PTI
बिझनेस

आरोग्य विम्यावरील जीएसटी दरांसाठी मंत्रिगट, जीएसटी परिषदेत निर्णय

आरोग्य विम्यावरील भरभक्कम १८ टक्के जीएसटी दर घटवण्याची जोरदार चर्चा अखेर फोल ठरली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : आरोग्य विम्यावरील भरभक्कम १८ टक्के जीएसटी दर घटवण्याची जोरदार चर्चा अखेर फोल ठरली आहे. जीएसटी परिषदेने आरोग्य विम्यावरील जीएसटी दर कमी करण्याबाबतचा निर्णय पुढे ढकलला आहे. तसेच आरोग्य विम्यावरील जीएसटी दरांचा तपशीलवार अभ्यास करण्यासाठी मंत्रिगट स्थापन करण्याची घोषणा जीएसटी परिषदेने केली.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालील व राज्य अर्थमंत्र्यांची जीएसटी परिषदेची ५४ वी बैठक सोमवारी झाली. या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. २ हजार रुपयांपेक्षा कमी रकमेच्या व्यवहारांवरील मर्चेंट शुल्क १८ टक्के लावण्याचा निर्णय ‘फिटमेंट’ समितीला पाठवला, तर तीर्थयात्रांवरील जीएसटी १८ वरून ५ टक्के केला आहे.

जीएसटी परिषदेत आरोग्य व जीवन विम्यावरील प्रीमियमवरील सध्याचा १८ टक्के दर कमी करण्याबाबत सहमती झाली आहे. याबाबत अंतिम निर्णय पुढील बैठकीत घेतला जाणार आहे.

करांच्या दरांचे सुसूत्रीकरण करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांच्या कर अधिकाऱ्यांच्या ‘फिटमेंट’ समितीने सोमवारी जीएसटी परिषदेसमोर एक अहवाल सादर केला. यात जीवन, आरोग्य व पुनर्विमा प्रीमियमवरील जीएसटी कपातीचे दर व विश्लेषण होते. याबाबत पुढील बैठकीत निर्णय घेतला जाईल.

कर्करोगावरील औषधे स्वस्त होणार

जीएसटी परिषदेने कर्करोगावरील औषधांवरील जीएसटी १२ वरून ५ टक्क्यांपर्यंत घटवला आहे.

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप

मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन! महायुतीत फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्या नावाचे दावे

अपक्ष, बंडखोरांवर सत्ता स्थापनेची मदार; महायुती व मविआची जोरदार मोर्चेबांधणी

रशियाचा युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला

कोल्हापूरच्या चेतन पाटीलला जामीन मंजूर; जयदीप आपटेच्या जामिनावर सोमवारी सुनावणी