अक्षररंग

अहो, तुम्ही देता का शिव्या?

नुकत्याच झालेल्या एका अत्यंत महत्त्वपूर्ण सर्वेक्षणाने आपल्या सर्वांचे डोळे उघडले आहेत आणि डोळ्यांसोबत कानही. कारण हे सर्वेक्षण आहे, आपल्या लाडक्या 'शिव्यां' बद्दल! होय, आपल्या दररोजच्या संभाषणाचा अविभाज्य भाग असलेल्या शिव्यांबद्दल.

राकेश मोरे

आगळंवेगळं

नुकत्याच झालेल्या एका अत्यंत महत्त्वपूर्ण सर्वेक्षणाने आपल्या सर्वांचे डोळे उघडले आहेत आणि डोळ्यांसोबत कानही. कारण हे सर्वेक्षण आहे, आपल्या लाडक्या 'शिव्यां' बद्दल! होय, आपल्या दररोजच्या संभाषणाचा अविभाज्य भाग असलेल्या शिव्यांबद्दल. ठेच लागल्यावर, रस्त्यावरील भांडणात, लोकलमध्ये चढताना, गर्दीत धक्का लागल्यावर आपल्या तोंडातून मराठीत 'म' आणि 'भ'वरून, तर इंग्रजीत 'एफ' वरून जे आपसूक शब्द निघतात 'त्या'बद्दल.

भारतासारख्या वैविध्यपूर्ण आणि बहुभाषिक देशात एक भाषा सर्वत्र समजली जाते, ती 'शिव्यांची भाषा'! मित्रांसमोर मन मोकळं करण्यासाठी, भांडणात राग व्यक्त करण्यासाठी आमच्या तोंडून अपशब्द निघतो, असं शिव्या देणारे सहज मान्य करतात. मात्र भारतात कोणत्या राज्यात सर्वाधिक शिव्या दिल्या जातात, हे ठाऊक आहे का?

२०१४ ते २०२५ या दहा वर्षांच्या काळात 'गाली बंद घर अभियान' या मोहिमेंतर्गत एक देशव्यापी सर्वेक्षण करण्यात आलं. या सर्वेक्षणाचा निष्कर्ष ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. देशातील तब्बल ५५ टक्के लोक नियमितपणे शिव्या देतात. 'गाली इंडेक्स' नावाच्या या निर्देशांकानुसार, दर दोन भारतीयांपैकी एक जण शिव्या देतो. म्हणजे आपण लोकसंख्येच्या बाबतीत जगात नंबर एक आहोतच, पण आता शिव्यांच्या बाबतीतही आपली घोडदौड सुरू आहे.

या सर्वेक्षणाच्या स्पर्धेत दिल्लीने बाजी मारली आहे. ८० टक्के दिल्लीकर आया-बहिणींवरून शिव्या देण्यात आघाडीवर आहेत. दिल्लीचे लोक राजकारण, वायुप्रदूषण, याबरोबरीनेच तर शिव्या देण्यातही आघाडीवर आहेत. त्यांच्या पाठोपाठ पंजाब (७८ टक्के), उत्तर प्रदेश, बिहार (७४ टक्के प्रत्येकी) आणि राजस्थान (६८ टक्के) यांचा नंबर लागतो. या राज्यांनी एकत्र येऊन जणू 'शिव्यांचा पट्टा' तयार केला आहे.

एकीकडे उत्तर आणि पश्चिम भारत शिव्यांची नवी उंची गाठत असताना, दक्षिण भारताने मात्र संयम दाखवला आहे. तेलंगणा (३५ टक्के) सर्वात संयमी राज्य ठरलं आहे. त्याच्या पाठोपाठ आंध्र प्रदेश, केरळ, तमिळनाडू आणि कर्नाटक आहेत. महाराष्ट्र तेवढा संयमी नाही. इथे ५८ टक्के लोकांना अपशब्दांविषयी प्रेम आहे. गुजरातचं अपशब्दांविषयीचं हे प्रेम तीन टक्क्यांनी कमी म्हणजे ५५ टक्के आहे.

शिव्या देणे हे केवळ पुरुषांचं काम नाही. पुरुषांइतक्याच महिलाही शिव्या देतात. आया-बहिणींवरून असलेल्या शिव्यांचा वापरही महिला करतात. कदाचित हीच लैंगिक समानता असावी!

सेल्फी विथ डॉटर फाऊंडेशनचे संस्थापक आणि महर्षी दयानंद विद्यापीठ येथील प्राध्यापक डॉ. सुनील जगलान यांनी २०१४मध्ये 'गाली बंद घर अभियान' सुरू केलं. याचा एक भाग म्हणून वेगवेगळ्या राज्यांमध्ये सर्वेक्षण करण्यात आलं. २०१४ पासून ५,००० गावं आणि शाळांमध्ये जाऊन सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणातून एकच गोष्ट शिकायला मिळते, ती म्हणजे आपली भाषा किती समृद्ध आहे. केवळ सुंदर शब्दांनीच नाही, तर शिव्यांनीही. काही लोक म्हणतात की, शिव्या देणं म्हणजे आपल्या युक्तिवादाची कमतरता दर्शवणं. पण ज्यांना ८० टक्के शिव्यांचा वापर करूनही आपापल्या राज्यात आघाडीवर राहता येतं, ते कमी नक्कीच नाहीत.

'अहो, तुम्ही शिव्या देता का?' या प्रश्नाचं उत्तर 'हो' किंवा 'नाही' असं देण्याऐवजी, तुम्ही कोणत्या राज्याचे आहात, हे सांगा. तेच पुरेसं असेल !

Video : नेपाळमध्ये महाप्रलय! भोटे कोशी नदीला अचानक महापूर; अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती, किमान १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता

शासकीय, खासगी, धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिट; तातडीने कार्यवाही करण्याचे आरोग्य मंत्र्यांचे निर्देश, राज्य सरकार ॲक्शन मोडवर

Pune : भटक्या कुत्र्याचा महिलेवर हल्ला; तोल जाताच बाळ पडलं खाली, Video व्हायरल

Mumbai : निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता; राजावाडी रुग्णालयातील अन्य डॉक्टरांवर ताण, दिवसाला ५०० रुग्णांची तपासणी

Madhya Pradesh : भाजप आमदाराने अग्निशमन दलाच्या वाहनाने धुतली स्वतःची कार; VIDEO व्हायरल