राशीभविष्य

नोव्हेंबर महिना कसा जाईल? बघा तूळ आणि वृश्चिक राशीचे भविष्य

तुमच्यासाठी कसा आहे नोव्हेंबर महिना? जाणून घ्या...

नवशक्ती Web Desk

डॉ.सविता महाडिक, ज्योतिष भूषण

तूळ रास

व्यावसायिक उत्तम घडामोडी

देव साधू संत ब्राह्मण यांचे पूजन करणारे असतात. सत्वगुणी स्वधर्म चारिणी असतात. पुण्य कर्म करणारे ईश्वर भक्त समतोल वृत्ती, अतिशय उंच शरीर उभट चेहरा हाता पायाच्या नळ्या भागदार पाय शरीर सरपंच वर्ण सावळा उंच नाक प्रवासाची आवड बोलताना मान उभी असून हलवितात. वारंवार हसणे बोलताना तोंड अंकुचित करणारे मसालेवाईक भाषण करणारे स्वर लहान असतो तडजोडीची आवड असते. न्याय कर्मात प्रवीण असतात उभा असताना व चालताना बुक काढल्यासारखा दिसणारा दुर दुर पावले टाकून जलद चालणारा देणे घेण्या मध्ये मध्ये कुशल भावंडावर उपकार करणारा बंधुवर्गाकडून निर्भसना पावणारा विद्वान शास्त्रज्ञ वातयुक्त शरीर दगदग भोगणारा आपल्या मनाचा थांग पत्ता लागू न देणारा पुत्र संतती कमी वृद्धावस्थेमध्ये आप्तेष्टांचा उपयोग होतो, असे तुळ राशीचा व्यक्तीचे स्वरूप आहे.

शिक्षण :- शिक्षणासाठी चालू कालावधी अत्यंत उत्तम आहे. कोणत्याही शाखेमध्ये योग्य दिलेले प्रयत्न केल्यास व अभ्यासात सातत्य ठेवल्यास यश मिळणार आहे. काही वेळेस अडचणी संभवतात त्यामुळे वेळेचे नियोजन अत्यंत उपयोगी पडेल त्याचप्रमाणे कुसंगती टाळणे महत्त्वाचे ठरेल. आपण अडचणींवर सहजगत्या मात करू शकाल त्यातूनच आपणास यश मिळेल. समस्यांना चांगल्या प्रकारे तोंड देणार आहात एक प्रकारचा आत्मविश्वास आपल्यामध्ये राहील परदेशासंबंधी पण आपणास चांगले यश मिळणार आहे. कला व क्रीडा क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करण्याच्या अनेक संधी चालून येतील त्या संधीचे सोने करणे आपल्या हाती आहे हे लक्षात ठेवावे. अवतीभवतीच्या परिस्थितीचे अवलोकन करून आपले कार्य करावे म्हणजे आपल्याला अपेक्षित यश साध्य करता येईल.

पारिवारिक :- आपली आर्थिक परिस्थिती मजबूत राहिल्या कारणाने कुटुंब परिवारातील वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. आपल्या कार्यक्षेत्रात म्हणजेच काम नोकरी व्यवसायात चांगले योग असल्याने आनंदी राहणार आहात. कुटुंबात जरी थोडे मतभेद झाले तरी तुमचे निर्णय योग्य ठरतील तुम्ही तुमची जबाबदारी चांगल्या रीतीने पार पाडणार आहात. तुमच्याकडून धार्मिक तसेच सामाजिक कार्य होण्याची शक्यता आहे प्रत्यक्षात योगदान द्याल त्याने कल्याणकारी परिणाम मिळू शकतात. घरातील वातावरण चांगले राहील घरातील सदस्यांचे वाढते सहकार्य मिळाल्यामुळे आपण उत्साही व आनंदी राहाल.

नोकरी-व्यापार-व्यवसाय :- कोर्ट कचेरी मध्ये दीर्घकाळ चाललेली प्रकरणे अथवा खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागेल. त्यामुळे आनंदी आणि उत्साही राहाल पुढील नवीन कामे हाती घ्या तसेच राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या सन्माननीय व्यक्तीकडून महत्त्वाची कामे करून घेऊ शकाल त्यांची मदत मिळेल. जमीन जुमला स्थायी संपत्ती वडिलोपार्जित संपत्ती इत्यादी क्षेत्रातील दीर्घकाळ रखडलेली प्रकरणे मार्गी लागतील कुटुंब परिवारात वैयक्तिक मोठे उत्सव समारंभ होतील.

शुभ दिनांक : - १, ३, १०, १२, १३, १५,१६,२३,२९,३०

अशुभ दिनांक : - २,५,६,८,१४,१८,१९,२०


वृश्चिक रास

अचानक धनलाभाचे योग

मो ठे डोळे, कुढया विचारांचा गुप्त विचारांनी सूड घेणारा लहानपणी आजारपण असू शकते. वर्ण पिंगट असतो. निरनिराळ्या वेळी वेगवेगळे विचार प्रकट करणारे असतात पूर्व धाडसी असतात. त्यागशील असतात. गंभीर असतात. पण जास्त भावनाशील असल्यामुळे एखादी गोष्ट मनाला लागल्यास दुसऱ्याच्या मनाला लागेल असे बोलतात स्वतः दुखावले गेल्यामुळे तसा प्रतिसाद देतात. साहसी पित्त रोगी कुटुंब संपन्न असतात. मतलबी असतात. पण दुसऱ्याच्या जाळ्यात सहज सापडतात. राज सेवक शत्रूंच्या बरोबर नेहमी झगडणारा परस्त्री परपुरुष तसेच विरुद्ध लिंगी व्यक्तीशी मैत्री करणारा गुरु व मित्र यांच्याशी मतभेद होऊ शकतात. स्वभाव तसा उग्र असतो. गुप्तपणे काम करण्याची आवड असते. डॉक्टर किंवा विद्यासंपन्न असतात रसायने तयार करणारे शूद्र कामे पण करावी लागतात. विचारात किंवा एकांतात राहण्याची आवड हलक्या कानाचा गर्विष्ठ दुसऱ्यावर वचक ठेवणारा संततीमध्ये कन्या अधिक असते. असे वृश्चिक राशीचे वैशिष्ट्य सांगता येईल.

शिक्षण :- हा कालावधी शिक्षणासाठी अनुकूल राहील एका जागी चांगली बैठक होऊन अभ्यास चांगला होऊ शकतो. टेक्निकल मध्ये पण चांगले यश मिळेल. तुमचे निर्णय धाडसाने तुम्ही घेणार आहात. ते योग्य ठरण्याची ग्रहयोग आहेत शुभ ग्रहांची साथ आपणास लाभल्यामुळे यशाचे प्रमाण वाढते राहील. परदेशासंबंधी शिक्षणात अपेक्षित यश मिळणार आहे. परदेश गमनासाठी प्रयत्न करत असल्यास ते यशस्वी ठरतील. त्यामध्ये आपल्याला इतरांची मदत मिळू शकते. तसेच मार्गदर्शन पण लाभेल आपण जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर वेळेचे नियोजन उपयोगी पडेल व स्पर्धा परीक्षेत यश मिळवू शकाल स्पर्धात्मक यश मिळेल कला व क्रीडा क्षेत्रातही आपले यश आपण खेचून आणाल.

पारिवारिक :- परिवारामध्ये अत्यंत चांगले वातावरण राहणार आहे. धार्मिक तसेच सामाजिक क्षेत्रात काम करण्याची इच्छा होईल. घरात एखाद्या धार्मिक कार्य होऊ शकते सहकुटुंब सहपरिवार तीर्थक्षेत्री भेट देण्याचे योग आहेत. आपल्या हातून दानधर्म होऊ शकतो. आर्थिक स्थिती चांगली राहिल्याने खर्चाचे प्रमाण वाढणार आ. मनाप्रमाणे खर्च करू शकाल तसेच घरातील सदस्यांसाठी खरेदी कराल मौल्यवान वस्तूंची खरेदी होऊ शकते. देशाटन पण करण्याची शक्यता आहे एकूणच या महिन्याचे ग्रहमान आपणास चांगल्या प्रकारे अनुकूल आहे. घरातील परिस्थिती चांगली राहिल्यामुळे तसेच आपल्या कार्यक्षेत्रात यश मिळत राहिल्यामुळे आनंदी व समाधानी रहाल.

नोकरी-व्यापार-व्यवसाय :- चालू नोकरीमध्ये वरिष्ठांचे तसेच सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. त्यामुळे आपण आपल्या हातातील महत्त्वाची कामे पूर्ण करू शकाल. नोकरी मधील कामांमध्ये विशेष वारस्य घ्याल महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडू शकाल. त्यामुळे वरिष्ठ खूश होतील. परिणामतः त्याचे फळ आपल्याला नक्की मिळेल आपल्या कार्यक्षेत्रातून आपल्याला प्रवास करावा लागू शकतो. परंतु प्रवासात आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे ठरेल.

शुभ दिनांक : - ३, ४, ७, १२, १३, १५,१६,२३,२९,३०

अशुभ दिनांक : - २,५,६,८,१४,१८,१९,२०

मोठी बातमी! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; दुबार मतदान रोखण्यासाठीही आणलं खास 'टूल'

सातारा जिल्ह्यातील 'राधा' म्हशीचा जगात डंका; सर्वात बुटकी म्हैस म्हणून 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद

ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला गती; देशातील सर्वात लांब शहरी बोगदा

कोइंबतूर विमानतळाजवळ गँगरेप प्रकरण; पोलिसांवर हल्ला करून पळण्याचा प्रयत्न करणारे तिघे अटकेत

डॉ. संपदा मुंडे मृत्यू प्रकरण : बेटी पढ़ी, पर बची नहीं... डॉक्टरांचे काम बंद आंदोलन; अधिकाऱ्यांचाही इशारा