बिझनेस

आजपासून दावोस आर्थिक परिषद; जागतिक आर्थिक परिषदेला पाच मंत्री, तीन मुख्यमंत्र्यांसह १०० सीईओंची हजेरी

दावोस येथे उद्यापासून सुरू होत असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेला पाच केंद्रीय मंत्री, तीन मुख्यमंत्री आणि इतर अनेक राज्यांतील मंत्र्यांसह क्षेत्रातील सुमारे १०० सीईओ हजेरी लावणार आहेत.

Swapnil S

नवी दिल्ली : दावोस येथे उद्यापासून सुरू होत असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेला पाच केंद्रीय मंत्री, तीन मुख्यमंत्री आणि इतर अनेक राज्यांतील मंत्र्यांसह क्षेत्रातील सुमारे १०० सीईओ हजेरी लावणार आहेत. या परिषदेसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी तुकडी पाठवत आहे.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव हे भारतीय शिष्टमंडळाचे प्रमुख म्हणून दावोसला रवाना झाले. वैष्णव यांच्यासोबत केंद्रातील मंत्रिमंडळातील त्यांचे चार सहकारी - सी. आर. पाटील, चिराग पासवान, जयंत चौधरी आणि के. राम मोहन नायडू सामील होतील. त्यांच्यासोबत महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री अनुक्रमे देवेंद्र फडणवीस, एन. चंद्राबाबू नायडू आणि ए. रेवंत रेड्डी देखील सामील होतील. याशिवाय, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि तामिळनाडूचे टीआरबी राजा, केरळचे पी. राजीव यांच्यासह इतर अनेक राज्यांतील वरिष्ठ मंत्री असतील.

ठाकरे सेना-मनसे एकत्र? नव्या युतीची आठवडाभरात होणार घोषणा

विधिमंडळातील संख्याबळात महायुतीला फायदा; विरोधी पक्षनेतेपदाबाबत काँग्रेस अडचणीत

अजित पवारांना हवीय महायुती? राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटणार

दीड लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना पदवी मिळणार; मुंबई विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ १७ जानेवारीला

Mumbai : पाच दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा; धारावी, अंधेरी पूर्व, वांद्रे, खार पूर्व भाग प्रभावित; BMC जलवाहिनी जोडण्याचे काम करणार