डॉ.सविता महाडिक, ज्योतिष भूषण
सिंह रास
गुप्त चिंता संपुष्टात येतील
उग्र चेहरा, हनुवटीचा भाग स्थूल, मोठे मुख, पिंगट डोळे, मजबूत छाती, रुंद भारदार कपाळ, विस्तीर्ण नाक, काही वेळेस नकटे असू शकते, छाती पुढे काढून चालणारा, धर्माचरणाची परवा न करणारा, गंभीर, कमी बोलणारा, साहसी, किल्ले व राजधानीची ठिकाणे, पर्वत, प्रदेश येथे निवास आवडणारा, विद्या साधारणतः, प्रख्यात, तालीमबाज, वर्ण सावळा, आवाज मोठा, घरीदारी जबाबदारी घेणारा, कुटुंबवत्सल, अंमलदार, धैर्यवान, त्वरित रागावणारा, तहानभूक जास्त लागणारा, उदार, अभिमानी, मातृभक्त, शेतीची विशेष आवड असणारा, शृंगारात न गुंतणारा, साधुसंतांची सेवा करणारा, त्यांच्याविषयी भक्तिभाव ठेवणारा, श्रद्धावान, शत्रूंवर विजय मिळवणारा, अशी सर्वसाधारण वैशिष्ट्ये सिंह राशीच्या व्यक्तींच्या स्वभावात असतात.
शिक्षण :- सर्व प्रकारच्या शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षण घेण्यासाठी सदरचा कालावधी उपयुक्त ठरेल. आपल्या सततच्या प्रयत्नाने व अभ्यासात मग्न राहिल्याने आपणास हवे तसे यश मिळवता येईल, कला व क्रीडा क्षेत्रात विशेष अनुकूलता लाभेल, आपले कर्तृत्व सिद्ध करण्याच्या अनेक संधी प्राप्त होतील, प्रदेशासंबंधी आपणास चांगले परिणाम मिळणार आहेत. त्यामुळे या महिन्यात आपणास यश जास्त मिळेल, प्रयत्न योग्य दिशेने झाल्याकारणाने यशाच्या प्रमाणात वाढ होऊन अपेक्षित यश मिळवू शकाल.
पारिवारिक :- कुटुंबातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरू शकतात. परिवारात आनंदाचे वातावरण राहील. त्यामुळे मनोरंजनासाठी जास्त खर्च होण्याची शक्यता आहे. अर्थमानसुद्धा समाधानकारक असेल. त्यामुळे घरात खेळीमेळीचे वातावरण राहणार आहे. कुटुंबातील शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींकडून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसंबंधी वार्ता कळल्यामुळे वातावरण आनंदी राहील. सहकुटुंब-सहपरिवार धार्मिक, पवित्र स्थळी भेटी देण्याचे योग आहेत. अर्थमान सुधारेल. दानधर्माची आवड राहील. अध्यात्मक रुची वाढेल.
नोकरी-व्यापार-व्यवसाय :- काही शुभ ग्रहांचे योग आपल्या कारकीर्दीला एक नवी उभारी देतील. आपण आपल्या कार्यक्षेत्रात मोठी झेप घेऊ शकाल. व्यवसाय-धंद्यात आपली स्वतंत्र ओळख मिळवाल. बदलत्या सरकारी धोरणाचा फायदा व्यवसायात होईल. सरकारी माध्यमातून चांगले लाभ मिळतील. एकूणच आपणास घवघवीत यश प्राप्त होईल. कुटुंबातील वातावरण चांगले राहील. विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरतील. प्रेमात यश संपादन करू शकाल. कुटुंबातील गर्भवती महिलांनी स्वतःची काळजी घेणे अपरिहार्य ठरेल. आरोग्याकडे लक्ष ठेवणे हिताचे राहील. खासगी कामानिमित्त अथवा आपल्या कार्यक्षेत्रीय कारणांमुळे जवळचे तसे दूरचे प्रवास करावे लागतील. प्रवासात सावध राहावे, दुखापतीची शक्यता. वाहनाच्या वेगावर नियंत्रण हवे. उत्तरार्धात उष्णताजन्य विकारांपासून सावध राहा. कुटुंबात निरनिराळ्या ठिकाणाहून शुभ वार्ता मिळाल्यामुळे आनंदात भरच पडेल. जवळच्या व्यक्तींचे भाग्योदय होतील.
पण उत्साहाच्या भरात अति आत्मविश्वासाने धोका पत्करू नका. काही वेळेस अचानक धन लावायचे योग आहेतजुगार सदृश्य व्यवहार टाळणे हिताचे राहील मालमत्तेच्या व्यवहारातून आपणास चांगला फायदा होणार आहे आर्थिक बाजू मजबूत राहील.आरामदायी वस्तूंवर खर्च होईल.
शुभ दिनांक : - १, ४, ७, ९, १०, १२, १३,१५,१६,२५,२६,२७,२९,३०
अशुभ दिनांक : -२,५,६,८,१४,१८,१९,२०
कन्या रास
जुगारसदृश व्यवहार टाळा
लज्जित राहणे, चालणे, मान वाकडी करून चालणारा, चालताना व बोलताना हातवारे करणारा, चेहरा रुंद व गोल असतो. उंची मध्यम असते. स्त्रियांची लक्षणे विशेष असतात. सुकुमार रतिप्रिय परगृह व परधन यांचा उपभोग घेणारा, प्रिय भाषणे, पवित्र वर्तनाची आवड असणारा. लोकोपयोगी कामाची हौस, ललित कला, जुन्या पद्धतीच्या चालीरीतींमध्ये विशेष रस घेणारा, जुन्या पद्धतीचे वर्तन विशेष प्रिय असणारा, दयाळू, देशाटन करणारा, नेहमी आनंदी राहणारा, हसत बोलणारा, चांगल्या पदार्थांची आवड असणारा, पोशाखाची व टापटीपपणाची आवड न ठेवणारा, विद्वान लोकांशी परिचय ठेवणारा, काळजी कमी असणारा, साधारण विद्वान, शास्त्र व्यासंगी, वात व कफाचे प्राबल्य असणारा इत्यादी वैशिष्ट्ये कन्या राशींच्या व्यक्तींमध्ये प्रामुख्याने दिसतात.
शिक्षण :- या कालावधीमध्ये शिक्षणासाठी अनुकूल ग्रहमान असल्यामुळे आपल्याला शिक्षणक्षेत्रामध्ये अपेक्षित यश प्राप्त होईल. यशाचे प्रमाण वाढेल, इतरांची मदत मिळू शकते. परंतु आपल्या अभ्यासात व प्रयत्नात सातत्य राखणे जरुरी ठरेल. कला व क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींनाही चांगला कालावधी आहे. परदेशासंबंधी शिक्षणासाठी घेतलेले कष्ट चांगले फळ मिळवून देतील. परदेशी जाऊन उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न साकार होईल. कुटुंब व परिजनांकडून सहाय्य मिळू शकते. गुरुजनांचे मार्गदर्शन मिळेल. शिक्षणासाठी चांगला आत्मविश्वास व धैर्य राखाल. फक्त कोणतेही काम अर्धवट सोडू नये. अपेक्षित यश मिळवू शकाल. परदेशी जाऊन उच्च शिक्षण घेण्याचे मार्ग प्रशस्त होतील.
पारिवारिक :- कुटुंबातील वातावरण एकंदरीत सामंजस्याचे राहील, अनुकूल वातावरण राहील, आर्थिक बाबतीत चांगले स्थिर राहाल. आपल्या सर्व जबाबदाऱ्या समर्थपणे पेलण्याची आपली चांगलीच कुवत असेल, सर्व निर्णय धाडसाने घ्याल व ते निर्णय योग्य ठरतील. कुटुंबात आनंदासाठी जास्त खर्च होण्याची शक्यता आहे. आर्थिक आवकही समाधानकारक राहील, त्यामुळे शांत व समाधानकारक वातावरणाचा लाभ मिळेल.
नोकरी-व्यापार-व्यवसाय :- या महिन्यात आपल्याला आर्थिक बाबतीत सावधानतेने पाऊल उचलणे हिताचे ठरेल, नव्या गुंतवणुका सध्या तरी नकोत. कुठल्याही जाहिरातबाजीला बळी पडू नका तसेच कोणाच्या गोड बोलण्यालाही फसू नका. तेजी-मंदीविषयक व्यवहार टाळा. तसेच निरनिराळ्या सभासमारंभात अथवा कार्यात वादविवाद टाळण्याचा प्रयत्न करा. नाहीतर रंगाचा बेरंग होण्याची शक्यता आहे. साध्या थट्टामस्करीतूनही कलहसदृश प्रसंग निर्माण होण्याची शक्यता. त्यामुळे कोणाचीही थट्टामस्करी करू नका. बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवा. कोणाचाही अपमान करू नका. उत्तरार्ध त्यामानाने शुभ जाईल, पती अथवा पत्नीचा भाग्योदय होईल. घरामध्ये शुभ वार्ता समजतील. पती-पत्नीमधील मतभेद संपुष्टात येतील. कुटुंबातील मुला- मुलींकडून आनंद वार्ता समजतील.
शुभ दिनांक : - १, ३, ७, ९, १०, १२, १३, १५, १६, २५, २६, २७, २९, ३०
अशुभ दिनांक : - २, ५, ६, ८, १४, १८,१९,२०