बिझनेस

अदानी समूहाची चीनमध्ये एंट्री! उपकंपनी केली स्थापन; प्रकल्प व्यवस्थापन सेवा पुरवण्यासाठी निर्णय

पुरवठा साखळी उपाय आणि प्रकल्प व्यवस्थापन सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करण्यासाठी अदानी समूहाने चीनमध्ये एक उपकंपनी स्थापन केली आहे...

Swapnil S

नवी दिल्ली : पुरवठा साखळी उपाय आणि प्रकल्प व्यवस्थापन सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करण्यासाठी अदानी समूहाने चीनमध्ये एक उपकंपनी स्थापन केली आहे, अशी माहिती नियामकाला देण्यात आली आहे.

समूहाची प्रमुख फर्म अदानी एंटरप्रायझेसने दिलेल्या या माहितीमध्ये म्हटले आहे की, सिंगापूरस्थित उपकंपनीने २ सप्टेंबर २०२४ रोजी चीनमधील शांघाय स्थित अदानी एनर्जी रिसोर्सेस (शांघाय) कंपनी (एईआरसीएल) ही पूर्ण मालकीची उपकंपनी स्थापन केली आहे.

एईआरसीएल पुरवठा साखळी उपाय आणि प्रकल्प व्यवस्थापन सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करण्यासाठी या कंपनीची स्थापना केली आहे, असे सविस्तर तपशील न देता म्हटले आहे. उपकंपनी अदानी ग्लोबल पीटीई (एजीपीटीई), सिंगापूर-अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड (एईएल) ची स्टेप-डाऊन उपकंपनीद्वारे समाविष्ट केली गेली.

एईएलमध्ये समूहाचे खाणकाम, रस्ते, विमानतळ, डेटा सेंटर आणि जल पायाभूत सुविधा व्यवसाय आहेत. एईआरसीएल २ सप्टेंबर २०२४ रोजी पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाच्या कंपनी कायद्याच्या कायद्यांतर्गत नोंदणीकृत करण्यात आली आहे, असेही माहितीमध्ये म्हटले आहे. तथापि, एईआरसीएलने केनियामध्ये एअरपोर्टस इन्फ्रास्ट्रक्चर पीएलसी (एआयपी) मध्ये उपकंपनी स्थापन केल्यानंतर अद्याप त्यांचे व्यवसाय कार्य सुरू केलेले नाही. एईएलने आफ्रिकन राष्ट्रात विमानतळांचा ताबा घेणे, ऑपरेट करणे, देखरेख करणे, विकसित करणे, डिझाइन करणे, बांधणे, आधुनिकीकरण करणे आणि व्यवस्थापित करणे यासाठी एईएलने काही दिवसांनी नवीन युनिट स्थापन केले. सध्या देशातील सात विमानतळ चालवणारा हा समूह परदेशात विस्तार करण्याच्या विचारात आहे.

भारताबाहेरील विमानतळांसाठी गुंतवणूक, संपादन, बांधकाम, ऑपरेशन आणि देखभाल हाताळण्यासाठी एईएलने यापूर्वी ग्लोबल एअरपोर्ट ऑपरेटर एल.एल.सी., अबुधाबीचा समावेश केला होता. या युनिटने आता केनियन उपकंपनी स्थापन केली आहे.

अदानी समूहाने नैरोबीमधील जोमो केन्याटा आंतरराष्ट्रीय विमानतळ (JKIA) या मुख्य विमानतळामध्ये गुंतवणूक करण्यासाठी केनिया सरकारला प्रस्ताव सादर केला होता. २०२९ पर्यंत नवीन टर्मिनल आणि टॅक्सीवे प्रणालीसाठी ७५० दशलक्ष डॉलर आणि २०३५ पर्यंत सुधारणांसाठी ९२ दशलक्ष डॉलर गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव आहे. जेकेआयए, जे अदानीचे भारताबाहेरील पहिले विमानतळ असेल, हे पूर्व आफ्रिकेतील एक प्रमुख केंद्र आहे.

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप

मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन! महायुतीत फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्या नावाचे दावे

अपक्ष, बंडखोरांवर सत्ता स्थापनेची मदार; महायुती व मविआची जोरदार मोर्चेबांधणी

रशियाचा युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला

कोल्हापूरच्या चेतन पाटीलला जामीन मंजूर; जयदीप आपटेच्या जामिनावर सोमवारी सुनावणी