राशीभविष्य

जून महिना कसा जाईल? बघा सिंह आणि कन्या राशीचे भविष्य

तुमच्यासाठी कसा आहे जून महिना? जाणून घ्या...

नवशक्ती Web Desk

डॉ. सविता महाडिक ज्योतिष भूषण

सिंह

मित्रमंडळींच्या वर्तुळातून लाभ

मघा नक्षत्राचे चार चरण, पूर्वा नक्षत्राचे चार चरण, उत्तरा नक्षत्राचा पहिला चरण असे नऊ चरण मिळून सिंह राशी तयार होते. मघा नक्षत्राची नाडी अंत्य आहे, योनी उंदीर आहे, गण राक्षस आहे, आराध्य वृक्ष वड आहे, दान गूळ व मीठ आहे, देवता पिता आहे, मुख अधो, स्वामी केतू तत्त्व, अग्नी संज्ञा उग्र आहे. पूर्वा नक्षत्राची नाडी मध्य, योनी मूषक, गण मनुष्य, आराध्य वृक्ष पळस आहे. दान अन्न, देवता भग आहे, मुख अधो आहे, दृष्टी सुलोचन आहे, स्वामी शुक्र, तत्त्व अग्नि, संज्ञा उग्र आहे. उत्तरा नक्षत्राची नाडी आद्य, योनी गो आहे, गण मनुष्य, आराध्य वृक्ष पायरी आहे, दान मोती, देवता आर्यमा, मुख उर्ध्व, दृष्टी अंध आहे, स्वामी सूर्य तत्त्व, वायू संज्ञा ध्रुव आहे.

शिक्षण : या कालावधीमध्ये शिक्षणासाठी कालावधी अत्यंत अनुकूल आहे. ग्रहण क्षमता चांगली राहील. त्यामुळे अभ्यासामध्ये मन लागेल. मन एकाग्र करता येईल. कला व क्रीडा क्षेत्रातही चांगले यश मिळणार आहे. मात्र प्रामाणिक प्रयत्नांची गरज राहील. स्वतःच्या चांगल्या प्रयत्नाने आपणास उज्ज्वल यश मिळेल. इतरत्र वेळ वाया घालवू नये. परदेशातील शिक्षणासाठी सुद्धा चांगला कालावधी आहे. केलेल्या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळून चांगले यश मिळणार आहे.

पारिवारिक : अतिशय गतिमान असे ग्रहमान राहील. मनासारख्या घटना घटीत होत असलेल्या बघून आश्चर्य वाटेल. कुटुंबातील तरुण- तरुणींनी नोकरीसाठी दिलेल्या मुलाखती यशस्वी होतील. कुटुंबात आनंदोत्सव साजरा कराल. नवविवाहितांचे प्रश्न सुटतील. विशिष्ट प्रवासातील कामे यशस्वी होतील. त्याचप्रमाणे काहींना राजकीय लाभ मिळतील. काही वेळेस खरेदी-विक्रीतील मोह टाळा, मात्र कायदेशीर बाबी जपा. कायदेशीर बाबींचे तंतोतंत पालन हितकारक ठरेल. एकंदरीत शुभ फळे प्रतिपादित होतील. काही वेळेस चालू नोकरीमध्ये अपवादात्मक पार्श्वभूमीवरून लाभ मिळू शकतात.

नोकरी, व्यवसाय, धंदा : स्वतःला व्यक्त करण्यासाठी व सृजनशील क्षमतांचा वापर करण्यासाठी हा कालावधी अनुकूल आहे. आपल्या कार्यक्षेत्रात नोकरी, व्यवसाय, व्यापारात अनपेक्षित काही बदल संभवतात. हे बदल आपल्यासाठी पूर्णतः लाभदायक ठरणार आहेत. नोकरीमध्ये वरिष्ठ व अधिकारी वर्गाची कृपादृष्टी राहील. त्यामुळे आपल्यासमोरील कामं आपण उत्साहाने व पूर्ण आत्मविश्वासाने करू शकाल. दीर्घकाळ रखडलेल्या कामांना हातावेगळे करण्यात यश मिळेल. स्वतःच्या घराचे स्वप्न साकार होईल, पण त्या दृष्टिकोनातून प्रयत्नांना महत्त्व आहे. तसेच नवीन वाहन खरेदी करू शकाल. मित्रमंडळींच्या वर्तुळातून विशेष लाभ होऊ शकतात. त्यांच्या मध्यस्थीने आपण आपली रखडलेली कामे पूर्ण करू शकाल. मित्र आपल्याला मदतीचा हात देतील. व्यवसाय, धंद्यात सुद्धा मदत करू शकतील. कुटुंबातील मुला-मुलींसाठी जास्तीचा खर्च होऊ शकतो. तुमच्या व्यक्तिगत व्यावसायिक क्षेत्रात सकारात्मक बदल घडून निश्चितच यशस्वी होणार आहात. अनपेक्षित काही गोष्टी पूर्ण झाल्यामुळे आश्चर्य वाटेल.

शुभ दिनांक : 2,4,5,8,11,16,19,20,23,27

अशुभ दिनांक : 13,14,15,28,30

कन्या

रखडलेली कामे गतिमान होतील

उत्तरा नक्षत्राचा दुसरा, तिसरा व चौथा चरण हस्त नक्षत्राचा, चार चरण चित्रा नक्षत्राचा, पहिला-दुसरा मिळून अशा नऊ चरणांनी कन्या रास तयार होते. उत्तरा नक्षत्राची नाडी आद्य आहे, योनी गो आहे, गण मनुष्य, आराध्य वृक्ष पायरी आहे, दान मोती आहे, देवता आर्यमा आहे. मुख ऊर्ध्व आहे, स्वामी सूर्य तत्त्व, वायू संज्ञा ध्रुव आहे. चित्रा नक्षत्राची नाडी मध्य आहे. योनी व्याघ्र आहे, गण राक्षस आहे, आराध्य वृक्ष बेल आहे, दान पीत वस्त्र, देवता त्वष्टा आहे. मुख तीर्पक आहे, स्वामी मंगळ संज्ञा मृदू आहे.हस्त नक्षत्राची नाडी आद्य योनी महिषी आहे. गण देव, आराध्य वृक्ष जाई, दान अन्न व देवता सूर्य आहे. मुख तिर्पक, दृष्टी मंद, स्वामी चंद्र तत्त्व वायू आहे, संज्ञा क्षिप्र आहे.

शिक्षण : कोणत्याही प्रकारचे शिक्षणासाठी ग्रहमान अनुकूल आहे. त्याचबरोबर ग्रहण शक्ती पण चांगली राहील. अभ्यासात सातत्य ठेवणे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी योग्य प्रयत्न करणे सुद्धा आवश्यक ठरेल. मित्रांबरोबर सुद्धा अभ्यास चांगला होऊ शकतो. त्यांचे सहाय्य मिळू शकते. कला व क्रीडा क्षेत्रातही चांगले यश प्राप्त करू शकाल. आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठीचे केलेले प्रयत्न सफल होतील. परदेशासंबंधी शिक्षणासाठी जरा जास्त प्रयत्न करावे लागणार आहेत. निरनिराळ्या स्तरांवरून प्रयत्न करण्याची गरज आहे. मन स्थिर ठेवून व प्रयत्नात सातत्य ठेवून अभ्यास केल्यास त्याचा चांगला उपयोग होईल.

पारिवारिक : या कालावधीच्या पूर्वार्धामध्ये अचानक लाभाची शक्यता निर्माण होत आहे. निरनिराळे लाभ मिळू शकतात. कुटुंबातील प्रिय व्यक्तींचे भाग्योदय होतील. नोकरीमध्ये अनुकूलता लाभेल. अपेक्षित घटना घटीत होतील. मित्रमंडळींच्या वर्तुळातून निरनिराळे लाभ होण्याची शक्यता. व्यावसायिक येणे वसूल होतील. भावा-बहिणीबाबत असलेले प्रश्न सुटतील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता. कुटुंबातील तरुण-तरुणींचे प्रश्न संपुष्टात येतील. त्यांचे भवितव्य ठरू शकते. त्यांच्या करिअरविषयी महत्त्वाचे निर्णय होतील. नोकरीतून प्रदेशगमनाचे योग आहेत. पदोन्नती, वेतनवृद्धी मिळू शकते. साहित्य क्षेत्र व कलाकारांना प्रसिद्धीसह अर्थार्जन होईल. वैवाहिक जीवनातील चिंतामणी येथील स्वतंत्र व्यावसायिकांना मोठा उत्तेजक कालावधी राहील. वादग्रस्त प्रकरणे मिळतील. कोर्टातील प्रकरण सुटेल. आपल्या बाजूने निकाल होऊ शकतो.

नोकरी, व्यवसाय, धंदा : या कुटुंबातील विवाहयोग्य तरुण- तरुणींचे विवाह ठरतील. त्यांना आपला आवडता जीवनसाथी निवडता येईल. त्याचप्रमाणे कुटुंबातील तरुण-तरुणींचे नोकरीविषयक प्रश्न संपुष्टात येतील. कुटुंबात मुला-मुलींकडून त्यांच्या प्रगतीपर वार्ता समजल्यामुळे वातावरण अल्हाददायक बनेल. उत्साही वातावरणात काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपल्या कार्यक्षेत्रात कार्यमग्न राहणे जरुरीचे आहे. अभ्यासात दुर्लक्ष करू नका तसेच कुसंगतीपासून अलिप्त रहा. आरोग्याची काळजी घेणे जरुरीचे आहे.

शुभ दिनांक : 4,5,8,9,16,17,23,24,27

अशुभ दिनांक : 13,14,15,28,30

बारा वर्षांत देशाचे वाजले की बारा..!

आजचे राशिभविष्य,३ जून २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

Environment Day 2026 : लहानपणापासून मुलांना शिकवा 'या' इको-फ्रेंडली सवयी

उसाचा रस पिताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका

झणझणीत आणि टेस्टी पेरी पेरी पनीर सँडविच; नाश्त्यासाठी परफेक्ट रेसिपी