डॉ. सविता महाडिक, ज्योतिष भूषण
कुंभ
व्यावसायिक आर्थिक कोंडी सुटेल
कुंभ राशीचे स्वामी शनी महाराज आहेत. तशीच कुंभ राशी वायुतत्त्व व बौद्धिक रास आहे. या राशीतील चांगले गुण ठळकपणे दिसतात. या राशीच्या जातकांना शारीरिक कष्ट जास्त प्रमाणात घ्यावे लागतात, पण ते सेमीच असतात. त्यामानाने बौद्धिक कष्ट जास्त प्रमाणात दिसून येतात. कार्य करीत असताना त्यात नियोजन व नियम असतात. त्याने शारीरिक कष्ट कमी होऊन जबाबदारीने नियोजनबद्ध कार्य करण्याची सवय असते. ही त्यांची विशेषता मानली जाते. त्यांच्या कार्यामध्ये एक प्रकारचा व्यवहारीपणा असतो व त्यात न्याय, स्वार्थ, त्याग असतो. शिस्तबद्धता असते. ऐषआरामाकडे जास्त लक्ष न देता आपल्या कार्याकडे लक्ष ठेवणे महत्त्वाचे मानतात. नियमित सातत्याने कार्यरत असतात, परंतु त्यांचे कार्य पूर्ण होण्यास विलंब लागू शकतो, परंतु कार्य व्यवस्थित पूर्ण करतात. अर्थातच पत्रिकेमध्ये चंद्र व शनी सुस्थितीत असल्यास सर्व सकारात्मक गुण या व्यक्तींच्या अंगी असतात अन्यथा या गुणांच्या विरुद्ध जातक असू शकतो.
शिक्षण : शिक्षण क्षेत्रातील कोणत्याही शाखेतील शिक्षण घेण्यासाठी संमिश्र ग्रहमान असल्यामुळे कधी गोड तर कधी कडू फळे मिळू शकतात. त्यामुळे आपण आपल्या कष्टाची प्रामाणिक राहणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. आपला हेतू स्पष्ट असणे गरजेचे आहे, तसेच कुसंगत टाळणे गरजेचे राहील. अभ्यास मग्न राहिले पाहिजे तसेच इतरत्र कोणत्याही प्रकारचा वेळ वाया जात नाही याकडे लक्ष ठेवणे गरजेचे राहील. आपली ग्रहण क्षमता चांगली राहील पण काही कारणास्तव मन विचलित राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही. म्हणून मन शांत ठेवण्यासाठी विशेष प्रयत्नांची आवश्यकता आहे. जर आपले प्रयत्न योग्य दिशेने झाले तर आपण उज्ज्वल यश मिळवू शकाल. प्रयत्नांना यश येईल व त्यात सातत्य ठेवणे आवश्यक आहे. कला व क्रीडा क्षेत्रात चांगले यश मिळणार आहे. परदेशासंबंधी शिक्षणामध्ये आपल्या प्रयत्नांद्वारे यश मिळवू शकाल.
पारिवारिक : या कालावधीमध्ये काही वेळेस आपल्याला मानवी उपद्रवांच्या त्रासाला सामोरे जावे लागू शकते. हितशत्रू अथवा शत्रूच्या कारवाया वाढून त्यांना वेग येऊ शकतो. विशेषतः राजकारणासारखे क्षेत्रामध्ये विरोधक प्रबळ होऊ शकतात. त्यांच्या कारवायांकडे लक्ष ठेवणे गरजेचे राहील, शत्रुत्वाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे दुखापतींपासून जपा. वाहने सावधगिरीने चालवणे गरजेचे राहील तसेच इतरांच्या वाहनाशी स्पर्धा करू नका. वाहतुकीचे नियम पाळणे हिताचे ठरेल. उत्तरार्धात मात्र आर्थिक परिस्थिती चांगली राहून कोंडी फुटेल अथवा नवीन मार्ग मिळतील. अप्रतिष्ठेचे भय जाईल, मात्र कुटुंबामध्ये वैद्यकीय खर्च अचानक वाढण्याची शक्यता असल्यामुळे स्वतःच्या तसेच कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याकडे वेळेसच लक्ष देणे क्रमप्राप्त आहे.
नोकरी, व्यवसाय व धंदा : सध्याचे ग्रहमान अनुकूल नसल्यामुळे जीवनातील प्रत्येक क्षेत्रामध्ये जागरूक अथवा सावध राहणे गरजेचे आहे. परिवारातील सदस्यांबरोबर वादविवाद टाळणे.
