बिझनेस

एअर इंडिया-विस्तारा विलीनीकरण पूर्ण, आता ५,६०० साप्ताहिक उड्डाणे होणार

एअर इंडिया आणि विस्ताराने विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती देणारे निवेदन जारी करण्यात आले आहे. विलीनीकरणानंतर, एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्पबेल विल्सन म्हणाले की, विस्ताराचे एअरलाइनमध्ये विलीनीकरणामुळे खासगीकरणानंतर एअर इंडिया समुहाच्या पुनर्रचनाचा टप्पा पूर्ण झाला.

Swapnil S

नवी दिल्ली : विस्ताराचे एअर इंडियामध्ये विलीनीकरण पूर्ण झाल्यानंतर टाटा समूहाच्या विमान वाहतूक व्यवसायाने नवीन उंची गाठली. एअर इंडिया आणि विस्ताराने विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती देणारे निवेदन जारी करण्यात आले आहे. विलीनीकरणानंतर, एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्पबेल विल्सन म्हणाले की, विस्ताराचे एअरलाइनमध्ये विलीनीकरणामुळे खासगीकरणानंतर एअर इंडिया समुहाच्या पुनर्रचनाचा टप्पा पूर्ण झाला.

एअर इंडियाने मंगळवारी सांगितले की, विस्ताराचे विलीनीकरण पूर्ण झाले आहे आणि कंपनीच्या ताफ्यात ३०० विमानांचा ताफा असेल. आता ९० हून अधिक गंतव्यस्थानांना जोडणारी ५,६०० साप्ताहिक उड्डाणे होतील. विलीनीकरणामुळे विस्तारीत एअर इंडियामधील सिंगापूर एअरलाइन्सची हिस्सेदारी २५.१ टक्क्यांपर्यंत वाढेल.

विस्तारा हा टाटा आणि सिंगापूर एअरलाइन्सचा संयुक्त उपक्रम होता. एअर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्पबेल विल्सन म्हणाले की, विलीनीकरणामुळे एअर इंडिया समूहाच्या खासगीकरणानंतरच्या परिवर्तनाच्या प्रवासातील एकत्रीकरण आणि पुनर्रचनेचा टप्पा पूर्ण होणे हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.

टाटा समूहाने जानेवारी २०२२ मध्ये तोट्यात चाललेल्या एअर इंडियाचे सरकारकडून अधिग्रहण केले. टाटा समूहाच्या मालकीची एअर इंडिया, ज्याने पूर्ण-सेवा वाहक विस्ताराला स्वतःमध्ये विलीन केले आहे, त्यांच्याकडे विस्ताराच्या सात विमानांसह एकूण ६७ वाइड-बॉडी विमाने आहेत.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी