राशीभविष्य

सप्टेंबर महिना कसा जाईल? बघा कुंभ आणि मीन राशीचे भविष्य

तुमच्यासाठी कसा आहे सप्टेंबर महिना? जाणून घ्या...

नवशक्ती Web Desk

डॉ.सविता महाडिक, ज्योतिष भूषण

कुंभ रास

कोणत्याही प्रकारचा आर्थिक गार टाळावा

मान उंटासारखी, पुढे आलेले राठ केस, उंच शरीर, पाठ, तोंड, कंबर, पोट यांचा आकार मोठा, वर्ण काळा, चेहरा गोल, मिशा कमी असून कंसाकार, नेहमी खांदा हलवण्याची सवय, डोक्याला टक्कल, कपाळ दोन बाजूला आत निमुळते, चेहरा देखणा, बुद्धिमान, कल्पक, कावेबाज, तत्त्वज्ञ, परस्त्री व परधनाची इच्छा असणारा, चांगले मित्र असणारा, सुगंधी पदार्थांवर जास्त प्रेम, क्षणाक्षणाला कृतीत होणारा, राग येणारा, आळशी, जुगारप्रिय, कठोर अंतःकरणाचा, बंधूंपासून लांब राहणारा, संपत्ती नेहमी कमी-जास्त होत राहते. ज्यांच्या संपत्तीचा लोक मत्सर करतील असा, विकसित क्षेत्राबाहेर फारशी प्रसिद्धी न पावणारा, संपत्ती फार कमी असे कुंभ राशीचे स्वरूप आहे.

शिक्षण : कुंभ रास ही वायू तत्त्वाची रास आहे. अत्यंत बुद्धिमान रास म्हणून ओळखली जाते. त्यात पंचमात गुरूसारखा ग्रह असल्याने शिक्षणात प्रगती निश्चितपणे होईल. त्यात जर कलाक्षेत्रात कार्यरत असाल तर उत्तम यश मिळणार आहे. अत्यंत चांगले यश शिक्षणात मिळवू शकाल. प्रदेशासंबंधी शिक्षण किंवा परदेशात शिक्षण घ्यावयाचे असल्यास त्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. स्पर्धापरीक्षेत यश मिळवू शकाल. आपल्या मनात असेल तेवढे शिक्षण आपण या काळात घेऊ शकाल, यशाचे प्रमाण वाढते राहील. फक्त प्रामाणिक प्रयत्न व योग्य दिशेने केलेले प्रयत्न आपल्याला उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जातील.

पारिवारिक :- आपल्या कुटुंबात शांतता व समाधान लाभण्यासाठी आपण पूर्णपणे कार्यरत राहणार आहात. नवीन जबाबदाऱ्या स्वतःहून घेऊन त्या आपण पूर्णपणे पार पाडणार आहात. एक कर्तव्य म्हणून आपण त्याकडे बघणार आहात. त्यामुळे आपले आत्मिक समाधान वाढेल. संयम, जबाबदारी, धैर्य यामुळे आपण प्रगती करू शकाल. लहान-मोठे आर्थिक निर्णय पूर्ण काळजीपूर्वक घेऊन आपली सतर्कता जागरूक ठेवणार आहात. खर्चाचे प्रमाण वाढले तरी योग्य नियोजन करून त्यावर मार्ग काढू शकाल. सहकुटुंब एखाद्या धार्मिक स्थळी प्रवासयोग आहे. परंतु प्रवासामध्ये वाहने जपा. वाहनाच्या वेगावर नियंत्रण आवश्यक. इतरांशी स्पर्धा करू नका. परिवारात भावंडांबद्दल चिंता निर्माण होण्याची शक्यता आहे.

