मेष - आरोग्य उत्तम राहून मानसिक स्वास्थ्य लाभेल आपल्या कामातील उत्साह वाढेल. कुटुंबातील वातावरण चांगले जोडीदाराचा सल्ला उपयुक्त ठरेल. नोकरी उत्तम स्थिती राहील.
वृषभ - दीर्घकालीन अडलेली कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर असतील महत्त्वाच्या कामासाठी प्रवास करावा लागेल प्रवास कार्यसिद्धी होईल. दैनंदिन कार्य मार्गी लावण्यात यशस्वी व्हाल.
मिथुन - समाजातील मान्यवरांच्या ओळखी होऊन मदत लाभेल मित्रमंडळींच्या वर्तुळातून ही सहकार्य लाभेल सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करण्याची संधी मिळेल नवीन परिचय होतील.
कर्क - रखडलेली कामे मार्गी लागतील ओळखीमुळे कामे होतील. आजची कामे उद्यावर ढकलू नका. द्विधा मनस्थिती मध्ये निर्णय घेऊ नका. व्यवसायात महत्त्वाच्या कामांना गती मिळेल.
सिंह - अचानक धनलाभ संभवतो बौद्धिक क्षमता वापरून कार्य साधता येईल. एखाद्या सामाजिक कार्यात सक्रिय भाग घ्याल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील नोकरीत प्रगती संभवते.
कन्या - व्यवसायात नवीन तंत्रज्ञान वापरू शकाल नोकरीमध्ये बदलीची शक्यता कामाच्या स्वरूपात बदल घडू शकतो. सामाजिक तसेच धार्मिक कार्यात भाग घ्याल.
तुळ - कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींच्या सल्ल्याचा उपयोग होईल नोकरीत सामान्य परिस्थिती राहून व्यवसायातील परिस्थिती समाधानकारक राहील गुरुकृपा लाभेल कामे मार्गी लागतील.
वृश्चिक - रोजच्या जीवनात बदल घडेल. मालमत्ते विषयी ची कामे मार्गी लागतील. महत्त्वाची कामे उरकून घ्या. नोकरीत कामाचा ताण जाणवेल. प्रकृतीची काळजी घ्या.
धनु - जवळचे प्रवास घडतील कोणत्यातरी धार्मिक पवित्र स्थळीभेट द्याल. घरगुती कामे होतील. नोकरी-व्यवसायात कामात बदल घडतील महत्वाची कामे होतील.
मकर - जमा व खर्च यांचा योग्य तो ताळमेळ बसेल त्यामुळे समाधान वाटेल नातेवाईक आप्तेष्ट भेटतील घरात आनंदी वातावरण राहील. सार्वजनिक कामात भाग घ्याल.
कुंभ - धार्मिक कार्यात रस घ्याल. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील भावंडाची असलेले गैरसमज दूर करण्यात यश मिळेल. पैशाची आवक चांगली राहील.
मीन - मनावरील ताण निवळेल नोकरीत उत्साहवर्धक घटना घडतील अनपेक्षितपणे कामे लवकर होतील जोडीदाराशी मधुर संबंध राहतील खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.