अक्षररंग

वाघोबा माझा सोयरा

बाबांच्या तोंडची ती हाक ऐकताच वाघोबा वेगानं उठला आणि बाबाच्या जवळ जाऊन आपले अंग घासू लागला जिभेनी बाबाच्या पायाला चाटू लागला. बाबांनीही...

नवशक्ती Web Desk

गोष्ट

प्रेमा खांडवे

शाळा सुटली, पाटी फुटली, आई मला सुट्टी लागली", गाणं गातच चिंटुन आनंदाने आईभवती एक गिरकी घेतली.

"अरे चिंटू, केवढा तो आनंद!"

"आई , महिनाभर सुट्टी मजा, मस्ती धमाल!"

आई,तुला एक गंमत सांगू का? मी न बाबांबरोबर चार दिवसांसाठी जंगलात जाणार आहे . रोमांचक जंगल अनुभव !"

"अरे ,पण बाबा नेणार आहे का तुला"

"हो तर बाबांनी मला तसं प्रॉमिस केलं आहे."

"अरे शहाण्या, बाबा जाणार कामाने तुला कोण पाहणार आणि एकटा कंटाळशील ना?"

"अग, मी एकटा नाही जाणार, सोबत संकेतला नेणार आहे आणि दादू काका, बंगल्याची व्यवस्था पाहणारे लक्ष देतील आमच्याकडे.बाबा नेशील ना रे? "आम्ही अगदी शहाण्या सारख वागू, प्रॉमिस!"

"हो नेईन मी ,पण शहाण्यासारखं वागायच."

"अरे, हो रे बाबुरड्या, गॉड प्रॉमिस!"

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून तयार झालो.

"अरे वा! जीन्स पॅन्ट, सफारी जर्सी, डोळ्यांना गॉगल हातात बायना कुलर अगदी जंगल सफारी चे हिरो! शोभता हं."

"काय रे बाबा आमची थट्टा करतोस ! "

"चला बसा जीपमध्ये लवकर, उशीर होतो आहे.

आम्ही लगबगीने जीप मध्ये बसलो आणि निघालो.

हिरवीगार दाट वृक्षराजी, पानापानातून हलके हलके डोकावणारी सूर्यकिरणे, उजेड सावलीचा मोहक लपंडाव आम्ही दोघेही मंत्रमुग्ध! अरण्याचा रोमांचक अनुभव!"

मुक्कामी पोचल्यावर दिवसभराच्या प्रवासाने थकलेले आम्ही दोघेही एकमेकांच्या कुशीत लवकरच झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी झोप उघडली तीच मुळे पक्षांच्या मधुर किलबिलाटाने."अरे संकेत किती छान प्रसन्न पहाट आहे रे ही!"

" हो ना ,नाहीतर आपली रोजची शहरातील पहाट वाहनांच्या आवाजाने आणि प्रदूषणाने सुरू होते."

"अरे बाबा, तू कुठे निघालास?"

"अरे, येथे जवळच सुंदर तलाव आहे , मी रोज सकाळी पोहायला जातो."

"आम्ही पण येऊ का रे तलाव बघायला?"

"हो, चला तुम्ही पण मी पाण्यात उतरेन तेव्हा तुम्ही झाडावरच्या मचाणा वर बसून राहायचं हं. मी आवाज दिल्याशिवाय खाली उतरायचं नाही. समजलं? "

"हो रे बाबा समजलं, नाही उतरणार खाली. "

आम्ही तलावा पाशी पोचताच बाबा पोहायला गेला तेव्हा आम्ही दोघही मचणावर चढून बसलो.

"संकेत,अरे ते बघ तिकडे दूरवर टेकडी पलीकडे.ते बघ वाघाचे कुटुंब."

"आईशप्पथ! वाघाचे बछडे किती गोड आहेत ना रे!"

"चिंटू, मला खूप भीती वाटून राहिली रे."

"भित्री भागुबाई!अरे ती टेकडी लांब आहे अन् बाबा आहे ना! वाघाला यु सरळ करेल. अरे तो बघ बाबा इकडेच येत आहे."

"चला , जीव भांड्यात पडला."

"भित्री भागुबायी!"

"हो का? मी भित्री भागुबाई!अरे, वाघोबा समोर येऊन उभा राहिला म्हणजे कळेल."

"अरे चिंटू,आई शपथ खर! तो बघ वाघोबा"

बापरे! खरच वाघोबा आला रे, आता आपल काही खर नाही. "

" बाबा ,बाबा, वाघ,!आम्ही दोघ जोरजोरात ओरडू लागलो.

"पोरांनो घाबरू नका , खाली अजिबात उतरू नका .मी बघतो या वाघाला."

वाघ इकडे तिकडे कुठेही न बघता सरळ बाबाच्या दिशेने निघाला. आम्ही दोघ श्वास रोखून बघत राहिलो.

बाबा देखील वाघाशी सामना करायला सज्ज उभा राहिला पण काय आश्चर्य! वाघ सरळ चालत येऊन बाबापाशी थबकला. बाबाला शांतपणे न्याहाळले. आणि लगेच आज्ञाधारक कुत्र्या सारखा बाबासमोर पाय मुडपून बसला. हलकेच मान वर करून एक टक बघत राहिला मग तोंडातून विचित्र आवाज काढून काहीतरी सांगू लागला. बाबांनी देखील त्याला निरखून पाहिले अन् आनंदाने ओरडला ,"अरे शेरू तू?"

बाबांच्या तोंडची ती हाक ऐकताच वाघोबा वेगानं उठला आणि बाबाच्या जवळ जाऊन आपले अंग घासू लागला जिभेनी बाबाच्या पायाला चाटू लागला. बाबांनीही त्याला शेरू शेरू करून प्रेमाने थोपटले त्याच्या मस्तकावरून हात फिरवला जणू काही खूप काळानंतर भेटलेले दोन सोयरे एकमेकांना आलिंगन देत होते. आम्ही दोघं तर श्वास रोखून बघतच राहिलो

एवढ्यात दूरवरून वाघांच्या डरकाळीचा आवाज आला तेव्हा शेरु आवांजाच्या दिशेनी निघाला, जातांना बाबाला प्रेमळ नजरेनी बघत बघत झाडीत अदृश्य झाला.

आम्ही तर वाचाहीन झाल्यासारखे बसूनच राहिलो.

"पोरांनो खाली या" बाबाच्या हाकेने आम्ही तंद्रीतून जागे झालो.

" अरे बाबा, वाघोबा गेला!इतक्या शांतपणे गेला आश्चर्यच!

अरे चिंटू,हा वाघोबा माझा जिवलग सखा शेरू!

मला दोन वर्षांपूर्वी जखमी अवस्थेत सापडला होता तेव्हा महिनाभर माझ्याच देखरेखी खाली होता . मी त्याची सुश्रुषा केली त्यातून तो बरा झाल्यावर त्याला जंगलात सोडण्यात आले शेरू या नावानेच मी त्याला हाक मारीत असे.

" बाबा, त्याने तुला कसं अचूक ओळखलं रे?"

"अरे प्राण्यांचं गंधज्ञान खूप विलक्षण असतं ते वासानेच जाणतात आणि हो त्यांच्यात कृतज्ञतेची भावनाअसते.जी आपल्या माणसात कमीच आढळते एक वेळ माणूस कृतघ्न होतो पण प्राणी कधीच नाही.

"हो रे बाबा अगदी खरं. आम्हीपण शेरूने दिलेला हा आदर्श धडा कधीच विसरणार नाही."

"अरे बाबा, म्हणून तर आपले संत तुकाराम महाराज सांगूम गेलेत, "वृक्षवल्लरी आम्हा सोयरी वनचरे" ती ओळ इथे जुळेल का रे?" बाबाने 'हो' म्हणत मान डोलावली.

ज्येष्ठ साहित्यिक

premakhandwe8@gmail.com

Mumbai : इमारतींना OC मिळण्याची प्रतीक्षाच! अभय योजनेसाठी सुधारित नियमावली आणणार, स्थायी समितीत प्रस्ताव मागे घेतला

"माझ्यावर हसताय?" म्हणत ग्राहकाचे दुकानदारावर चाकूने सपासप वार; मुंबईतील धक्कादायक घटना

एमआयएमच्या नगरसेविकेला धक्का! जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा समितीचा निर्णय; महापालिकेत राजकीय उलथापालथीची शक्यता

ठाण्यात पाणीटंचाई तीव्र होणार; धरणांतील साठा २८ टक्क्यांवर, मुंबईतील पाणी कपातीचा ठाण्यावर परिणाम?

Pune : सगळ्यांसमोर पतीला मारहाण; अपमानाचा मानसिक धक्का सहन न झाल्याने रिसेप्शनिस्ट महिलेचे टोकाचे पाऊल