डॉ.सविता महाडिक, ज्योतिष भूषण
मिथुन रास
उत्साहवर्धक कालावधी
अत्यंत सजनशीलता, नवीन नवीन कामे करण्यासाठी तत्पर सतत प्रयत्न करणे आपल्या कर्तुत्वाने आपल्यामध्ये परिपूर्णता आणणे वेळोवेळी ते सिद्ध करतात चांगले संवाद कौशल्य असते निसर्ग कुंडलिक मिथुन रास ही तिसरी रास आहे पती व पत्नीचा जोडा असलेले चिन्ह मिथुन राशीचे आहे पुरुषाच्या हातात गदा असते ते त्याच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे स्त्रीच्या हातात वेळ आहे हे कलेचे व संगीताचे प्रतीक आहे अशा अलौकिक गोष्टी मिळून मिथुन रास ही बनलेली आहे. या राशीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही द्विस्वभाव राशी आहे.
शिक्षण :- या महिन्यातील कालावधी शिक्षणासाठी अत्यंत चांगला आहे ग्रहमान पण अनुकूल आहे थोड्या प्रयत्नाने चांगले यश प्राप्त करू शकाल पण प्रयत्न मध्ये सातत्य हवे प्रामाणिक कष्ट करण्याची इच्छा हवी चिकाटी पाहिजे कला व क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना पण चांगल्या संधी मिळू शकतात प्रदेशातून संधीची उपलब्धता होऊ शकते प्रयत्न सर्व बाजूने करत राहणे हे इतरांचे ठरेल ज्या जातकांना परदेशी जाऊन उच्च शिक्षण घेण्याचे आहे त्यांनी त्या दृष्टीने प्रयत्न केल्यास त्यांना चांगले यश प्राप्त होऊ शकते.
पारिवारिक :- घरातील वातावरण अतिशय चांगले राहणार आहे कुटुंब परिवारातील सदस्य एकमेकांना समजून घेतील चांगले खेळीमेळीचे वातावरण राहील सगळ्यांच्या विचार विनिमयाने व एकोप्याने घरातील निर्णय घेतले जातील आर्थिक लाभ चांगले राहिल्याने कुटुंबातील सर्व सदस्यांच्या मागण्या पूर्ण करू शकाल घरामध्ये खरेदी होईल. नवीन गुंतवणूक करण्याची इच्छा असल्यास नवीन गुंतवणूक ही होईल.
नोकरी-व्यापार-व्यवसाय :- या कालावधीची सुरुवात उत्साहवर्धक राहील थोड्याच प्रयत्नांनी आपल्या हातातील सर्व कामे होत आहेत हे अनुभवून आश्चर्य वाटेल.व्यवसाय धंद्यात नवीन नवीन कल्पनांचा वापर आपली व्यवसायातील उलाढाल वाढविली नवीन संकल्पनांचा वापर यशस्वी ठरेल विशेषतः भागीदारी व्यवसायामध्ये भागीदाराच्या मताला प्राधान्य दिल्यास व्यवसाय धंद्यामध्ये विशेष फायदा होऊ शकतो त्याचप्रमाणे कामगारांचे सहकार्य लाभेल उलाढाल वाढून नफ्यामध्ये वाढ होईल आर्थिक परिस्थिती सुधारेल व्यवसाय धंद्यातील जुनी येणी वसूल होतील नवीन उधारी करू नका त्याचप्रमाणे कोणत्याही आर्थिक व्यवहारांमध्ये सावधानता बाळगा आपली क्षमता ओळखून पुढील पावले उचला नवीन गुंतवणूक होऊ शकते त्याचा भविष्यात आपल्याला फायदा होईल व्यवसाय धंद्याच्या विस्ताराच्या दृष्टिकोनातून पुढील नियोजन करा ते यशस्वी होऊ शकते परंतु जुगार सदृश्य व्यवहार टाळा तसेच आर्थिक व्यवहार करताना कोणावरही जागतिक विश्वास ठेवू नका फसवणुकीची शक्यता नाकारता येत नाही सामाजिक तसेच धार्मिक कार्यामध्ये सक्रिय योगदान देण्याची इच्छा होईल त्याचप्रमाणे सहकुटुंब सहपरिवार एकदा धार्मिक पवित्र स्थळी प्रवास होतील आपल्या हातून दानधर्म होऊ शकतो प्रवासामध्ये वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा कुटुंब परिवारामध्ये शिक्षण घेणाऱ्या मुला मुलींच्या कडून त्यांच्या शिक्षणाबद्दलच्या प्रगती पर वार्ता समजल्यामुळे कुटुंब परिवारातील वातावरण आनंदी आणि उत्साही राहील त्याचप्रमाणे कुटुंब परिवारातील तरुण-तरुणींचे प्रश्न सुटतील नोकरी विषयक प्रश्न जे आत्तापर्यंत होते ते प्रश्न आता सुटतील नोकरी मिळू शकते बेरोजगारांना रोजगार मिळेल त्याचबरोबर विवाह योग्य तरुण-तरुणींचे विवाह निश्चित होतील तरुण-तरुणींना आपला आवडता जीवनसाथी निवडता येईल विशिष्ट नोकरीच्या संधी मिळतील चालू नोकरीमध्ये आपण केलेला अथवा घेतलेल्या परिश्रमाचे फळ मिळेल नोकरीमध्ये पदोन्नती अथवा वेतन वृद्धी होईल परंतु बदलीची शक्यता आहे कामाच्या स्वरूपात बदल होऊ शकतो. सकारात्मक बदल घडतील कुटुंब परिवारातील सर्व सदस्यांचे आपल्याला वाढते सहकार्य मिळेल.
शुभ दिनांक : - १, ४, ५, ८, १३, १४, १५, २१, २४, ३०, ३१
अशुभ दिनांक : - ७,१०,१९,२५
कर्क रास
विशिष्ट करारमदार होतील
कर्क रास ही मुळातच भावनाशील रास आहे निसर्ग कुंडलीतील चौथ्या नंबरची ही रास आहे चंद्र या राशीचा स्वामी आहे कर्क रास असलेल्या व्यक्ती परिस्थितीचे अवलोकन करून आपल्या वागण्यात बदल करतात शांत विनम्र लाजाळू असतात त्यांना आईचे प्रेम विशेष लाभते तसेच त्यांचेही आईवर प्रेम असते वाहन वास्तु शिक्षण माहिती या राशीवरून मिळते ही चल राशी असून जलचर राशी आहे पृष्ठोदयी व रात्री बली ही रास आहे तसेच बहुप्रसव आहे या राशीच्या व्यक्तींना मानसन्मान व राजवैभव मिळते तसेच या राशीच्या व्यक्ती शांत दयाळू प्रेम कोमल मनाच्या नम्र असतात प्रवासाचे यांना आवड असते वादविवाद आवडत नाहीत.
शिक्षण :- कर्क राशीच्या जातकांना या कालावधीमध्ये आपल्या अभ्यासात सातत्य व स्थिरता ठेवणे गरजेचे आहे तसेच प्रामाणिक कष्टाची गरज आहे आता कष्ट घेतल्यास नक्कीच त्यांना चांगले यश प्राप्त होईल म्हणूनच कुसंगत टाळावी इतरत्र वेळ न घालवता अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे ठरेल गुरुजनांचे मार्गदर्शन लाभेल तसेच उच्च शिक्षण घेण्याकरता परदेशी जाण्याचे स्वप्न साकार होऊ शकते कुटुंब परिवारातून त्यासाठी मदत तसेच मार्गदर्शन मिळेल परदेशात जाऊन शिक्षण घेण्यासाठी अनुकूल वातावरण आहे अगोदरच परदेशी वास्तव्य असलेल्या जातकांची प्रगती होईल जे जातक स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत अशा जातकांना चांगले यश मिळू शकते त्यांची तयारी चांगली होईल.
पारिवारिक :- कुटुंब परिवारातील वातावरण शांत व उत्साही राहील कुटुंबातील सदस्य एकमेकांना समजावून घेतील एकमेकांच्या उपयोगी पडतील आपापसामधील सहकार्याची भावना वाढत राहील परंतु आपल्याला कुटुंब परिवारातील वाढत्या जबाबदाऱ्या लागण्याची शक्यता आहे कुठे परिवारातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण कराव्या लागतील व त्या आपण पूर्ण करा कारण आपली आर्थिक परिस्थिती चांगली राहील तसेच अध्यात्मिक व गूढ शास्त्राच्या अभ्यासात विशेष रस राहील धार्मिक तसेच सामाजिक कार्यात सुद्धा रस घ्याल.
नोकरी-व्यापार-व्यवसाय :- या कालावधीच्या पूर्वर्धा मध्ये आपल्या छंद व उपक्रमातून फलदायी ठरेल चांगली फळे प्रतिपादित होतील आपले छंद व उपक्रम आपल्याला नवीन उत्पन्नाचे मार्ग शोधून देतील कलाकार व साहित्यिक क्षेत्रात आपल्या हातून एखादी दर्जेदार कलाकृती तयार होईल त्यामुळे आपल्याला प्रसिद्धी लाभेल व्यवसाय धंद्यातील वाढत्या व्यापामुळे आपल्याला प्रवास करावे लागतील प्रवास कार्य सिद्ध होतील जवळचे तसेच लांबचे प्रवास करावे लागतील प्रवासामध्ये वाहनाची तसेच आपल्या स्वतःची काळजी घ्या स्वतः जवळची मौल्यवान कागदपत्रे तसेच किमती वस्तू जपा वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा कोणाशीही स्पर्धा करू नका तसेच वाहतुकीचे नियम पाळा त्याचप्रमाणे वाहन सुरक्षित जागी पार्क करा व्यवसाय धंद्यातील जुनी वादग्रस्त येणे वसूल होतील तसेच व्यवसाय धंद्यामध्ये नवीन करार मदर होऊ शकतात दीर्घ मुदतीचे करार होऊ शकतील कोर्ट प्रकरणे मार्गी लागून आपल्याला हवा असलेल्या निकाल लागेल त्यामुळे आनंदी आणि उत्साही राहाल आपल्यासमोरील कामे वेगाने पार पाडू शकाल नवीन कामे हाती घेऊ शकाल या कालावधीच्या उत्तरार्धामध्ये व्यवसाय धंदा निमित्त अथवा आपल्या कार्यक्षेत्रातील कार्यामुळे परदेश गमनाचे योग आहेत. चालू नोकरीमध्ये विशेष आर्थिक फायदा होऊ शकतो नवीन जबाबदारी स्वीकारावी लागेल मात्र वरिष्ठांच्या मताला प्राधान्य द्या त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचे वाद विवाद अथवा मतभेद नको. आपल्या बरोबरील सहकार्य आपल्याला सहकार्य देतील नोकरी मधील महत्त्वाची कामे पार पाडू शकाल ज्या जातकांना नोकरी नाही अशा जातकांना नोकरी मिळू शकते पण प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे.
शुभ दिनांक : - २, ८, १४, १५, १७, २०,२१,२२,२८,३०
अशुभ दिनांक : - ७,१०,१९,२५