जानेवारी महिना कसा जाईल? बघा मिथुन आणि कर्क राशीचे भविष्य 
राशीभविष्य

जानेवारी महिना कसा जाईल? बघा मिथुन आणि कर्क राशीचे भविष्य

तुमच्यासाठी कसा आहे जानेवारी महिना? जाणून घ्या...

नवशक्ती Web Desk

डॉ. सविता महाडिक, ज्योतिष भूषण

मिथुन

विवाह योग

मिथुन रास ही अद्रा नक्षत्राचे चौथे चरण, मृगशीर्ष नक्षत्राचा तिसरा व चौथा चरण पुनर्वसु नक्षत्राचे पहिले दुसरे व तिसरे चरण असे नऊ चरण मिळून मिथुन रास तयार होते. मृगशीर्ष नक्षत्राचा तिसरा चरण, पुनर्वसू नक्षत्राचा तिसरा चरण अशा नक्षत्रातील तारकात्मक मिळून मिथुन राशि तयार होते. आकाशात दिसणारे पती-पत्नीचे किंवा नवरा-बायकोचे जोडपे आहे. पुरुषाच्या हातात शारीरिक सामर्थ्यदर्शक गदा आहे, तर स्त्रीच्या हातात तंतुवाद्य आहे. त्यामुळे शारीरिक बल, संगीत तज्ञता, कला व प्रेम यांचे प्रतीक मिथुन राशीत आहे. पाश्चात्य ज्योतिष शास्त्राच्या मते दोन जुळी अर्भके मिळून मिथुन रास तयार होते .

शिक्षण : कला, क्रीडा व तांत्रिक शिक्षणात सातत्याने अभ्यास केल्याने चांगली प्रगती होईल, अभ्यास करताना मन शांत व एकाग्र करून अभ्यास करावे लागणार आहे. त्यामुळे अपेक्षित यश साध्य होईल. सध्याच्या काळात अभ्यासामध्ये मन एकाग्र करून ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. परदेशातील शिक्षणासाठी चांगल्या प्रयत्नांची आवश्यकता आहे.त्याचप्रमाणे हे प्रयत्न योग्य दिशेने सुद्धा करणे गरजेचे राहील. गुरुजनांचे मार्गदर्शन व मदत आपल्याला मिळू शकते. कला व क्रीडा क्षेत्रात पूर्ण मेहनतीने आपल्याला अपेक्षित यश प्राप्त करता येईल.

पारिवारिक : कुटुंबात चांगले वातावरण राहील. परंतु त्यात घडणाऱ्या लहानसहान घटनांकडे आपल्याला बारीक लक्ष ठेवणे गरजेचे राहील. विशेषतः कुटुंबातील मुला- मुलींकडे व त्यांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. काही वेळेस कुटुंबातील सदस्यांमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून मतभेद होण्याची शक्यता आहे. घरातील सलोखा टिकवण्यासाठी आपल्याला विशेष प्रयत्न करावे लागतील. आर्थिक परिस्थिती चांगली राहिल्याने कुटुंबातील सर्व सदस्यांच्या गरजा पूर्ण होतील. त्यामुळे समाधानाचे व आनंदाचे वातावरण राहील. काही मतभेद सामंजस्याने सोडविता येतील.

नोकरी-व्यापार-व्यवसाय : कुटुंबातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरतील. विवाह ठरण्यामध्ये ज्या अडचणी येत होत्या अथवा समस्या येत होत्या अशा समस्या दूर होऊन मंगलकार्य ठरेल. लांबलेले विवाह ठरतील. नोकरीमध्ये चांगले वातावरण राहील. वरिष्ठ तसेच सहकाऱ्यांचे वाढते सहकार्य मिळेल. अवघड वाटणारे काम सहजी पूर्ण होऊ शकते. बुद्धिजीवी मंडळींचे उपक्रम यशस्वी होताना दिसतील. कवी, लेखक साहित्य क्षेत्रातील मंडळींच्या हातून चांगली कलाकृती निर्माण होऊ शकते. खेळाडू व कलाकारांना अनुकूलता लाभेल. नवनवीन संधी उपलब्ध होतील, यशाची परंपरा सतत राखली जाईल, व्यवसाय-धंद्यात नवीन करार होऊ शकतात. परदेशवारीची शक्यता. काही वेळेस कुटुंबात लहान-मोठ्या कारणांवरून वादविवादांची शक्यता. एखादी गुप्त चिंता सतावू शकते.

शुभ दिनांक : ६, ८, ११, १२, १३, १५, २१, २५, २८, ३९

अशुभ दिनांक : १, ४, १०, १७, १८, १९, २०, २७, ३०, ३१

कर्क

वैवाहिक जीवन आनंदी राहील

कर्क रास ही पुनर्वसु नक्षत्राचा चौथा चरण. आश्लेषा नक्षत्राचे चार चरण व पुष्य नक्षत्राचे चार चरण. असे नऊ चरण मिळून कर्क रास तयार होते. पुनर्वसू नक्षत्राचा चौथा चरण ते आश्लेषा नक्षत्रातील ताऱ्यांनी तयार झालेल्या आणि खगोलामध्ये प्रत्यक्षात दिसणाऱ्या खेकड्याच्या आकृतीस कर्क राशी असे म्हणतात. कर्क म्हणजे खेकडा. प्रबलांशी नमते घेणे व दुर्बलांवर आक्रमण करणे हे खेकड्याच्या अंगातील ठळक गुण या राशीमध्ये दिसतात. खेकड्याच्या चालीप्रमाणे कर्क राशी बलवान असणाऱ्या व्यक्तीची चाल म्हणजे पावले सरळ न पडता ती एकमेकांच्या पुढे पडत असल्याने अशी व्यक्ती चालता चालता रस्त्याच्या एका बाजूस गेलेली दिसते. या विशिष्ट चालीवरून कर्क राशीप्रधान व्यक्ती ओळखता येते. गुप्तपणे टेहळणी करून सावध हस्तगत करणे व पकडलेल्या सावजाचे तुकडे तोडणे या खेकड्याच्या गुणाप्रमाणे कर्क राशिफल असणाऱ्या मानवात नैसर्गिक गुण आढळतात. कर्क राशी ही चक्रातील चौथी राशी आहे. ती चार आकड्याने दर्शवितात.

शिक्षण : आपल्याला अभ्यासासाठी चालू कालावधी. आपल्याला शिक्षणातील कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती कार तसेच अनुकूल राहील. शिक्षणासाठी ग्रहमान चांगले आहे. घेतलेल्या कष्टाचे चीज होईल. म्हणजे शिक्षणात परिश्रम घेतल्यास अभ्यासामध्ये मन केंद्रित केल्यास अपेक्षित यश सहज साध्य होऊ शकते. स्पर्धा परीक्षेमध्ये स्पर्धात्मक यश प्राप्त होण्याची शक्यता आहे. परदेशी जाऊन उच्च शिक्षण घेण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. कला व क्रीडा क्षेत्रातही चांगले यश प्राप्त करता येऊ शकते.

पारिवारिक : परिवारातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या आपण पूर्ण करू शकाल. अर्थमान चांगले राहील, परिवारात जास्त जबाबदारी घ्यायला लागणार आहे अर्थात जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होणार आहे, परंतु आपण आपल्या जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडणार आहात. आर्थिकदृष्ट्या हा कालावधी बऱ्यापैकी चांगला आहे. घरातील मतभेद असल्यास ते संपुष्टात येतील. ते वाढू नयेत यासाठी आपण चांगले प्रयत्न करणार आहात. कुटुंबात एखादे मंगलकार्य घटित होण्याची शक्यता किंवा मंगलकार्याचे नियोजन होऊ शकते. तरुण-तरुणींचे प्रश्न सोडवण्यामध्ये यश प्राप्त होईल.

नोकरी-व्यापार-व्यवसाय : कुटुंबातील तरुण-तरुणींचे भाग्योदय होतील. त्यांच्या समस्या संपुष्टात येतील. नोकरीविषयक कामे होतील. पूर्वी दिलेल्या मुलाखतीतून नोकरीसाठी बोलावणे येऊ शकते तसेच कुटुंबातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरतील. विवाह ठरण्यामधील अडचणी दूर होतील. प्रेमात यश लाभेल, मात्र मर्यादा सांभाळा. गैरसमज होण्याची दाट शक्यता. नवपरिणितांना अपत्य लाभ. पती-पत्नीतील मतभेद संपुष्टात येतील. वैवाहिक जीवनाचा आनंद लुटता येईल. सहकुटुंब, सहपरिवार प्रवास होईल. पर्यटनानिमित्त अथवा व्यक्तिगत कारणांनी प्रवास घडू शकतो. काही वेळेस धार्मिक स्थळांना भेट देऊ शकाल.

शुभ दिनांक : ६, ८, ११, १२, १३, २३, २५

अशुभ दिनांक : १, ४, १०, १७, १८, १९, २०, २७, ३०, ३१

Mumbai : तिकीट मागितलं, थेट CBI चं ओळखपत्र दाखवलं; लोकलच्या फर्स्ट क्लासमधून प्रवास करणाऱ्या तोतयाचं बिंग फुटलं

मीरा-भाईंदरमध्ये आचारसंहिता भंगाचा पहिला गुन्हा अखेर दाखल; भाजप पदाधिकाऱ्यांची नावे जाणीवपूर्वक टाळल्याचा गंभीर आरोप

१ फेब्रुवारीपासून सिगारेट, गुटखा महाग; उत्पादन कर वाढवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

पुण्यात युतीबाबत अजित पवार-शिवसेनेचे संकेत; महायुतीतील पेच सोडवण्यासाठी हालचाली

महायुतीचे २२ बिनविरोध; भाजपच्या सर्वाधिक १२, तर शिंदे सेनेच्या ७ उमेदवारांना लाॅटरी; अर्ज छाननीत विराेधकांना फटका