देवावर श्रद्धा असलेला डल्ला कसा मारेल? संग्रहित छायाचित्र
अक्षररंग

देवावर श्रद्धा असलेला डल्ला कसा मारेल?

देव, धर्म आणि श्रदेच्या नावाखाली घडणान्या भ्रष्टाचारामुळे सर्वसामान्य माणसाच्या विश्वासाला मोठा धक्का बसतो. मंदिरातील चोरी आणि घोटाळयांच्या निमित्ताने श्रद्धा, नैतिकता आणि वास्तव यांचा वेध घेणारा हा लेख.

नवशक्ती Web Desk

विशेष

श्याम मानव

देव, धर्म आणि श्रदेच्या नावाखाली घडणान्या भ्रष्टाचारामुळे सर्वसामान्य माणसाच्या विश्वासाला मोठा धक्का बसतो. मंदिरातील चोरी आणि घोटाळयांच्या निमित्ताने श्रद्धा, नैतिकता आणि वास्तव यांचा वेध घेणारा हा लेख.

अयोध्येतील राम मंदिर दानपेटीमधील चोरीसंबंधी आणि घोटाळ्यासंबंधी बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि संपूर्ण देश हादरला. कारण श्रीराम प्रभूविषयी सर्वसामान्य जनतेच्या मनात जी प्रेमाची, श्रद्धेची भावना आहे त्यावर या घटनेमुळे जबरदस्त आघात झाला. ज्या प्रभू रामचंद्राचं मंदिर बनण्यासाठी एवढं मोठं आंदोलन या देशामध्ये झालं. मोठ्या प्रमाणावर यामध्ये लोक सहभागी झाले. मंदिरासाठी सोन्याच्या, चांदीच्या विटा दान केल्या. मंदिर बांधणीसाठी मोठ्या प्रमाणावर दानात रक्कम जमा केली. त्याचा राजकीय परिणाम म्हणून एक विशिष्ट विचारसरणीचे आरएसएसचे, भाजपचे लोक सत्तास्थानी आले. अशा पवित्र राम मंदिराच्या दानपेटीतील चोरी कोणी कशी काय करू शकतो? असा प्रश्न सर्वसामान्य श्रद्धाळू माणसाला पडतो. कारण किमान देवासोबत तरी कुणी खोटेपणा करण्याचं, देवाला फसवण्याचं धाडस करणार नाही. धाडस करू शकत नाही. अशी सर्वसामान्य माणसाची बद्धा असते. म्हणूनच राम मंदिर दानपेटीतील चोरीसंबंधी जेव्हा तो ऐकतो किंवा राम जन्मभूमीसाठी विकत घेतलेल्या जमिनीमध्ये कोट्यवधीचे घोटाळे झाले या बातम्या त्यांच्यापर्यंत पोहोचतात, त्यावेळेस तो प्रचंड अस्वस्थ होतो. ही सर्वसामान्य माणसाची, नितांत श्रद्धा असणाऱ्या माणसाची भावना झाली.

पण मंदिराच्या दानपेटीतली चोरी असो अथवा मंदिरातल्या दागिन्यांची चोरी असो अथवा मंदिर, मस्जिद, चर्च यांच्या व्यवस्थापनातला भ्रष्टाचार असो, हा काही अपवाद नाही, अथवा त्याचं अप्रूप वाटावं असं काहीही नाही. असं सातत्याने या देशात आणि जगभर घडत आलं आहे. अयोध्येतील राम मंदिर दानपेटी चोरीसंबंधी एसआयटी गठित केली आहे. तिचा रिपोर्ट सांगतो, ४० दिवसांमध्ये ७० वेळा चोरी झाली. सीसीटीकीमुळे तसे पुरावे समोर आले आहेत. एसआयटीच्या म्हणण्याप्रमाणे, ८० लाख रुपयांची चोरी झाली. सोशल मीडियावरच्या आणि इतर बातम्या अंदाज व्यक्त करतात की हा घोटाळा एक हजार कोर्टपिक्षा अधिक रुपयांचा आहे. दोन कोटी रुपयांची जमीन विकत घेऊन काही तासांतच ती १८.५ कोटींना विकली गेली. या एवढ्या मोठ्या भ्रष्टाचाराबद्दल राम जन्मभूमीचे सर्वेसर्वा चंपत राय म्हणतात की, वात घोटाळा नाही. आजच्या बाजारभावाने ही किंमत दिली गेली आहे. पण काही तासांपूर्वीच दोन कोटीना विकत घेतलेली जमीन १८.५ कोटींमध्ये आपण विकत घेतो, यात त्यांना भ्रष्टाचार वाटत नाही. एवढे ते निर्धावलेले आहेत.

एसआयटीने एफआयआर दाखल करून आठ लोकांना अटक केली. तरीपण संबंधित चंपत रायसारखे मोठे ट्रस्टवर संपूर्ण कंट्रोल असलेले लोक या घोटाळ्याशी आपण संबंधित नाही असंच सांगत आहेत. याआधी महाकाली टेम्पल, पवनगड येथील गर्भगृहातून २०२४ मध्ये ७८ लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी झाली. तारातारीनी मंदिरात २०२४ साली दहा लाख रुपयांचे मध्ये लाखो रुपयांचे दागिने चोरीला गेले. कोदंडा रामस्वामी मंदिरामध्ये २००९ मध्ये मंदिराच्या पुजाऱ्याने दहा लाख रुपयांचे दागिने गहाण ठेवले होते. त्याच्या आर्थिक अडचणींमुळे ही चोरी केली असे त्याने सांगितले होते. सबरीमाला मंदिरात १९२५-२६ साली दुरुस्तीच्या कामावेळी सोन्याचा मोठ्या प्रमाणावर अपहार झाला. त्यामुळे एसआयटी गठित झाली. या चोरीमध्ये मंदिर संबंधित अधिकाऱ्यांचा आणि सोनारांचा संबंध होता, असे पुढे सिद्ध झाले. श्री पद्मनाभस्वामी मंदिरात २०२६ मध्ये जेवढी नाणी आणि सोनं जमा झालं होतं ते त्या प्रमाणात उपलब्ध नव्हतं. महणजे चोरी झाली होती, असा अंदाज व्यक्त करण्यात आला.

अशी उदाहरणं अनेक मंदिरांवाचत पाहायला मिळतात. काही वेळेस बाहेरचे चोर देऊन चोरी करतात. पण त्यामध्ये अनेकदा स्थानिक पुजारी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभागी असतात. असे पुरावे वारंवार समोर आले आहेत, रात्रंदिवस देवाच्या सान्निध्यात असणारे हे पुजारी देवाच्याच दागिन्यांची वा देणगीची चोरी करण्याची हिंमत कशी करतात ? चोरी करणारे चोर देवाची संपत्ती चोरण्याची हिंमत का करतात? अशी हिंमत ते कसे करू शकतात ? या प्रश्नांची उत्तरं आपण शोधली पाहिजेत. माणूस कोणत्याही धर्मामध्ये जन्मलेला असो. सर्वसामान्य माणसांवर एक सामान्य संस्कार झालेला असतो. देवाचे सर्वांवर बारीक लक्ष असतं. त्याच्यापासून काहीही लपवता येत नाही. हा एक संस्कार प्रत्येक धार्मिक माणसावर खोलवर झाला असतो. सगळ्या प्रामाणिक, चांगल्या गोष्टींचा संबंध तो देवाशी जोडतो. देवाला मानणारा माणूस प्रामाणिकपणेच वागेल, खोटेपणा करणार नाही, चोरी करणार नाही, गुन्हेगारी करणार नाही अशी सर्वसामान्य माणसाची समजूत असते. कारण देव मानणाऱ्या माणसाला आपण जे काही करतो ते देवाला कळतं, हे माहीत असतं. त्यामुळे तो असली कृत्य करण्यासाठी धजावत नाही. असाही समज असतो. जर देव आणि धर्मावरचा लोकांचा विश्वास उडाला तर समाजामध्ये गुन्हेगारी वाढेल, अप्रामाणिकपणा वाढेल, एक दुसऱ्याचा सर्रास खून करतील, माणसं माणसासारखी वागणार नाहीत, जनावरासारखी वागतील, अशी समजूत लहानपणापासून सर्वसामान्य माणसांवर झालेल्या धार्मिक संस्कारांमधून निर्माण झालेली असते. पण ती सत्य आहे काय ? एकेकाळी माझीही अशीच ठाम समजूत होती. १९७५ साली जून महिन्यात आणीबाणी लागली. त्यावेळी आणीबाणीला विरोध केला महणून मी जेलमध्ये नऊ-दहा महिन्यांसाठी होतो. अणीबाणीला विरोध करून आलेले आम्ही तीन विद्यार्थी वगळता बाकीचे सगळे हिस्टरी शीटर होते. वर्ध्याच्या जेलमध्ये कोंबले होते. सारच्या सारे कैदी देव मानत होते. रोज आपापल्या श्रद्धेनुसार, धर्मानुसार पूजा करत होते. कैद्यांच्या बॅरॅकमध्ये दारांच्या लोखंडी बार्सवर देवांच्या तसबिरी लटकल्या होत्या. केवळ आम्ही तीन विद्यार्थी त्या काळात देवपूजा करत नसू. पुढे त्या सगळ्यांशी अतिशय चांगली मैत्री व संवाद सुरू झाला. मग तीव्रतेने लक्षात आलं की प्रत्येकाचा देव त्याच्या अनैतिक कामांमध्ये मदत करतो, अशी त्याची श्रद्धा असते. एक मुस्लिम समाजातील गुंड आमच्या जेलमध्ये होता. त्याने मला सांगितलं. आजपर्यंत त्याने अनेक खून केले पण तो कधीही पकडला गेला नवकता. यावेळेस तो का पकडला गेला? कारण? त्याने त्याचा नेहमीचा एक नियम मोडला. पुलगावच्या जागृत हनुमानाच्या मंदिरामध्ये दर आठवड्याला विशिष्ट दिवशी तो मारुतीला शेंदूर चढवत असे. पोलिसांमध्ये असलेल्या त्याच्या स्त्रोताद्वारे लाला अटक करपाचा आदेश निघाला आहे असं त्याला कळलं. विशिष्ट दिवशी तो त्या मंदिरात येतोच वेतो हे पोलिसांना माहीत होतं. म्हणून पोलीस त्या ठिकाणी त्याला अटक करतील अशी सूचना मिळाली होती. म्हणून तो त्या दिवशी हनुमानाला शेंदूर चढवायला गेला नाही आणि तिसऱ्याच दिवशी त्याला अटक झाली.

त्याची गाढ श्रद्धा होती की त्याने दर आठवड्याला मंदिरात जाण्याचा नियम तोडला, शेंदूर चढवला नाही, म्हणूनच मारुतीने त्याचे संरक्षण केले नाही. त्यामुळे त्याला पोलीस अटक करू शकले. हे मी जेव्हा प्रत्यक्ष या लोकांच्या तोंडून ऐकलं, अनुभवलं त्यावेळेस आजपर्यंतचा माझ्यावर झालेला संस्कार अंतर बाह्य हादरून गेला होता. कारण सगळ्याच चांगल्या गोष्टींचं, प्रामाणिकपणाचं, उत्तम गुणांचं प्रतीक म्हणजे देव. या संस्काराला प्रचंड छेद देणारी ही गोष्ट होती.

ज्या काळामध्ये मी बुद्धिप्रामाण्यवादी नव्हतो त्याही काळात मी मंदिरांमध्ये जायची. विवेकवादी झाल्यावरही मी भारतातल्या सगळ्याच धार्मिक स्थळांना भेटी देत असतो. कोणत्याही सर्वसामान्य धार्मिक श्रद्धाळू माणसपिक्षा मी अधिक धार्मिक स्थळांवर गेलो आहे. त्या ठिकाणी थांबून अतिशय सूक्ष्म अवलोकन करत असतो. या सगळ्या अनुभवांच्या आधारावर मला ठामपणे आज सांगता येतं की मंदिरातल्या पुजाऱ्यांचा, त्या ठिकाणी वावरणाऱ्या पंड्यांचा देवावर अजिबात विश्वास नसतो. या जगात देव नाही याची त्यांना शंभर टक्के खात्री असते. म्हणूनच देवापुढे उभे राहून, देवाच्या साक्षीनं, ते धादांत खोटे बोलत असतात, श्रद्धाळू माणसांना लुबाडत असतात, त्यांना असं केलं नाही तर त्यांचं वाईट होईल अशी भीती घालत असतात, अथवा पैशाच्या विशिष्ट महागड्या पुजेच्या मोबदल्यात मोक्षाचं गाजर विकत असतात. जगात देव आहे याची एक टक्का जरी त्यांना खात्री असती तरी भक्तांना अशा पद्धतीनं लुबाडण्याची त्यांची हिंमत झाली नसती.

राहू केतूची, साडेसातीची, ग्रह गोलांच्या आपत्तीची भीती घालून तथाकथित मौल्यवान दगड, मुळात अत्यंत कमी किमतीची असलेली, अत्यंत महागड्या किमतीमध्ये 'राशी रत्न' म्हणून विकणारे, विशिष्ट महागडी पूजा घालून गंडांतरं टाळण्याचा दावा करणारे, सारे ज्योतिषी १००% नास्तिक असतात. त्या सगळ्यांना नीट माहीत असतं की आपण कितीही लोकांना लुबाडलं, देवाच्या नावावर फसवलं, तरी देव काही आपलं बिघडवणार नाही.

गेली ४४ वर्षे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नावाखाली मी या क्षेत्रामध्ये काम करतो आहे. त्या अनुभवाच्या आधारावर अतिशय ठामपणे मी म्हणू शकतो आहे की, ज्योतिषी, पंडित, पुजारी, बाबा असोत हे सारेच्या सारे या जगात देव नाहीत याची खात्री असणारे लोक असतात. तेव्हाच ते देवाच्या नावावर सर्वसामान्य लोकांचं शोषण करू शकतात. त्यांना लुबाडतात. १९८३ साली मी पहिल्यांदा गुजरातचा दौरा केला होता. एकूण ४८ कार्यक्रमांचा तो दौरा होता, तमिळनाडूचे बी. प्रेमानंद चमत्कार करत असत. मी तीन तास भाषण देत असे. एक अतिशय मोठे व्यापारी होते. त्यांचा परिचय 'वे नारायण स्वामी के दूसरे भाई है', असा करून देण्यात आला. दोन दिवसांनंतर मला आणखी एका मोठ्या व्यापाराचा परिचय करून देताना हे नारायण स्वामी के तिसरे भाई है असं मला सांगण्यात आले. तेव्हा त्यांनी मला समजावून सांगितलं की गुजरातमध्ये मोठे व्यापारी, कारखानदारांमध्ये नारायण स्वामी महणजे देवाला पार्टनर बनवण्याचा प्रघात आहे. आपल्या व्यवसायातला देव जेवढ्या टक्क्यांचा पार्टनर असेल तेवढ़ा फायदा देवधर्मावर खर्च करतात. त्यामध्ये मुळीच बेईमानी करत नाही. काही दिवसांनंतरच हे दुसरे नारावण स्वामीचे बंधू तेलाच्या भेसळीमध्ये पकडले गेले, ते खाण्याच्या तेलाचे खूप मोठे व्यापारी होते. माझ्या लक्षात आलं की देवाला जर आपल्या व्यवसायाचा पार्टनर बनवलं तर मग व्यवसायामध्ये कोणतेही अनैतिक मार्ग वापरता येतात. वाटेल ते वाईट मार्ग अवलंबण्याची भीती वाटत नाही. कारण प्रत्यक्ष देवच पार्टनर असतो, त्यातून त्यांना अनैतिक कृत्य करण्याचं प्रचंड बळ मिळतं. म्हणजे मानव जातीला घातक कृत्य करण्याचं नैतिक बळही देवाच्या श्रद्धेतनं मिळवता येतं.

इतक्या वर्षांच्या अनुभवाच्या आधारावर मी एवढेच सांगन की मुळामध्ये नैतिक आणि प्रामाणिक असणारी माणसं जर देव मानणारी असतील तर प्रामाणिकतेचं आणि नैतिकतेचं बळ देव देतो असे ती मानतात, अशी ती श्रद्धा बाळगतात. ती प्रामाणिकपणे आणि नैतिकतेने वागतात. जी माणसं मुळात अनैतिक आहेत, ते आपल्या अनैतिक कृत्याच्या समर्थनार्थ देवाच्या श्रद्धेचा उपयोग करून घेतात. आपल्या पापक्षालनाच्या प्रक्रिया पहा. कितीही पाप करा. ब्राह्मणाला गाय दान करा, पापातून मुक्ती मिळेल, गंगेमध्ये स्नान करा, देवाला दान दक्षिणा द्या, वाचा प्रत्यक्ष परिणाम असा होतो की, माणूस वाटेल ते पाप करण्यासाठी धजावतो, चुकीची किंवा अनैतिक कृत्य केल्यामुळे जी मनाला अपराधीपणाची टोचणी लागते त्यापासून मुक्ती प्राप्त करण्यासाठीही पापक्षालनाची प्रक्रिया अंमलात आणली जाते.

त्यामुळे माणसानं धर्माचा आणि देवाच्या श्रद्धेचा अनैतिक कृत्य करण्यासाठी, चोरी करण्यासाठी, गुन्हेगारी कृत्य करण्यासाठी असा उपयोग करून घेतला आहे. उलट त्यातून हे गुन्हेगारी कृत्य करण्याचं अधिक बळ मिळवलं आहे, जो सर्वसामान्य माणूस देवावर श्रद्धा ठेवत नाही, त्याची फार गोची होते. कारण पापक्षालनाच्या प्रक्रिया त्याच्यासाठी उपलब्ध नसतात. त्यामुळे अनैतिक किंवा चुकीचं कृत्य केल्यामुळे मनामध्ये जी अपराधीपणाची टोचणी निर्माण होते, त्यापासून त्याची सुटका होत नाही. ती अपराधीपणाची टोचणी त्याला सारखी डाचत असते. त्याचे मन खात असते. त्यामुळे कदाचित वा त्रासापासून वाचण्यासाठी तरी तो त्या अनैतिक कृत्यापासून स्वतःला परावृत्त करण्याचा प्रयत्न करू शकतो. स्वतःला स्वतः सरळ मार्गावर आणू शकतो. अन्यथा ही अपराधीपणाची टोचणी त्याला पागल करू शकते, त्याचं मनःस्वास्थ्य हिरावू शकते.

लहानपणापासून सर्वसामान्य धार्मिक माणसावर कळत-नकळत देवाचा विश्वास संपादन करण्याचा संस्कार होतो. देवाला ११ रुपयांचे पेढे चढव म्हणजे परीक्षेत पास होशील. १०१ रुपयांची पूजा घाल म्हणजे तुझे इप्सित साध्य होईल. या पद्धतीच्या संस्कारातनं आपण देवासोबत सौदा करायला शिकतो. एक पैसा देऊन रुपया काढायला शिकती. भ्रष्टाचार करायला शिकतो. मग एरवी जीवनामध्ये भ्रष्टाचार करण्याची भीती वाटत नाही. जी माणसं देवासोचतच सौदा करतात ती जीवनातल्या सगळ्या अंगांमध्येच त्या पद्धतीचा सौदा करण्यासाठी तयार होतात. म्हणून भारतासारख्या देशांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आढळतो. मग देवाची दानपेटी हाताळणारी माणसं, मंदिराचे ट्रस्टी, हे सगळे भ्रष्टाचारामध्ये चोरीमध्ये सहभागी होतात. कारण त्यांना माहीत असतं. त्यांची खात्री असते. देव त्यांचं काहीही बिघडवत नाही. बिघडवू शकत नाही. कारण त्याला काही कळत नाही, कारण तो या जगात अस्तित्वातच नाही.

खरंच देवावर श्रद्धा असणारा, देव माझ्या आजूबाजूला आहे, चराचरात पसरलेला आहे, त्याच्यापासून काही लपवता येत नाही, अशी श्रद्धा असणारा पुजारी, मंदिराचा ट्रस्टी अशा पद्धतीची चोरी करू शकेल? अपहार करण्याची हिंमत करू शकेल? शक्य तरी आहे काय?

संस्थापक-संघटक अखिल भारतीय अंधश्रद्धा

निर्मूलन समिती

Mumbai Rain: मुसळधार पावसाने मुंबईची गती मंदावली; वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर संथ वाहतूक; अनेक भाग जलमय, VIDEO

पावसाचा ठाणे-पालघर-रायगडला तडाखा! २४ तासांत सरासरी ८५.९ मिमी बरसला; पूरस्थिती, वाहतूक विस्कळीत, प्रशासन अलर्ट मोडवर

मुंबई परिसरात दमदार, धरण क्षेत्रात 'संथ'धार; धरण क्षेत्रात दमदार इनिंगची प्रतीक्षाच, पाणी पातळीत किंचित वाढ

Mumbai : पावसाळ्याचे पुढील तीन महिने अतिमहत्त्वाचे; प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर द्या, आरोग्य समिती अध्यक्ष हरीश भांदिर्गे यांचे निर्देश

Mumbai : मालकी हक्काचे वाद मिटवण्यासाठी नोंदणी रद्द करण्याचा मार्ग वापरता येणार नाही; ४५ वर्षे जुन्या गृहनिर्माण संस्थेची नौदणी रद्द करण्यास न्यायालयाचा नकार