दिवाळी अंक २०२६ : युद्ध - काही तुकडे 
अक्षररंग

दिवाळी अंक २०२६ : युद्ध - काही तुकडे

भिरभिरणारी फुलपाखरं प्रयोगशाळेतल्या बरण्यांत पहात होत्या मुली...

नवशक्ती Web Desk

नीरजा

१.

भिरभिरणारी फुलपाखरं
प्रयोगशाळेतल्या बरण्यांत
पहात होत्या मुली.
युद्ध सुरू झालं त्या दिवशी मुक्त
झाली एकशे चाळीस फुलपाखरं.
युद्ध जागी करतात
पंख पसरण्याच्या स्वप्नातून
हजारो फुलपाखरांना.

२.

युद्धाविषयीचं बातमीपत्र
वाचत होती ती मुलगी
काल सकाळी
निर्विकार चेहऱ्याने.
बातमी झाली आहे ती
आज
युद्धपीडित जगाची.

३.

जिवंत मुलींची झाली आहेत
कलेवरं शब्द.
जगण्याच्या पाटीवर गिरवताना
पाटी भरलेली मुलींना
सापडलेल्या नव्या शब्दांनी.
शाळेच्या उद्ध्वस्त भिंतीत
रुजतील का नवे शब्द
मुलींना सापडलेल्या अर्थासकट

४.

युद्धात काय काय हरवून जातं
याचा हिशेब मांडला तेव्हा
वही ओसंडत राहिली
अगणित शब्दांनी.
एक शब्द घरंगळत आला खाली,
उतरला जमिनीवर
अन् रेंगाळला दवासारखा.

म्हणाला,
बुद्धाच्या चेहऱ्यावर पसरलेली करुणा
विसरलीस का ?

Mumbai: फटाके बंदीचा बार फुसका; दोन दिवसांत आगीच्या ८९ घटना, फटाक्यांमुळे २८ ठिकाणी अग्निभडका, एकाचा मृत्यू; तीन जखमी

'ई-फेरफार'द्वारे होणार आता पीक पाहणी; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार

अरे व्वा! गावकऱ्यांना दिला दिवाळी बोनस; साताऱ्यातील मान्याचीवाडी ग्रामपंचायतीचा कौतुकास्पद उपक्रम

Mumbai : स्वयंचलित दरवाजांची विना-एसी लोकल दाखल; लवकरच नव्या सुरक्षा चाचण्या

मुंबईत पाणीकपात वाढणार? BMC ची राखीव पाण्यासाठी फिल्डिंग, ७ धरणांत फक्त ८२.४७ टक्के पाणी, ६ महिने आधीच राज्य सरकारला पत्र