नोकरी-व्यापार-व्यवसाय :- सदरच्या काळात आपल्याला सावध राहणे गरजेचे राहणार आहे. नोकरीमध्ये, कोणत्याही राजकारणामध्ये अथवा गटबाजीमध्ये सामील होऊ नका. त्याचप्रमाणे आपल्या कामाशी काम ठेवा. आपल्याला आपल्या कामाविषयीच्या ज्ञानाबाबत अद्यावत राहणे गरजेचे राहणार आहे. त्याचप्रमाणे शिस्त पाळणे आवश्यक आहे. सरकारी नोकरीमध्ये आपल्या अधिकार कक्षेमध्ये राहूनच आपले कार्य आपण पूर्ण करावे. आपल्या जबाबदाऱ्यांची जाण ठेवणे गरजेचे राहील. त्याचप्रमाणे आपल्या अधिकार क्षमता जाणून घेऊन आपले कार्य पूर्ण करावे. वरिष्ठांच्या मताला प्राधान्य देणे हितकारक ठरेल. कोणत्याही प्रकारचे वादविवाद अथवा मतभेद होऊ देऊ नका. नोकरी-व्यवसाय-धंद्यामध्ये उधारी वाढवू नका. लहान-मोठे आर्थिक व्यवहार जपूनच करणे गरजेचे राहील. उत्तरार्धामध्ये आपली परिस्थिती बदलेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. जर आर्थिक मदत हवी असेल तर ती उपलब्ध होऊ शकते, मात्र कोणताही आर्थिक प्रकारचा लहानमोठा जुगार टाळणे गरजेचे राहील. तसेच इतर कोणावरही आर्थिकबाबतीत वाजवीपेक्षा जास्त विश्वास ठेवू नका. कोणतीही नवीन गुंतवणूक करताना सावध राहणे गरजेचे राहील. फसवणुकीची शक्यता आहे. काही वेळेस अनपेक्षित घटना-प्रसंगातून खर्चाचे प्रमाण वाढल्यासारखे दिसेल. नियोजनात बदल करावा लागेल. समाजातील प्रभावशाली व्यक्तींचे मार्गदर्शन मिळू शकते. त्याचप्रमाणे त्यांच्याकडून मदतही मिळू शकते. आर्थिक परिस्थिती ठीकठाक राहील. त्यामुळे आपण आपले निर्णय योग्यरीतीने घेऊ शकाल. नोकरी-व्यवसाय-धंदा तसेच आपल्या कार्यक्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारचे लहान-मोठे बेकायदेशीर व्यवहार करू नका. कायद्याच्या चौकटीत राहून आपले कार्य पूर्ण करा. धार्मिक तसेच सामाजिक कार्यात सक्रिय योगदान देऊ शकाल.

शुभ दिनांक: २, ९, ११, १७, १८, २२, २७, ३०

अशुभ दिनांक : ७, ८, १३,१५,२१,२५,२७

मीन रास

चढत्या क्रमाने शुभ फळे मिळतील

परधन व जलधन यांचा भोक्ता, स्त्री व वस्त्रे यात संभ्रम. गोंडस, स्थूल व ठेंगू असे शरीर, सुंदर नाक, उंच कपाळ, मोठे डोळे, वर्ण साधारणतः सावळा, विद्यावान, बुद्धीमान, साधारण संततीत काही विशेष होऊन कन्याप्रधान स्त्री वश, गुप्तधन भोगणारा, कीर्तीची हाव असणारा, जनावरांची आवड असणारा, थोडा घाबरट, कर्तबगारी विशेष नसते. सात्विक, संगीतप्रेमी अशी मीन राशीचे वैशिष्ट्ये व लक्षणे आहेत.

शिक्षण :- शिक्षणासाठी सदरचा कालावधी अनुकूल आहे. शिक्षण क्षेत्रातल्या कोणत्याही क्षेत्रात उज्ज्वल यश मिळू शकते. अभ्यास मग्न राहिल्यास लक्षात राहणे, तिची गुणवत्ता चांगले असणार आहे. आकलनशक्ती चांगली राहू शकते. अभ्यासात लक्ष लागून अभ्यास चांगला होणार आहे. स्पर्धापरीक्षेत चांगले यश मिळवू शकाल, मात्र सातत्याने अभ्यास करावयास लागणार आहे. परदेशातून उच्च प्रतीच्या संधी येतील, तसेच परदेशी जाऊन उच्च शिक्षण घेता येईल. कला व क्रीडा क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करता येईल. अपेक्षित यश मिळू शकते. त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुस्थितीत असणार आहे. धार्मिक व अध्यात्मिक क्षेत्रात रस घेऊ शकाल. आपल्या हातून दानधर्म होईल तसेच धार्मिक ठिकाणी प्रवासही होतील.

पारिवारिक :- बदलत्या ग्रहमानाच्या पार्श्वभूमीवर परिवारात थोडे सांभाळून घ्यावे लागणार आहे. परिवारातील सदस्यांमध्ये आपापसात थोडे मतभेद असण्याची शक्यता आहे. विशेषतः परिवारातील महिलांनी आपल्या वागण्यावर व बोलण्यावर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक आहे. बोलण्यामुळे गैरसमज वाढू शकतात. त्याचप्रमाणे वादविवाद होऊन कलहसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. ती टाळायची असेल तर वादविवाद टाळले पाहिजेत. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींबद्दल त्यांच्या प्रगतीपर वार्ता कानी येतील. त्यामुळे घरातील वातावरण उत्साही आणि आनंदी राहील. आपण स्वतःच्या संवाद कौशल्याने व बुद्धी चातुर्यान आपले प्रश्न सहज सोडवू शकाल. खर्चाचे प्रमाण वाढते राहणार आहे. अर्थातच आर्थिक आवक चांगली

नोकरी-व्यापार-व्यवसाय :- आपल्या कार्यक्षेत्रात म्हणजेच आपल्या नोकरी-व्यवसाय-धंद्यामध्ये सदरच्या कालावधीमध्ये लक्ष द्यावे लागेल. आपली कामे इतरांवर सोपवू नका. स्वतःची कामे स्वतःच करा. त्याचप्रमाणे वेळेत ती कामे संपली पाहिजेत असे नियोजन करा. नियोजनाची मदत होईल. दीर्घकाळ रखडलेली स्थायी संपत्ती, जमीनजुमला, वडिलोपार्जित संपत्ती इत्यादी क्षेत्रातील कामे आपल्या प्रयत्नांनी गतिमान होऊ शकतात. त्याचप्रमाणे ओळखी व मध्यस्थी उपयोगी पडतील. विशेषतः सरकारी कामात याचा उपयोग होईल. मात्र खर्च व वेळ द्यावा लागेल.. नोकरीमध्ये परिस्थिती सर्वसामान्य राहील. आपण पूर्वी केलेल्या कामाचे फळ मिळेल. आपल्या सहकाऱ्यांबरोबर तसेच प्रतिष्ठांबरोबर मिळतेजुळते धोरण स्वीकारा. आपली मते थोडी बाजूला ठेवली तरी चालतील. त्यामुळे आपले प्रश्न अथवा समस्या सहज सोडवता येतील. सरकारी कामांमध्ये आपल्या जबाबदारीची जाण ठेवून आपले कार्य पूर्ण करा. आरोग्याबाबत संसर्गजन्य साथीपासून जपून रहा. परिवारासह दूरचे तसेच जवळचे प्रवास होऊ शकतात. प्रवासात घाईगर्दी अथवा वेंधळेपणा नको तसेच गाडीच्या वेगावर नियंत्रण ठेवा. इतरांशी स्पर्धा करू नका. काही वेळेस सदर कालावधीच्या उत्तरार्धामध्ये आपल्या कार्यक्षेत्रात तसेच आपल्या परिवारात काही गुप्त चिंता सतावू शकतात. गृहिणींनी भाजणे, कापणे अशासारख्या घटनांपासून सावध राहणे गरजेचे आहे. लक्ष देऊन आपली कामे करा. व्यवसाय-धंद्यात काही वेळेस आपल्याला आर्थिक मदतीची गरज भासू शकते. ती गरज पूर्ण करताना कायदेशीर मार्गाचा अवलंब करा. नाहीतर कर्ज प्रकरणातून त्रास उद्भवू शकतो. त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारचे जुगारसदृश व्यवहार नको. व्यवसाय-धंद्यातील जबाबदारी डोळे उघडे ठेवून पार पाडा. आपल्या प्रयत्नाने सदरचा कालावधी आपल्याला चढत्या क्रमाने शुभ फळे प्रतिपादित करेल. परिवारातील विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरतील. त्यांचे प्रश्न संपुष्टात येतील. आपल्या आवडत्या क्षेत्रात कार्य करण्याची संधी मिळेल.

शुभ दिनांक :- २, ५, ६, ९, १७, १८,२२,२७,३०

अशुभ दिनांक : ७, ८, १३,१५,२१,२५,२७

Mumbai : मुंबापुरी गणेश विसर्जनासाठी सज्ज; मुंबईच्या वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

पालखी निघाली राजाची...लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ; भाविकांना अश्रू अनावर | Video

Pune : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुणेकर सज्ज; वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

Mumbai : मित्राला अडकवण्यासाठी मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी; नोएडामधून ज्योतिषाला अटक

Mumbai : लालबागच्या राजाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर भीषण अपघात; साखरझोपेत असताना २ चिमुकल्यांना अज्ञात वाहनाने चिरडले, एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी