - प्रवासाचे योग आहेत खर्चाचे प्रमाण वाढत जाईल आर्थिक आवक मनासारखी राहील नोकरीत नवीन जबाबदारी पत्करावीलागेल, प्रगती होईल काहींना उच्चधिकार मिळू शकतात
मिथुन - अनुकूलता लाभलेला हा दिवस राहील भाग्याची उत्तम साथ आपल्याला राहणार आहे प्रवासाचे योग आहेत नोकरीत चांगली परिस्थिती राहील काहींची बदली होऊ शकते अचानक धनलाभ.
कर्क - कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. भाग्याची साथ राहील प्रवासात थोडी दगदग होऊ शकते नोकरीमध्ये बदलीची शक्यता स्थावर जमीन-जुमला यांची कामे मार्गी लागतील.
सिंह - अनेक कामे मार्गी लागतील नोकरीमध्ये चांगल्या संधी चालून येतील आपल्या व्यक्तिमत्त्वाला उजाळा मिळेल अनेक घटनांच्या केंद्रस्थानी आपण राहाल.
कन्या - कौटुंबिक सुख मिळेल. जीवनसाथी आपले संबंध अतिशय मधुर राहतील प्रेमीजनांना उत्तम काळ भेटवस्तूंची देवाणघेवाण होऊ शकते प्रवास शक्यतो टाळलेला उत्तम.
तुळ - अनेक मार्गांनी धनप्राप्ती होईल त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत राहील मात्र खर्चाचे प्रमाणात वाढ होईल नोकरीत प्रगतीचे योग जोडीदाराशी थोडा वाद होऊ शकतो.
वृश्चिक - नोकरी व्यवसाय धंदा यामधील परिस्थिती समाधानकारक राहील आर्थिक आवक मनासारखी राहील नोकरीमध्ये बढतीचे योग नवीन नोकरीचा शोध यशस्वी होईल.
धनु - नोकरीत कामाचा ताण जाणवेल पण केलेल्या कष्टाचे फळ मिळेल नोकरीत बढतीची शक्यता पण बदलीची तयारी ठेवावी लागेल जोडीदाराची उत्तम साथ आपल्याला राहील.
मकर - इतरांशी गोड बोलून आपली कामे करून घ्या मुत्सद्दी पणाने वागावे लागेल कामामध्ये थोडे बदल होऊ शकतात मनासारखे खाणे-पिणे मिळेल अनेकांना प्रवासाचे योग.
कुंभ - रागावर नियंत्रण महत्त्वाचे राहील तडकाफडकी निर्णय घेणे किंवा कोणालाही टाकून बोलणे तसेच कोणालाही अपमानास्पद वागणूक देणे टाळा. शिस्त पाळा.
मीन - तरुण-तरुणींना प्रेमात यश लाभून आपला आवडता जीवनसाथी निवडता येईल प्रेमामध्ये यश मिळेल धार्मिक कार्यक्रमांमध्ये तसेच सामाजिक कार्यक्रमात सक्रिय भाग घ्याल.