अशी घडली सेफ्टी पिन 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
अक्षररंग

अशी घडली सेफ्टी पिन

आज आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग ठरलेली ही छोटी सेफ्टी पिन, खरं तर एका संशोधकाने केवळ एका रात्रीत आणि तेही नाइलाजास्तव शोधली होती, कशी ते पहा!

नवशक्ती Web Desk

नवलनगरी

सोनाली कोलारकर-सोनार

आज आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग ठरलेली ही छोटी सेफ्टी पिन, खरं तर एका संशोधकाने केवळ एका रात्रीत आणि तेही नाइलाजास्तव शोधली होती, कशी ते पहा!

नमस्कार बालमित्रांनो, सुरक्षित अंतर राखून, सावध राहून कोणतीही गोष्ट केली की दुखापत होत नाही. काय आहे की, सेफ्टी फर्स्ट! कुठेही सावधचित्त असणे महत्त्वाचे! आता चिनूने मला फोनवर गमती सांगताना म्हटलं, ‘मावशी, अग मी बागेतून मस्त धावत पेरूच्या झाडाकडे निघालो होतो आणि धावताना चप्पलच तुटली बघ माझी! झाली ना ग पंचाईत? काटे बोचणार मला, असं वाटत असतानाच आजीने पटकन आपली बांगडीला लावलेली सेफ्टी पिन काढली आणि चपलेच्या अंगठ्याला लावून दिली. चप्पल तात्पुरती दुरुस्त झाली! इतकी छोटी सेफ्टी पिन त्या वेळी इतकी महत्त्वाची वाटली ना! कोणी शोधली ग हिला? सांग ना! म्हटलं,’ अरे त्याची गंमतच आहे बघ. १८४८-४९ सालची गोष्ट आहे- अमेरिकन मेकॅनिक वॉल्टर हंट हा मोठा धडपड्या, सतत काही ना काही उद्योग करत राहायचा आणि छोट्या मोठ्या गोष्टी शोधून त्याचे पेटंट घेऊन विकायचा. जनतेच्या उपयोगी आपलं संशोधन यावं या उद्देशाने हा कधी नफा कमावण्याच्या फंदात पडला नाही! एकदा त्याला आपल्या मित्राकडून घेतलेले १५ डॉलर परत करायचे होते. झालं, याने विचार सुरू केला. एक ब्रासची तार घेतली आणि त्याची गुंडाळी करून खटपटी करून सेफ्टी पिनसारखी वस्तू तयार केली. ज्याने कागद, कापडाचे तुकडे त्याने एकत्र बांधून दाखवले. अनेकांना ही तारेची गुंडाळी आवडली आणि मग हंटने १८४९ ला ग्रेस आणि कंपनीला या सेफ्टी पिनचं पेटंट फक्त ४०० डॉलरला विकलं! त्यातले १५ डॉलर आपल्या मित्राला देऊन कर्ज चुकतं केलं आणि उरलेले पैसे या उपद्व्यापी हंटने परत दुसऱ्या संशोधनासाठी खर्च करायला बाजूला ठेवले! हंटला माहीत नव्हतं की हे पेटंट विकून त्याने ग्रेस आणि कंपनीला अलिबाबाची गुहाच उघडून दिली आहे!

कंपनीने हंटच्या मॉडेलमध्ये सुधारणा करून आता आपण जी सेफ्टी पिन वापरतो त्याच्याशी बरेच साम्य असणारं मॉडेल तयार केलं. कालांतराने या मॉडेलमध्ये अजून बदल झाले आणि सेफ्टी पिन जगभर प्रचंड लोकप्रिय झाली! आता सेफ्टी पिनच्या मागच्या गुंडाळीत काही अडकू नये म्हणून एक धातूची छोटी गोळीच असते जी अधिक लोकप्रिय झाली आहे आणि माहिती आहे का, हा हरहुन्नरी वॉल्टर हंटच आहे ज्याने आपले सगळ्यांचे उपयोगी फाऊंटन पेन देखील तयार केले आणि शिवणयंत्र देखील!

थोडक्यात १५ डॉलरचं कर्ज फेडायला ही सेफ्टी पिन जन्माला आली आणि तीही अपघातानेच!!

पर्यावरण शिक्षक, प्रकाशक-संपादक

sonalikolarkarsonar@gmail.com

Mumbai : डबेवाल्यांची नवी इनिंग, क्लाऊड किचन उभारणार; जुनी सेवा अडचणीत, काळानुसार बदलण्याचा निर्णय

Mumbai : सायन उड्डाणपुलाच्या कामाला पुन्हा खीळ; पहिल्या गर्डर लाँचिंगला विलंब, १५ ऑगस्टपर्यंत वाहतूक सुरू होण्याची शक्यता धूसर

Mumbai : मीरा-भाईंदरमध्ये मराठी असल्याने भाड्याचे घर नाकारले; घरमालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Thane : शिवसेना ठाकरे गटाच्या दणक्यानंतर परिवहन विभाग ताळ्यावर; ST स्टँडमध्ये पंखे, शौचालयाची मोफत सुविधा आणि नवीन खुर्च्यांची व्यवस्था

Mumbai : जे. जे. रुग्णालयातील प्रसूती विभागाचा कायापालट; दानशूरांच्या आर्थिक मदतीने नूतनीकरण