बिझनेस

हिरे क्षेत्र गंभीर संकटात; गेल्या तीन वर्षांत आयात-निर्यातीत मोठी घट,'जीटीआरआय’चा दावा

Swapnil S

नवी दिल्ली : भारतातील हिरे क्षेत्र गंभीर संकटाचा सामना करत आहे कारण गेल्या तीन वर्षांत आयात आणि निर्यात दोन्हीमध्ये मोठी घट झाली आहे. त्यामुळे कारखान्यावर थकित कर्जामुळे बंद झाल्याने कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या गमावल्या आहेत, असे थिंक टँक जीटीआरआयने बुधवारी सांगितले.

या अहवालात म्हटले आहे की, निर्यातीत परतावा वाढला असताना, कमी झालेल्या ऑर्डरमुळे प्रयोगशाळेत तयार होणाऱ्या हिऱ्यांना मागणी नाही. त्यामुळे वाढणारी स्पर्धा पाहता प्रक्रिया न केलेल्या रफ हिऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.

या सर्व कारणांनी कारखाने थकित कर्जात वाढ होत आहे, कारखाने बंद पडणे आणि मोठ्या प्रमाणावर नोकरकपात होत आहे. दुर्दैवाने, गुजरातच्या हिरे क्षेत्रातील ६० हून अधिक लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे भारताचे हिरे क्षेत्र ज्या गंभीर आर्थिक आणि भावनिक ताणाला तोंड देत आहे, असे ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह (जीटीआरआय) चे संस्थापक अजय श्रीवास्तव म्हणाले.

ते म्हणाले की या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि क्षेत्राचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी तत्काळ कार्यवाही करणे आवश्यक आहे. थिंक टँकच्या आकडेवारीनुसार, रफ डायमंडची मागणी २४.५ टक्क्यांनी घसरल्याने २०२१-२२ मधील १८.५ अब्ज अमेरिकन डॉलरवरून २०२३-२४ मध्ये १४ अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत घसरल्याने जागतिक बाजारपेठेतील कमकुवत मागणी आणि प्रक्रिया केलेल्या हिऱ्यांसाठी ऑर्डर कमी असल्याचे दिसून येतात.

राज्यात 'महिला राज'ची चर्चा; सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत

मुरबाडच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचाही दावा; महाविकास आघाडीत रस्सीखेच वाढणार!

नव्या सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयात स्वच्छता मोहीम

‘मला काहीतरी सांगायचंय’; मुख्यमंत्र्यांच्या जीवनावरील नाटक, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

"लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या"...बुरखाधारी महिलेकडून सलमानचे वडिल सलीम खान यांना मॉर्निंग वॉक करताना धमकी