बिझनेस

देशातील 6.5 कोटी लोकांसाठी गुडन्यूज! अवघ्या 3 दिवसात मिळणार 1 लाख रुपये, EPFO ​​ने बदलले नियम

Suraj Sakunde

मुंबई: कर्मचारी भविष्य निर्वाह निधीने (EPFO) आपल्या सदस्यांना काही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीत फंडातून पैसे काढण्याची परवानगी देते. यामध्ये आपत्कालीन आजारांवर उपचार, शिक्षण, लग्न आणि घर खरेदी यांचा समावेश होतो.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) पीएफमधून पैसे काढण्याची प्रक्रिया सुलभ केली आहे. ईपीएफओने ऑटो मोड सेटलमेंट सुरू केले आहे. देशातील 6 कोटींहून अधिक पीएफ सदस्यांना याचा फायदा होणार आहे. पीएफ सदस्यांना आपात्कालीन परिस्थितीत पैसे काढणं सुलभ होणार आहे. या अंतर्गत तुमच्या बँक खात्यात 3 दिवसांच्या आत पैसे पाठवले जातील.

अडचणीच्या वेळी त्यांच्या EPF मधून आगाऊ पैसे-

ऑटो-मोड सेटलमेंट अंतर्गत, कर्मचारी अडचणीच्या वेळी त्यांच्या EPF मधून आगाऊ पैसे काढू शकतात. EPFO आपल्या सदस्यांना काही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीत फंडातून पैसे काढण्याची परवानगी देते. आपात्कालीन उपचार, शिक्षण, लग्न किंवा घर खरेदी यापैकी कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातून आगाऊ रक्कम काढू शकता.

ऑटो मोड सिस्टमच्या माध्यमातून क्लेम सेटलमेंट-

आपत्कालीन परिस्थितीत या निधीच्या क्लेम सेटलमेंटसाठी ऑटो मोड एप्रिल 2020 मध्येच सुरू करण्यात आला होता, परंतु त्या वेळी फक्त आजारपणातच पैसे काढता येत होते. आता त्याची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. तुम्ही आजारपण, शिक्षण, लग्न आणि घर खरेदीसाठी EPF मधून पैसे काढू शकता. यासोबतच आता ग्राहक बहीण किंवा भावाच्या लग्नासाठी आगाऊ रक्कमही काढू शकतात.

किती पैसे काढता येतील?

ईपीएफ खात्यातून आगाऊ निधीची मर्यादा वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ही मर्यादा 50 हजार रुपये होती, ती आता 1 लाख रुपये करण्यात आली आहे. आगाऊ पैसे काढण्याची प्रोसेस ऑटो सेटलमेंट मोड संगणकाद्वारे करता येईल. त्यासाठी कोणाच्याही मंजुरीची गरज नाही. तीन दिवसात तुमच्या खात्यात पैसे येतात. मात्र, तुम्हाला काही कागदपत्रे सादर करावी लागतील. यामध्ये KYC, क्लेम रिक्वेस्ट एलिजिबिलिटी, बँक खात्याच्या डिटेल्स या गोष्टींचा समावेश आहे.

अॅडव्हान्स रक्कम काढण्याची प्रक्रिया-

  • सर्वप्रथम तुम्हाला EPFO ​​पोर्टलवर लॉग इन करावे लागेल. यासाठी UAN आणि पासवर्ड आवश्यक आहे.

  • लॉग इन केल्यानंतर, तुम्हाला ऑनलाइन सेवांवर जावे लागेल आणि नंतर दावा विभाग निवडावा लागेल.

  • त्यानंतर तुम्हाला बँक खाते वेरिफाय करावे लागेल. याच बँक खात्यात आगाऊ पैसे येतील.

  • आता तुम्हाला तुमच्या बँक खात्याच्या चेक किंवा पासबुकची प्रत अपलोड करावी लागेल.

  • त्यानंतर तुम्हाला ज्या कारणामुळे पैसे काढायचे आहेत ते कारण सांगावे लागेल.

  • आता तुम्हाला आणखी काही प्रक्रिया फॉलो करून अर्ज करावा लागेल. तीन ते चार दिवसात तुमच्या खात्यात पैसे येतील.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस