बिझनेस

अदानीने ६,६०० मेगावॅट वीजपुरवठ्याची बोली जिंकली; जेएसडब्ल्यू, टोरेंटला टाकले मागे; दर असणार रु. ४.०८/युनिट

अदानी समूहाने ४.०८ रुपये प्रति युनिटच्या दराने महाराष्ट्राला दीर्घमुदतीसाठी ६,६०० मेगावाॅट अक्षय आणि औष्णिक वीज पुरवण्याची बोली जिंकली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : अदानी समूहाने ४.०८ रुपये प्रति युनिटच्या दराने महाराष्ट्राला दीर्घमुदतीसाठी ६,६०० मेगावाॅट अक्षय आणि औष्णिक वीज पुरवण्याची बोली जिंकली आहे. तसेच इरादा पत्रही देण्यात आले आहे. अदानीने ही बोली जिंकून जेएसडब्ल्यू एनर्जी आणि टोरेंट पॉवरला मागे टाकले आहे.

अदानी पॉवरने २५ वर्षांसाठी एकत्रित नूतनीकरणक्षम आणि औष्णिक ऊर्जा पुरवठ्यासाठी लावलेली बोली ही महाराष्ट्र सध्या वीज खरेदी करत असलेल्या किमतीपेक्षा जवळपास एक रुपया कमी होती आणि राज्याच्या भविष्यातील विजेच्या गरजा पूर्ण करण्यात मदत करेल, असे या प्रकरणाची थेट माहिती असलेल्या दोन सूत्रांनी सांगितले.

इरादा पत्र देण्यात आले असून, त्या तारखेपासून ४८ महिन्यांत पुरवठा सुरू होईल. नंतर, अदानी समूहाने एका निवेदनात पीटीआयला या करार झाल्याची पुष्टी दिली.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (MSEDCL) अदानी पॉवरला ६,६०० मेगावॉटसाठी इरादा पत्र जारी केले. अदानी पॉवर नवीन १,६०० मेगावाॅट अल्ट्रा-सुपरक्रिटिकल क्षमतेतून १,४९६ मेगावाॅट (नेट) औष्णिक वीज पुरवेल, तर अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील खवडा अक्षय ऊर्जा उद्यानातून ५ गिगावॉट (५ हजार मेगावॅट) सौरऊर्जा पुरवेल.

बोलीच्या अटींनुसार, अदानी ग्रीन एनर्जी संपूर्ण पुरवठा कालावधीत २.७० रुपये प्रति युनिट या दराने सौरऊर्जेचा पुरवठा करेल, तर कोळशापासून निर्माण होणाऱ्या विजेचा दर कोळशाच्या किमतींनुसार निश्चित केला जाईल.

अदानी पॉवर लिमिटेड (एपीएल), भारतातील सर्वात मोठी खासगी औष्णिक वीज उत्पादक, सुपरक्रिटिकल थर्मल पॉवर प्रकल्प महाराष्ट्र राज्याला १,४९६ मेगावाॅट औष्णिक वीज पुरवण्यासाठी एमएसईडीसीएल सोबत दीर्घकालीन वीजपुरवठा करारावर स्वाक्षरी करेल. निवेदनात मात्र, निविदा जिंकण्यासाठी दरांचा तपशील दिलेला नाही. महावितरणने मार्चमध्ये सूर्यप्रकाशापासून निर्माण होणारी ५००० मेगावाॅट आणि कोळशापासून निर्माण होणारी १,६०० मेगावाॅट वीज मिळवण्यासाठी एक निविदा काढली होती.

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

सांगलीत खताच्या कारखान्यात वायू गळती; तीन ठार, ९ जण रुग्णालयात

लोकलमधील बसण्याच्या वादातून तरुणाचा खून

मच्छिमार नौकेची नौदलाच्या पाणबुडीला धडक; गोव्याच्या समुद्रातील घटना; नौदलाकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश