नवी दिल्ली : ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडने मंगळवारी सांगितले की, त्यांना महाराष्ट्र राज्य कर प्राधिकरणाकडून व्याजासह ५ कोटी रुपयांहून अधिक मागणीसह ‘कारणे दाखवा’ नोटीस मिळाली आहे. कथित अतिरिक्त इनपूट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) दाव्याच्या आरोपावरुन ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
नियामक फाइलिंगमध्ये, ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडने (एचएमआयएल)ने सोमवार, २५ नोव्हेंबर रोजी सांगितले की, त्यांना महाराष्ट्र राज्य कर प्राधिकरणाकडून ‘कारणे दाखवा’ नोटीस मिळाली आहे की, अतिरिक्त आयटीसी दावा केला आहे. मात्र, कंपनीने भरलेले पैसे व नियमांनुसार आणि आरसीएम (रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम) कराबाबत पुष्टी होत नाही. कारणे दाखवा नोटीसमध्ये नमूद केलेली एकूण मागणी रक्कम २.७४१ कोटी रुपये कर आणि २,२७९ कोटी रुपये व्याज आहे.
एचएमआयएलने सांगितले की, ते विहित वेळेत निर्णय घेणाऱ्या प्राधिकरणासमोर ‘कारणे दाखवा’ नोटीसचे उत्तर दाखल करणार आहे. या कारणे दाखवा नोटीसमुळे कंपनीच्या आर्थिक, ऑपरेशन किंवा इतर व्यवहारांवर कोणताही परिणाम होणार नाही, असेही ते पुढे म्हणाले.