राशीभविष्य

सप्टेंबर महिना कसा जाईल? बघा मिथुन आणि कर्क राशीचे भविष्य

तुमच्यासाठी कसा आहे सप्टेंबर महिना? जाणून घ्या...

नवशक्ती Web Desk

डॉ.सविता महाडिक

ज्योतिष भूषण

मिथुन रास

विशिष्ट सरकारी कामे पूर्ण होतील

मिथुन राशी ही द्विस्वभावी राशी आहे. ही राशी चंचल आणि बुद्धिमान आहे. या मिथुन राशीच्या जातकांमध्ये बोलकेपणा विशेषत्वाने आढळतो विद्वान विद्या व्यासंगी पाठ शक्ती जास्त असते. शास्त्री, पंडित, वक्ता, बुद्धिवान, कवी ग्रंथकार मंजुळ व प्रिय भाषण करणारा प्रेमळ वर्तणुकीचा ललित कला संपन्न खरे बोलणारा स्वभाव असतो. या राशीच्या व्यक्तींमध्ये खूप चिकाटी असते. धरसोडवृत्ती अधिक असते.

स्त्रियांचा अभिलाषी रुपवान चेहरा सुरेख अनवटीच्या जागी निमुळता आकार अवयव लांबट शरीर सडपातळ उंच वृद्धापकाळात पोक येणारा जास्त जेवणाची आवड असणारा डोळे साधारण तांबूस रंगाचे बातमीदार साहित्यिक वकील तर्ककुशल व बुद्धीच्या दुय्यवान इत्यादी गुणवैशिष्ट्ये मिथुन रास असलेल्या जातकांच्या मध्ये आढळतात.

शिक्षण :-शिक्षणासाठी उत्तम कालावधी आहे आपल्या हातून चांगले प्रयत्न होतील योग्य प्रयत्नांना अपेक्षित यश प्राप्त होईल कोणत्याही क्षेत्रातील शिक्षणासाठी अनुकूलता मिळणार आहे प्रदेशातून चांगल्या संधी प्राप्त होतील कला क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना उत्तम कालावधी आहे तसेच साहित्य वर्ग अशा व्यक्तींना पण अनुकूलता मिळेल. आपण निवडलेल्या शैक्षणिक क्षेत्रात पारंगत होण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी.

पारिवारिक :- आपणास कुटुंब परिवारात महत्त्वाचे स्थान मिळू शकते कुटुंबाप्रती आपल्या जबाबदाऱ्या वाढू शकतात परंतु आनंदी वातावरणाचा लाभ मिळेल घरात सामंजस्याचे वातावरण असेल आर्थिक दृष्ट्या उत्तम कालावधी आहे घरातील प्रत्येक व्यक्तीचा गरजा पूर्ण होतील आनंदी उत्साही वातावरण राहील आनंदासाठी विशेष प्रवास होऊ शकतो प्रवासासाठी खर्च पण होईल मनोरंजनाकडे व अध्यात्मातही आपली रुची वडील सामाजिक तसेच धार्मिक कार्यासाठी खर्च करू शकाल प्रवासाचे योग आहेत.

नोकरी-व्यापार-व्यवसाय :- सप्टेंबर महिन्यात नोकरी-व्यवसायासाठी अनुकूल ग्रहमान आहेत. त्यामुळे त्याचा मोठा फायदा तुम्हाला होऊ शकतो. कालावधीच्या सुरुवातीपासून आपले नियोजन प्रत्यक्षात उतरताना आपल्याला दिसेल विशिष्ट सरकारी कामे मार्गी लागून पूर्णत्वाच्या प्रवासाला लागतील त्यामुळे समाधान लाभेल या कामी विशेषतः पैसा व खर्च दोन्ही करावा लागण्याची शक्यता आहे. कुटुंब परिवारातील पुत्रपौत्रांचा भाग्योदय होईल तरुण-तरुणींचे प्रश्न सुटतील चालू नोकरीत तसेच व्यवसाय धंद्यात परिस्थिती अनुकूल राहील. आर्थिक परिस्थिती सुधारेल मात्र उत्तरार्धात दुखापती सांभाळा. कारण आजारपणाचा त्रास संभवतो. वाहने चालवताना दक्षता घ्या तसेच वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. कारण दुखापत होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे चालू नोकरीमध्ये काही मनाविरुद्ध निर्णय स्वीकारावे लागतील. वरिष्ठांशी मर्जी राखण्याचा प्रयत्न करावा. त्यातून तुम्हाला भविष्यात बढतीची संधी मिळू शकेल. नोकरीमध्ये ताण-तणाव जाणवू शकतात त्याचप्रमाणे मतभेद टाळणे अथवा वादविवाद टाळणे आपल्या हिताचे राहील कुटुंब परिवारात जेष्ठांच्या प्रकृतीची विशेषता मातापित्यांच्या प्रकृतीची काळजी घेणे गरजेचे ठरू शकते सदरचा कालावधी चांगला राहणार आहे.आपण आपली अर्धवट राहिलेली कार्य पूर्ण करू शकाल विशेषतः जमीन जुमला स्थायी संपत्ती वडिलोपार्जित संपत्ती इत्यादी क्षेत्रात अर्धवट राहिलेली कामे अथवा व्यवहार हाता वेगळे करू शकाल. त्यातून चांगला आर्थिक लाभ संभवतो. आपल्या मध्ये आत्मविश्वास बळवणार आहे आपण आपली कार्य चांगल्या रीतीने पूर्ण करणार आहात आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याचा कालावधी आहे इच्छापूर्ती होईल बरेच दिवस एखादी इच्छा मनात राहिलेली आहे अशी इच्छा पूर्ण होईल आपला दृष्टिकोन सकारात्मक असल्या कारणाने आपली कामे सहज व सुरळीत पणे होतील मित्रमंडळींच्या वर्तुळातून तसेच कुटुंब परिवारातून आपल्याला सर्व बाबतीत सहकार्य मिळेल आर्थिक बाबतीत हा कालावधी उत्तम आहे सहकुटुंब सहपरिवार आपण प्रवास करू शकाल धार्मिक तसेच सामाजिक कार्यात सक्रिय योगदान देण्याची इच्छा होईल जुन्या मित्रांच्या गाठीभेटी होतील.विद्यार्थ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात कार्यमग्न राहणे जरुरीचे आहे.

शुभ दिनांक : - २, ९, १७, २२, २३, २७,३०

अशुभ दिनांक : - ७, ८, १३, १५,२१,२५,२७


कर्क रास

महत्त्वाची कामे फलद्रूप होतील

तिरपे व जलद चालणारा उंच कटिं शरीर सडपातळ मध्यम उंची असलेला पुढील दात रुंद व मोठे बोलताना सहज पुढे दिसणारे चेहरा साधारणपणे गोल व मोहक हाताचे आणि पायाचे पंजे मोठे अगोदर शब्द बोलण्याची शक्यता असते चैनी नाटकी निष्काळजी विद्या अभिरुची कमी प्रेम वश प्रेमाच्या तडाख्यात सापडून त्याच विचारात असणारा स्त्री कामे मित्र वत्सल बाग बगीचे व जलाशयाच्या जवळ राहण्याची आवड उत्तम पोहणारा देव तसेच ब्राह्मण यांची पूजा करणारा शरीरात कफ बाहुल्य वारंवार भावंडामध्ये कन्याधिक्य वडील बहिणींची संख्या जास्त कुटुंबात विशेष सभ्य म्हणून गणला न जाणारा गुह्यरोगि भित्रा चंचल बुद्धीचा

संतती लवकर होणारी मादक पदार्थ मोती मीठ मासळी यांचे व्यापारी हा व्यवसाय त्याचप्रमाणे खल्लाशी पाणके असे जातक बहुदा या राशीच्या अंमलाखाली असतात.

शिक्षण :- शिक्षणासाठी हा कालावधी अतिउत्तम आहे परंतु अभ्यास करण्यात एवढेच गरजेचे आहे परसोड वृत्ती नको त्याचप्रमाणे व्यवस्थित तयारी करणे आवश्यक आहे वेळेचे नियोजन उपयोगी पडू शकते त्याचप्रमाणे कुसंगती पासून दूर राहा यामुळे उत्तम यश मिळणार आहे परीक्षेत चांगले यश मिळू शकते प्रामाणिक कष्टांची आवश्यकता स्पर्धा परीक्षेतही यश येणार आहे प्रदेशासंबंधी शिक्षण असल्यास त्यातील यश मिळवू शकाल उत्तम उत्तम संधी येतील परंतु त्या संधीचे सोने करणे आपल्यासाठी आहे हे लक्षात ठेवा.

पारिवारिक :- कुटुंब परिवारामध्ये जास्त जबाबदारी येण्याची शक्यता आहे आर्थिक दृष्ट्या वातावरण चांगले असेल आर्थिक आवक चांगली राहील कुटुंब परिवारातील सदस्यांच्या मध्ये आपापसात मतभेद घडण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्याला आपल्या कुटुंब तसेच घरातील गैरसमज दूर करण्याची आवश्यकता आहे शांतता टिकवण्याची गरज राहील खर्चाचे प्रमाण वाढलेले असले तरी तो खर्च सकारात्मक कारणांसाठी होईल त्याचप्रमाणे खर्चाचे नियोजन करणे गरजेचे ठरेल घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी वाटणार आहे तेव्हा वेळेतच त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या घरातील वातावरण सामंजस्याचे राहणे यासाठी विशेष प्रयत्नांची गरज राहील ते प्रयत्न यशस्वी होणार आहेत.

नोकरी-व्यापार-व्यवसाय :- सध्याच्या ग्रहणामुळे नोकरी व्यवसाय धंद्यामध्ये आपल्याला अनुकूलता लाभेल आपल्या कार्यक्षेत्रात असलेली अथवा दीर्घकाळ प्रलंबित असलेली महत्त्वाची कामे फुलदृप होताना अनुभवास येतील व्यावसायिक तेजी राहील व्यावसायिक नवीन नियोजन फलद्रूप होईल नवीन संकल्पनांचा वापर करू शकाल भागीदाराशी मतभेद नको ते व्यवसायाच्या दृष्टिकोनातून फायदेशीर होणार नाही. व्यावसायिक उलाढाल वाढल्याने नफ्याच्या प्रमाणातही वाढ होईल आर्थिक बाजू भक्कम होईल नोकरीतील ठिकाणी सर्वसामान्य परिस्थिती अनुभवण्यास मिळेल. आपल्या कामाविषयीच्या बाबींच्या मध्ये अथवा ज्ञानामध्ये अद्यावत राहण्याची गरज आहे शिस्त व प्रामाणिकपणा पाळा मतभेद टाळा. कुटुंब परिवारातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरण्याची शक्यता आहे नोकरीतील सुवार्ता येतील. मित्र मंडळींच्या वर्तुळात तसेच आपल्या कुटुंब परिवारात अथवा आपल्या कार्यक्षेत्रात वाद विवाद टाळणे अत्यंत महत्त्वाचे राहील त्याचप्रमाणे काहीसे नुकसान संभवते त्यामुळे सावध राहा. प्रवासामध्ये वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवणे गरजेचे राहील. आपण आपल्या कार्यात कार्यमग्न असल्याकारणाने आपल्या स्वतःच्या कष्टाने व प्रयत्नाने यश खेचून आणाल. आपल्या कामात सातत्य राहणार आहे. कुटुंब परिवारातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करू शकाल कुटुंबाकडे जास्त लक्ष द्यावे लागणार आहे. कुटुंबात समस्या अडचणी निर्माण झाल्यामुळे त्याच्याशी जुळवून घेणे व समस्या सोडवणे आपली प्राथमिकता राहील आपण उत्साही व मानसिक दृष्ट्या कणखर राहिला तर सर्व आघाड्यांवर यश मिळू शकते आपण आपल्या स्वतःच्या सकारात्मक विचारांनी सर्व दृष्टीने प्रयत्नशील राहणार आहात. स्वतः उत्पन्न वाढवणार आहात. उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधून काढाल. तुमच्या सहकारी व वरिष्ठांशी सुसंवाद साधा स्वतःच्या प्रकृतीची पण काळजी घ्या. बदलेल छोट्या मोठ्या कुरबुरी चालू राहण्याची शक्यता आहे.

शुभ दिनांक : - ४, ६, ९, ११, १७, १९,२२,२७,३०

अशुभ दिनांक : ७, ८, १३,१५,२१,२५,२७

२४ तासांत आंदोलकांना हटवा! मुंबई उच्च न्यायालयाचा जरांगे यांना अल्टिमेटम; आझाद मैदानात फक्त पाच हजार आंदोलकांना परवानगी

सुहाना खानच्या अडचणी वाढणार? शेतजमीन खरेदीवर वाद; अटींचा भंग केल्याचा आरोप; महसूल विभागाकडून चौकशी सुरू

Maratha Reservation : आंदोलनाला ‘खेळकर’ रंग; आंदोलकांचे मुंबईत क्रिकेट, कबड्डी, खो-खो

पुण्याहून आझाद मैदानाकडे निघालेल्या मराठा बांधवांवर पनवेलमध्ये किरकोळ कारणावरून हल्ला; ५ जण जखमी, दोघांना अटक

मत चोरीच्या अणुबॉम्बनंतर आता हायड्रोजन बॉम्ब येणार; मोदींना चेहरा लपविण्यासाठीही जागा मिळणार नाही; राहुल गांधींचा मोठा इशारा