अक्षररंग

मेणबत्त्या घेऊन निघाल्या आहेत मुली

न्यायाच्या शोधात, सर्जनाचे सारे स्त्रोत, आटून जाताहेत आतल्या आत, गर्भाशयावर पडणाऱ्या अवकाळी...

नवशक्ती Web Desk

काव्यकट्टा

नीरजा

न्यायाच्या शोधात

सर्जनाचे सारे स्त्रोत

आटून जाताहेत आतल्या आत

गर्भाशयावर पडणाऱ्या अवकाळी

थापेच्या आवाजानं

कधी छिन्नविछिन्न होईल ते

या काळजीनं धास्तावलेल्या मुली

ओढून घेताहेत आपलं गर्भाशय खोल काळजात

आणि ठेवू पाहताहेत जपून स्वतःसाठी.

मुलींना आता वाटत तर नाही ना

करावीशी बंद

दारं गर्भाशयाची?

किंवा असंही वाटू शकेल त्यांना

असू नये लिंग

फाळासारखं रुतणारं जमिनीत

आपल्या आत वाढणार्‍या गर्भाचं

असावी निर्मिणारी योनीच केवळ.

गर्भाशय उखडून टाकणार्‍या हाताचं भय

वाढत गेलं मुलींच्या मनात

तर मुलीच संपवून टाकतील

निर्मितीच्या सार्‍या शक्यता.

मुलींना आता सांगाव्या लागतील गोष्टी

पुरुषातही लपलेल्या अपार मायेविषयीच्या

स्त्री आणि पुरुषात उमलून येणार्‍या अलवार नात्याविषयीच्या,

त्यांच्यातील संवादाच्या.

मुलींच्या हातातल्या

फडफडणाऱ्या मेणबत्तीभोवती

आता मुलांनाच धरावा लागेल हात

प्रकाशाच्या किरणांना वाचवायचं असेल तर!

Mumbai : 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ होणार कमी

टीएमटीच्या ताफ्यात पहिली डबलडेकर ई-बस दाखल

Pune : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; खंडाळा घाटात वाहनांच्या रांगा, खासदार सुप्रिया सुळेही दोन तास अडकल्या, VIDEO

Navi Mumbai : डीपीशेजारी कचरा टाकू नका, गाड्या पार्क करू नका; महावितरणचे आवाहन

मानखुर्दमध्ये क्रेन दुर्घटना : कंत्राटदाराला एक कोटींचा दंड