शुभ दिनांक : 2,4,19,20,24,25,28
अशुभ दिनांक : 1,3,9,10,11,15,30
मीन
सकारात्मक रहा
मीन राशीवर गुरू या ग्रहाचे कारकत्व असते. म्हणजेच मीन रास ही गुरूची रास आहे. मीन राशीचा प्रभाव मानवी शरीराच्या पावलांशी असतो. गुरूच्या पावलांचे पूजन अतिशय उत्तम तसेच प्रभावी ठरते. मोक्षस्थानाशी संबंधित असल्याने मोक्षासाठी गुरूंच्या पावलांचे पूजन श्रेष्ठ ठरते. या राशींच्या जातकांचे भक्तिमार्ग व मोक्षप्राप्तीच्या प्रयत्नासाठी केलेले प्रयत्न जास्त असतात. सत्वगुणी देवांचा देव बृहस्पती म्हणजेच गुरुपूजन करणाऱ्या व्यक्ती कर्तव्यदक्ष, तत्त्वज्ञानी असतात. इतरांना मार्गदर्शन देण्याचा मूळतः स्वभाव असतो. निस्पृहता व निष्पक्षपाती असतात. धार्मिक कृत्य करणे, सामाजिक कार्याची आवड, सुखशांतीसाठी सातत्याने प्रयत्नशील असणे, इत्यादी गुण मीन राशीच्या जातकांमध्ये दिसतात. कुंडलीमध्ये अथवा पत्रिकेमध्ये गुरू व चंद्र हे ग्रह सुस्थितीत असल्यास वरील सर्व गुण त्या जातकांच्या स्वभावात दिसून येतात. अन्यथा या गुणांच्या विरुद्ध गुण सुद्धा आढळतात.
शिक्षण : शिक्षणासाठी सदरचा कालावधी मिश्र स्वरूपाचा असल्यामुळे आपल्याला आपला दृष्टिकोन स्वतंत्र व निश्चित करणे महत्त्वाचे ठरेल, त्याचप्रमाणे प्रयत्न व परिश्रम घेणे याला पर्याय नसणार आहे. योग्य दिशेने केलेले प्रयत्न सफल ठरतील. त्याचप्रमाणे आपली ग्रहण क्षमता चांगली असल्याने त्याचाही फायदा होईल. कला व क्रीडा क्षेत्रात अनुकूलता मिळणार आहे. चांगल्या संधी प्राप्त होतील तसेच मार्गदर्शनही लाभेल. परदेशासंबंधित शिक्षणात आपल्या योग्य प्रयत्नांद्वारे आपण चांगले यश संपादित करू शकाल. संधीचे सोने करणे आपल्यासाठी आहे हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
पारिवारिक : सध्याच्या ग्रहमानातील कुयोगांच्या पार्श्वभूमीवर कुटुंबात काही वेळेस विचित्र प्रसंग घडून नकारात्मक विचारांचे वादळ निर्माण होऊ शकते. त्यासाठी आपण शांत राहून अथवा पुढाकार घेऊन कुटुंबातील समस्या अथवा प्रश्न सोडवणे महत्त्वाचे ठरेल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रयत्नांना यश लाभेल व कुटुंबातील शांतता टिकून राहण्यास मदत होईल. काही वेळेस घरातील प्रिय व्यक्तींचे विचित्र वागणे अस्वस्थ करू शकते. जीवनसाथीबरोबरील संबंधांना महत्त्व देणे हितकारक ठरेल. या कालावधीच्या उत्तरार्धात मात्र परिस्थिती बदलून काही उत्साहवर्धक व परिस्थिती बदलणाऱ्या वार्ता कुटुंबात मिळाल्यामुळे उत्साही वातावरणाचा लाभ मिळेल.
नोकरी, व्यवसाय व धंदा : या महिन्यात सावधानतेने पावले उचलणे जरुरी राहील. कोणताही लहान मोठा निर्णय पूर्ण विचारांती व शांतपणे घेणे जरुरी राहील. त्याचा पुढील भविष्यावर सखोल परिणाम होणार आहे. म्हणून आता सावधपणे पावले उचलणे गरजेचे ठरेल. परिवारात तसेच आपल्या कार्यक्षेत्रात अथवा नोकरी, व्यापार, व्यवसायात एखादी गुप्त चिंता मनात घर करून राहू शकते. त्यामुळे आपले रोजचे जीवनमान बदलेल. प्रत्यक्षात ताणतणाव नसतानाही तो जाणवण्याची शक्यता आहे.
शुभ दिनांक : 2,4,5,12,13,19,20,21,23
अशुभ दिनांक : 1,3,9,10,11,15,30