राशीभविष्य

जानेवारी महिना कसा जाईल? बघा मेष आणि वृषभ राशीचे भविष्य

तुमच्यासाठी कसा आहे जानेवारी महिना? जाणून घ्या...

नवशक्ती Web Desk

डॉ. सविता महाडिक, ज्योतिष भूषण

मेष राशी

प्रगती - उन्नती करू शकाल

मेष राशीत अश्विनी भरणी व कृतिका ही तीन नक्षत्रे येतात. अश्विनी नक्षत्राचा चौथा चरण, भरणे नक्षत्राचा चौथा चरण व कृतिका नक्षत्राचा पहिला चरण अशा नऊ चरणांनी मेष रास बनते. सव्वा दोन नक्षत्रातील ताऱ्यांनी बनलेली व आकाशात प्रत्यक्षात दिसणारी मेंढ्याची आकृती म्हणजेच मेष रास होय. मेष म्हणजे मेंढा. अविचाराने धडक मारण्याची प्रवृत्ती, निकराची लढत देणे हे मेंढ्याच्या अंगातील नैसर्गिक गुण मेष राशीत आढळतात. मेष राशी नेहमी एक आकड्याने दर्शविली जाते. जन्म कुंडलीत जेथे एक आकडा दर्शवितात तेथे मेष रास आहे असे समजावे.

शिक्षण : सध्याच्या काळामध्ये शिक्षणासाठी अनुकूल वातावरण आहे. परंतु अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे. कला तसेच क्रीडा क्षेत्रात अनुकूलता लाभेल. चांगले यश प्राप्त करता येईल. परदेशातील शिक्षणासाठी अनुकूल कालावधी आहे. परदेशी जाऊन उच्च शिक्षण घेण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. इतरांचे तसेच कुटुंबाचे सहकार्य लाभेल. उज्वल यशासाठी आपले प्रयत्न सातत्याशील असले पाहिजेत.

पारिवारिक : परिवारातील सदस्यांना आपले कार्य करण्यासाठी वेळ लागण्याची तसेच कंटाळा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामात उशीर होण्याचा संभव आहे. अशा वेळेस कामाचे नियोजन करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे तुम्हाला शिस्त आपल्या अंगी स्वीकारावी लागणार आहे. लहान मोठ्या कारणांनी कुटुंबांच्या सदस्यांमध्ये वादविवाद घडण्याची शक्यता आहे. परंतु मन शांत ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे घरातील शांतता टिकून राहू शकते. घरामध्ये शुभ वार्ता समजतील. त्यामुळे घरातील वातावरण सुख व आनंद देईल. आर्थिक आवक चांगली राहील. त्यामुळे सर्व गरजा पूर्ण होतील. मात्र घरातील शांतता टिकवण्यासाठी आपल्याला विशेष प्रयत्नांची आवश्यकता आहे.

नोकरी-व्यापार-व्यवसाय : नवीन वर्षाची सुरुवात आनंदात होईल. काही नवीन संकल्प हाती घ्याल. ते योग्य त्यावेळी परिपूर्ण होतील त्याप्रमाणे मार्ग मिळत राहतील. यशाचे प्रमाण वाढेल. आपल्या कार्यक्षेत्रात नोकरी व्यापार व्यवसायात आपण प्रगती करू शकाल. नोकरीमध्ये पदोन्नती तसेच वेतनवृद्धीचे योग आहेत. मात्र बदलीची तयारी ठेवा. जबाबदाऱ्या वाढून कामाच्या स्वरूपातही बदल घडू शकतो. सरकारी नोकरीत मानसन्मानाचे योग आहेत. अधिकार क्षेत्र वाढेल अतिरिक्त कार्यभार स्वीकारावा लागू शकतो. परंतु लहान मोठ्या प्रलोभनांपासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करा. कुटुंब परिवारात आनंदी आणि उत्साही वातावरण राहील. कुटुंबातील मुला - मुलींच्याकडून सुवर्तांचा ओघ येत राहील. जोडीदार पूर्णपणे आपल्याबरोबर असेल त्याची चांगली साथ मिळेल. भागीदारीचे व्यवसायात भागीदाराच्या मताला उचित प्राधान्य देणे हिताचे ठरेल ते व्यवसायासाठी पोषक ठरेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे वेळ लक्ष देणे उज्वल भविष्यसाठी हितकारक ठरेल.

शुभ दिनांक : २, ५, ६, १५, २१, २२, २३,२५,२९

अशुभ दिनांक : १,४,१०,१७,१८,१९,२०,२७,३०,३१

वृषभ राशी

मनासारख्या घटना घडतील

वृषभ राशिमध्ये कृतिका नक्षत्राचे दुसरे तिसरे व चौथे चरण, रोहिणी नक्षत्राचे चौथे चरण, मृगशीर्ष नक्षत्राचे पहिले व दुसरे चरण इत्यादी मिळून वृषभ राशी तयार होते. कृतीकेमध्ये मृग नक्षत्रातील ताऱ्यांनी तयार झालेल्या व आकाशात प्रत्यक्ष दिसणाऱ्या बैलाच्या आकृती वृषभ राशी, असे म्हणतात. कष्टाळूपणा, सोशिकपणा, सतत कार्य करण्याची प्रवृत्ती व धमक दीर्घोउद्योगी हे नैसर्गिक गुण वृषभ राशीमध्ये असतात. नेहमी दोन आकड्यांनी दर्शविली जाते. कुंडलीमध्ये ज्या भावात दोन आकडा मांडलेला आहे त्याबाबत असे समजावे.

शिक्षण : आपल्याला अभ्यासासाठी सदरच्या कालावधीमध्ये व्यवस्थित लक्ष देणे जरुरी आहे. अभ्यासासाठी चांगला वेळ देण्याची गरज आहे. तसेच इतरत्र वेळ वाया घालवू नये. कुसंगत व आळस यांच्यापासून दूर राहावे. आपले लक्ष केंद्रित करूनच अभ्यास करावा. लक्ष केंद्रित करून अभ्यास केल्याने आपल्याला इच्छित यश प्राप्त होईल. ग्रहांची अनुकूलता काही प्रमाणात आपल्याला मिळणारच आहे. त्यामुळे परिश्रम घेण्याची तयारी ठेवणे गरजेचे आहे. परदेशातील शिक्षणासाठीही योग्य दिशेने प्रयत्न करणे आवश्यक आहे. परदेशी जाऊन उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न साकार होऊ शकते. कला व क्रीडा क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करण्याच्या अनेक संधी उपलब्ध होतील. परंतु त्या संधीचे सोने करून घेणे आपल्या हाती आहे, हे लक्षात ठेवावे.

पारिवारिक : आपल्या परिवारामध्ये एकूणच वातावरण चांगले राहील. परिवारातील तरुण-तरुणींचे प्रश्न सुटतील. काहींचे विवाहविषयक प्रश्न संपुष्टात येतील. विवाह ठरण्यामध्ये ज्या समस्या येत होत्या अशा समस्या सुटतील. त्याचप्रमाणे नोकरीविषयक असलेले प्रश्नसुद्धा सुटून नोकरी विषयक कामे होतील. त्यासाठी ओळखी - मध्यस्थी उपयोगी पडतील. कुटुंब परिवारातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्याकडून शुभ वार्ता मिळू शकतात. त्यांची प्रगती होईल. त्यामुळे घरामध्ये आनंदी आणि उत्साही वातावरण राहील. काही वेळेस कुटुंब परिवारामध्ये काही समस्या उपस्थित होण्याची शक्यता आहे. अशा वेळेस सामंजस्याने त्या समस्यांच्याकडे बघितल्यास त्या सोडवण्यासाठी सोप्या जातील. आपल्याला या कामी पुढाकार घेणे गरजेचे राहील. कुटुंब परिवारातील ज्येष्ठ व्यक्तींची या कामी आपल्याला मदत मिळू शकते.

नोकरी-व्यापार-व्यवसाय : याकालावधीत सकारात्मक घटना घडतील. आपण एखादे महत्त्वाचे काम पूर्ण कधी होईल याची वाट बघत होता ते काम पूर्ण होईल. कोर्ट - कचेरीमधील चालू असलेले खटल्यांचे निकाल आपल्या बाजूने लागल्यामुळे आपण आनंदी आणि उत्साही राहाल. नोकरीमध्ये अपेक्षित घटना घडतील. पदोन्नती अथवा वेतनवृद्धी मिळू शकते. कामाच्या स्वरूपात बदल घडेल. व्यवसाय धंद्यात काही कारणांमुळे अथवा भांडवली खर्चासाठी आर्थिक मदतीची गरज भासू शकते. ती मदत सहज उपलब्ध होईल. बँकांची कामे होतील. आपणास आवश्यक असणारी भांडवली रक्कम मिळू शकेल. त्यामुळे व्यापार व्यवसायात वृद्धी होईल व व्यापार धंद्यातील परिस्थिती समाधानकारक राहील. नवीन करार होतील.

शुभ दिनांक : ६, ८, ११, १२, १३, २३, २५

अशुभ दिनांक : १, ४, १०, १७, १८, १९, २०, २७, ३०, ३१

न्यायालयीन कर्मचाऱ्यांना दिलासा; निवडणुकीच्या कामाला स्थगिती; BMC आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर HC ची नाराजी

Thane Election : शिवसेनेने भाजपला दाखवला 'कात्रजचा घाट'; अडचणीच्या नऊ जागा देत धोबीपछाड

नवी मुंबईतील मतदार करणार ३ ते ४ वेळा मतदान; बहुसदस्यीय पद्धतीने प्रथमच निवडणूक; व्यापक जनजागृतीची गरज

HIV कर्मचाऱ्याला नोकरीत कायम करा! उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

बदलापूर, कर्जतदरम्यान तिसरी-चौथी रेल्वे मार्गिका; उपनगरीय, लांब पल्ल्यांची रेल्वे सेवा अधिक गतिमान होणार