बिझनेस

चालू खात्यातील तूट किरकोळ घसरून जीडीपीच्या १.२ टक्क्यांवर; आरबीआयची आकडेवारी जाहीर

भारताची चालू खात्यातील तूट (कॅड) २०२४-२५ च्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत किरकोळ घसरून ११.२ अब्ज अमेरिकन डॉलर किंवा वार्षिक जीडीपीच्या १.२ टक्के झाली, असे रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार दिसून आले.

Swapnil S

मुंबई : भारताची चालू खात्यातील तूट (कॅड) २०२४-२५ च्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत किरकोळ घसरून ११.२ अब्ज अमेरिकन डॉलर किंवा वार्षिक जीडीपीच्या १.२ टक्के झाली, असे रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार दिसून आले.

२०२३-२४ च्या दुसऱ्या तिमाहीत ‘कॅड’ देशाच्या बाह्य पेमेंट परिस्थितीचे सूचक - ११.३ अब्ज अमेरिकन डॉलर किंवा जीडीपीच्या १.३ टक्के होते. भारताची चालू खात्यातील तूट (कॅड) २०२३-२४ च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये ११.३ अब्ज डॉलर (जीडीपीच्या १.३ टक्के) वरून २०२४-२५ च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये ११.२ अब्ज डॉलर (जीडीपीच्या १.२ टक्के) पर्यंत कमी झाली, असे आरबीआयने म्हटले आहे.

एप्रिल-सप्टेंबर २०२४ म्हणजे आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत चालू खात्यातील तूट २१.४ अब्ज अमेरिकन डॉलर किंवा जीडीपीच्या १.२ टक्के होती जी मागील वर्षीच्या वरील कालावधीत २०.२ अब्ज डॉलर (जीडीपीच्या १.२ टक्के) होती.

आरबीआयच्या पेमेंट्सच्या शिल्लक डेटानुसार, २०२४-२५ च्या दुसऱ्या तिमाहीत व्यापारी व्यापार तूट ७५.३ अब्ज डॉलर इतकी झाली असून २०२३-२४ वरील कालावधीत हा आकडा ६४.५ अब्ज डॉलर होती. २०२४-२५ च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये निव्वळ सेवा प्राप्ती ४४.५ अब्ज डॉलरपर्यंत वाढली आहे जी एका वर्षापूर्वी ३९.९ अब्ज डॉलर होती. संगणक सेवा, व्यवसाय सेवा, प्रवासी सेवा आणि वाहतूक सेवा यासारख्या प्रमुख श्रेणींमध्ये सेवा निर्यात वर्ष-दरवर्ष आधारावर वाढली आहे.

"भगवा आणि हिंदुत्वाचा विजय"; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष ठरल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांना अश्रू अनावर

2008 Malegaon Blast : 'दंगलींचे शहर' बॉम्बस्फोटाने काळवंडले! मालेगावच्या इतिहासातील काळा दिवस

"भारत-रशियाने मिळून त्यांची आधीच डबघाईस आलेली अर्थव्यवस्था..."; टॅरिफच्या तडाख्यानंतर ट्रम्प यांचा थेट निशाणा

2008 Malegaon Blast : ठोस पुरावेच नाही! साध्वी प्रज्ञा, पुरोहित यांच्यासह सातही आरोपी निर्दोष, १७ वर्षांनंतर आला निकाल

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’