डॉ. सविता महाडिक, ज्योतिष भूषण
धनु रास
भाग्य सुचक कालावधी
अत्यंत सभ्य व विनम्र स्वभावाच्या धनु राशीच्या व्यक्ती असतात या व्यक्तींना विरोध सहन होत नाही या जातकांना कोणीही त्रास द्यायचा प्रयत्न केल्यास त्याचा विरुद्ध ते उभे राहतात अन्याय सहन करत नाहीत धनु रास ही राशीचक्रातील नववी रास आहे निसर्ग कुंडलीतील ही नवव्या स्थानावर येते मानवी शरीराच्या जाघांवर या राशीचे कारकत्व असते आकाशात बनवलेल्या चांदण्यांची आकृती- व्यक्तीच्या हातात धनुष्य आहे या व्यक्तीचे अर्धे शरीर कमरेच्या वरती मनुष्याचे व कमरेखालील शरीर घोड्यासारखे दिसते या कृतीस धनु रास म्हणून संबोधले जाते धनुरधारी पुरुष हे योद्धाचे प्रतीक आहे चपळ त्याचे प्रतीक आहे ही राशी आशावादी असते धनु रास विषम रास असून पुरुष रास आहे शौर्य व वीरतेचे प्रतीक आहे लढणे संघर्ष करणे विजय मिळवणे दुर्बलांना अभय देणे त्यांना मदत करणे ही गुणवैशिष्ट्ये राशीमध्ये आहेत.
शिक्षण :- सध्याच्या कालावधीमधील शिक्षणासाठी ग्रहमान उत्तम आहे त्यामुळे आपल्या अभ्यासामध्ये लक्ष राहणार आहे आपण लक्ष केंद्रित करू शकाल त्यामुळे आपल्याला यश मिळणार आहे शिक्षण क्षेत्रातील कोणत्याही क्षेत्रात प्रगती होईल टेक्निकल क्षेत्रातील विद्यार्थ्यांना उत्तम यश मिळणार आहे प्रदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुकूल ग्रहमान आहे परदेशी जाऊन उच्च शिक्षण घेण्याचे प्रयत्न यशस्वी होतील त्यामध्ये आपल्याला इतरांची मदत लाभेल त्याचप्रमाणे कुटुंब परिवारातून मदत मिळेल त्याचप्रमाणे मार्गदर्शन मिळेल शिक्षणासाठी सदरचा कालावधी अत्यंत उपयुक्त आहे मात्र प्रयत्न त्या दृष्टिकोनातून चालू ठेवा.
पारिवारिक :- कुटुंब परिवारात तसेच नातेवाईक आप्तेष्ट यांच्या संबंधात समज गैरसमजामुळे काही नाट्यमय प्रसन्न घडवून नाती दुखवण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला घरातील वातावरण शांत आणि समाधानी ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत स्वतःच्या मानसिकतेमध्ये सकारात्मकता व संतुलन ठेवण्याची आवश्यकता आहे इतरांना समजून घ्या कुटुंब परिवारातील सदस्यांना सांभाळून घ्या आर्थिक परिस्थिती चांगली राहील काही भाग्य सुचक घटना घडतील परंतु खर्चातही वाढ होईल त्यामुळे आर्थिक नियोजन फायद्याचे ठरेल मात्र आर्थिक नियोजन करायला हवे कुटुंब परिवारातील ताण तणाव मुक्त वातावरण टिकवण्यासाठी अथवा गैरसमज टाळण्यासाठी सुसंवाद साधणे - आवश्यक आहे आपल्या प्रयत्नांना चांगले यश लाभेल.
नोकरी-व्यापार-व्यवसाय :- सध्याचे शुभ ग्रहमान आपल्याला चांगले साथ देईल आपल्या कार्यक्षेत्रात आपण घेतलेले निर्णय योग्य होऊन त्याचा फायदा आपल्याला होईल दीर्घकाळ रखडलेली कामे मार्गी लावू शकाल चालू नोकरीमध्ये आपण पूर्वी केलेल्या कामाचे चांगले फळ मिळेल पदोन्नती अथवा वेतन वृद्धी मिळू शकेल आर्थिक परिस्थिती सुधारेल अपेक्षित घटना घडल्यामुळे समाधानी राहाल नोकरीमध्ये रस निर्माण होऊन आपल्या पुढील कामे वेगाने कराल वरिष्ठांच्या बरोबरील असलेले संबंध सुधारतील तसेच सहकारी आपल्याला वाढते सहकार्य देतील नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची तयारी ठेवा तसेच कामाच्या स्वरूपातही बदल होऊ शकतो त्याचप्रमाणे बदलीची शक्यता नाकारता येत नाही व्यावसायिक वादग्रस्त वसुली होईल आपल्या कार्यक्षेत्रात आपण राबविलेले उपक्रम यशस्वी होतील त्याचप्रमाणे चालू व्यवसायाला पोषक असे वातावरण तयार होऊन एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याची शक्यता भागीदारीचा व्यवसाय विशेष फायदा देईल कुटुंब परिवारातील तरुण तरुणींचे प्रश्न सुटतील विशेषतः लांबलेले विवाह जमून येतील कुटुंब परिवारात एखादे मंगल कार्य घडण्याची शक्यता बुद्धिजीवी मंडळींना अनुकूल कालावधी आहे व्यावसायिक नवे पर्याय फलद्रूप होतील मात्र या कालावधीच्या उत्तरार्धात जुगार सदृश्य व्यवहार टाळणे हिताचे ठरेल त्याचप्रमाणे कुसंगतीतून फसवणूक होण्याची शक्यता असल्यामुळे कुसंगत टाळणे महत्त्वाचे ठरेल.
शुभ दिनांक : - १, २, ४, ५, ८, १३,१४,१५,१७,२२,२८,३०
अशुभ दिनांक : - ७,१०,१९,२५
मकर
आर्थिक नियोजनाची आवश्यकता
मकर राशीच्या व्यक्ती स्वतःच्या कार्याला अत्यंत महत्त्व देणारे असतात यांना कर्मयोगी म्हटले जाते आपले काम निष्ठेने व दृढतेने करणाऱ्या व्यक्ती असतात कोणत्याही कामाला सुरुवात केली तरी परिश्रमपूर्वक ते कार्य पूर्ण करतात त्यात यश मिळवून त्याचा आनंद घेतात मकर रास ही राशीचक्रातील दहावी रास आहे ही रास दशम स्थानात येते या राशीचे कारकत्व मानवी शरीराच्या गुडघ्यावर असते आकाशातील आकृती म्हणजे तोंड हरणासारखे व शरीर मगरी सारखे असा तारकापुंज आढळतो यालाच मकर रास म्हणतात मकर रास ही समरास असून स्त्री रास आहे त्याचप्रमाणे ती चर रास आहे. चतुष्पाद पृथ्वीतत्व व पृष्ठोदय अशी रास आहे रात्री बली व मध्यम प्रसव असे या राशीचे स्वरूप आहे यांचा स्वभाव साधारणतः मनमानी कामा संबंधित दृढता चंचल आत्मविश्वासी कंजूष अशा प्रकारच्या या व्यक्ती असतात अत्यंत महत्त्वाकांक्षी व आत्मनिर्भर असतात तसेच व्यवहारी असतात.
शिक्षण :- सध्याच्या काळामध्ये मकर राशीच्या व्यक्तींना कला व क्रीडा क्षेत्रात उज्वल भवितव्य आहे स्वतःच्या प्रयत्नांनी ते मिळवता येईल फक्त प्रामाणिक कष्टांची गरज आहे परिश्रम घेण्याची तयारी असल्यास यश नक्की मिळेल परदेशी सुद्धा यश प्राप्ती करू शकाल टेक्निकल क्षेत्रामध्ये इतर क्षेत्रापेक्षा जास्त परिश्रम घ्यावे लागतील त्याचप्रमाणे वेळेचे नियोजन करणे हिताचे ठरेल बाकी इतर क्षेत्रात सामान्यतः यश मिळेल साहित्यात कार्य करणाऱ्या जातकांना कलात्मक मांडणीसाठी चांगले श्रेय मिळेल स्पर्धा परीक्षेसाठी थोडे जास्त परिश्रम घेण्याची आवश्यकता आहे त्यामुळे अपेक्षित यश साध्य होईल परदेशा संबंधित घटनांचा यामध्ये समावेश होतो. परदेशी जाऊन शिक्षण घेण्याचे स्वप्न साकार होईल.
पारिवारिक :- कुटुंब परिवारात असामान्य ऊर्जा व सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे कुटुंब परिवारातील सदस्यांचे संबंध सुधारतील असलेले वादविवाद शमतील आर्थिक बाबतीत परिस्थिती चांगली राहणार आहे अध्यात्मिकता व धार्मिकता वाढीस लागेल श्रद्धा वाढण्याची शक्यता आहे आपल्या परिवारात समतोल साधण्यासाठी आपल्याला विशेष प्रयत्नांची आवश्यकता भासेल तरीसुद्धा आपल्या आध्यात्मिक प्रगती होणार आहे मतभेदाची शक्यता असली तरी त्यावर आपण मात कराल सामंजस्याचे धोरण स्वीकारणे सर्वांच्या हिताचे ठरेल आपल्या समोरील समस्या व प्रश्न आपण सोडवाल त्यामुळे समाधान मिळेल.
नोकरी-व्यापार-व्यवसाय :- सध्याच्या काळामध्ये काही ग्रहयोगांमुळे व बदलत्या ग्रहमानाच्या पार्श्वभूमीवर काही वेळेस अनपेक्षित घटना प्रसंगातून अस्वस्थता जाणवेल पूर्वी केलेल्या नियोजनामध्ये बदल करावा लागू शकतो आपल्या कार्यक्षेत्रात म्हणजेच व्यवसाय धंदा व नोकरीमध्ये आधी केलेले नियोजन बदलावे लागेल त्यासाठी आपल्याला काही धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील त्याचा परिणाम दूरवर होणार आहे दीर्घकालीन त्याचे परिणाम आपल्याला बघायला मिळतील. विशेषतः आर्थिक बाबतीमध्ये नियोजन करणे ने आवश्यक आहे नाहीतर फसवणूक होण्याची शक्यता आहे विशेषतः नवीन गुंतवणूक करताना त्या त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयोगी पडेल पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा होईल त्यामुळे आर्थिक नियोजन उपयोगी पडू शकते चालू नोकरीमध्ये आपले अधिकार क्षेत्र वाढेल अधिकार वाढल्यामुळे जबाबदाऱ्यांच्यामध्ये वाढ होईल परंतु आपले कोणतेही कार्य पूर्ण करताना आपल्या अधिकार क्षेत्रातच ते पूर्ण करा अधिकाराचा गैरवापर प्रत्कर्षाने टाळा त्याचप्रमाणे विशेषतः सरकारी नोकरीमध्ये लहान मोठ्या प्रलोभनांना बळी पडू नका तसेच वरिष्ठांशी वाद विवाद अथवा मतभेद अंगाशी येऊ शकतात व नाते दुखावले जाऊ शकते याची जाण ठेवा वरिष्ठांच्या मताला प्राधान्य द्या ती आपल्या इथे ठरेल त्याचबरोबर आपल्या बरोबरील आपल्या बरोबरील सहकाऱ्यांशी विनायशीलतेने वागणे गरजेचे ठरेल म्हणजे आपल्याला सहकार्य मिळेल.
शुभ दिनांक :- २, ४, ५, १५, १७, २०,२१,२४,३०,३१
अशुभ दिनांक :- ७,१०,१९,२५