राशीभविष्य

आजचे राशिभविष्य, ९ ऑक्टोबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Daily Horoscope, October 9, 2025 : जाणून घ्या, तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा दिवस!

नवशक्ती Web Desk

मेष - घरातील वातावरण खेळीमेळीचे ठेवण्याचा प्रयत्न करा. महत्वाच्या निर्णयांमध्ये घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घ्या तो आपणास फार उपयोगी पडणार आहे.

वृषभ - लहान भावंडांना मदत करावी लागेल त्यामुळे घरामध्ये छोटी मोठी वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. आर्थिक नियोजन उत्तम असेल.

मिथुन -खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. खर्चावर नियंत्रण ठेवणे खूपच आवश्यक आहे. अनावश्यक खर्च टाळावा, उत्पन्न कमी खर्च वाढेल अशी स्थिती होऊ देऊ नका.

कर्क - व्यवहार करताना भावानेचा विचार करू नका.आर्थिक नुकसान होईल नंतर वाईट वाटून घेण्यात काही अर्थ नाही. महत्त्वाची कामे सहजतेने करा ती यशस्वी होतील.

सिंह - प्रवासाचे योग आहे हे महत्त्वाचे व्यवहार करताना नीट विचार करा नियम व अटी पाळून मगच व्यवहार करा.गुंतवणूक करताना कागदपत्रे नीट पहा मगच सही करा.

कन्या -आर्थिक बाजू बळकट राहील. व्यवसायामध्ये अपेक्षित यश मिळेल. आर्थिक खर्च होणार आहे. जोडीदाराचे ऐकावे लागेल. मुलांना तुमचा आधार वाटेल, घरामध्ये वातावरण आनंदी असेल.

तुळ - नोकरी-व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल प्रवास करताना सांभाळून करा महत्त्वाच्या कामांना प्राधान्य दिल्यास ती लवकर होतील.

वृश्चिक - निरनिराळी कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न कराल ती सहजरीत्या मार्गी होतील. व्यवसायिकांच्या व्यवसाय चांगल्या प्रकारे होईल.

धनु - कितीही मोठा फायदा मिळणार असला तरी नियम अटी पाळून हाच व्यवहार करा. नंतर त्रास होऊ शकतो, त्यासाठी मनोबल वाढवावे लागेल आत्मविश्‍वासपूर्वक काम करा.

मकर - समाजसेवा करण्यास खूप वेळ द्यावा लागेल, त्यामुळे स्वतःची कामे राहणार नाहीत याची काळजी घेणे आवश्यक आहे. व्यवसायात प्रतिस्पर्धी सुरज निर्माण करण्याची शक्यता आहे.

कुंभ - कामानिमित्त खूप धावपळ करावी लागेल, दगदग होणार आहे. कामे खूप कष्टपूर्वक पूर्ण करावी लागतील आपल्याला आज थकवा जाणवणार आहे. प्रॉपर्टीच्या कामांकडे लक्ष द्यावे लागेल.

मीन - धार्मिक कार्यासाठी प्रवास होऊ शकतो. महत्वाचे कामाचे नियोजन चांगले होईल. कामे सहजतेने होतील. सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचा सहयोग मिळेल प्रतिष्ठा प्राप्त होईल.

शासकीय जमिनीवरील पात्र घरांना कायदेशीर मान्यता; २०११ पूर्वीच्या पात्र घरांसाठी सुवर्णसंधी; ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Mumbai : पोलिसांची गाडी रोखणाऱ्या 'त्या' तरुणीची सायबर सेलमध्ये धाव; ऑनलाइन छळ, अश्लील ट्रोलिंगविरोधात तक्रार

Thane : सिग्नलवरील प्रतीक्षा अवधी १५ सेकंदांवर येणार; वाहतूक सुधारणा प्रकल्पाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

आता पैशामुळे शस्त्रक्रिया थांबणार नाहीत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

मुंबईत ३३ ठिकाणी फ्लड गेट; पूरस्थितीचा इशारा देणारी सेन्सर यंत्रणा उभारणार; २०२९ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट