बिझनेस

देशांतर्गत हवाई वाहतूक १७० दशलक्षपर्यंत वाढणार; इक्राच्या अहवालातील अंदाज

चालू आर्थिक वर्षात देशांतर्गत हवाई वाहतूक ७ ते १० टक्क्यांनी वाढून १६४-१७० दशलक्षपर्यंत पोहोचेल. तसेच याच कालावधीत विमान वाहतूक उद्योगाचा तोटा दोन हजार ते तीन हजार कोटी रुपयांच्या दरम्यान राहील, असा अंदाज रेटिंग एजन्सी ‘इक्रा’ने वर्तवला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षात देशांतर्गत हवाई वाहतूक ७ ते १० टक्क्यांनी वाढून १६४-१७० दशलक्षपर्यंत पोहोचेल. तसेच याच कालावधीत विमान वाहतूक उद्योगाचा तोटा दोन हजार ते तीन हजार कोटी रुपयांच्या दरम्यान राहील, असा अंदाज रेटिंग एजन्सी ‘इक्रा’ने वर्तवला आहे.

आर्थिक वर्ष २०२४-२५च्या पहिल्या सहामाहीत देशांतर्गत हवाई प्रवासी वाहतूक ७९.३ दशलक्ष इतकी होती, ज्यामध्ये वार्षिक ५.३ टक्के वाढ झाली. मात्र, उष्णतेची तीव्र लाट आणि हवामानाशी संबंधित अडचणींमुळे या वाढीवर थोडासा परिणाम झाला. पहिल्या सहामाहीत भारतीय विमान कंपन्यांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीत १६.२ टक्के वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये देशांतर्गत हवाई वाहतूक वार्षिक ७ ते १० टक्क्यांनी वाढून १६४-१७० दशलक्षपर्यंत जाईल, असे मंगळवारी ‘इक्रा’ने सांगितले.

इक्राचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि सह-गटप्रमुख किंजल शाह म्हणाले की, ‘इक्रा’ने भारतीय विमान वाहतूक उद्योगावर ‘स्थिर’ दृष्टिकोन कायम ठेवला आहे, कारण देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासी वाहतुकीत सातत्याने वाढ होत आहे. आर्थिक वर्ष २०२५ आणि आर्थिक वर्ष २०२६ मध्ये हवाई उद्योगाचा निव्वळ तोटा अनुक्रमे दोन हजार ते तीन हजार कोटी रुपयांच्या दरम्यान राहील. हा तोटा पूर्वीच्या काळातील तोट्याच्या तुलनेत कमी असेल. कारण विमान कंपन्यांच्या सुधारित किमती निर्धारण क्षमतेचा आधार मिळेल.

एटीएफ अद्यापही महागच!

विमान कंपन्यांचा खर्च प्रामुख्याने दोन घटकांवर आधारित असतो - एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (एटीएफ) ची किंमत आणि रुपया - अमेरिकन डॉलर विनिमय दर. आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या आठ महिन्यांत एटीएफच्या सरासरी किमतीत ६.८ टक्क्यांनी घट होऊन ती प्रति किलोलीटर ९६,१९२ रुपयांवर आली, परंतु कोविडपूर्व कालावधी (आर्थिक वर्ष २०२०) च्या ६५,२६१ रुपयांच्या पातळीपेक्षा जास्त आहे.

Mumbai : शीव पूल १५ जुलैपर्यंत वाहतुकीसाठी खुला होणार; अतिरिक्त पालिका आयुक्तांनी केली पाहणी

Budget 2026 : स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कधी मांडला? उद्या सादर होणारं बजेट कितवं? जाणून घ्या

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा; अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीसाठी सुधारित योजना

ठाणे शहरात उभारले जाणार १९ ई-व्हेईकल चार्जिंग स्टेशन्स; प्रमुख चौकांमध्ये उपलब्ध होणार सुविधा; पीपीपी तत्त्वावर प्रकल्पाला मंजुरी

Mumbai : ...ती भ्रूणहत्याच ठरेल; न्यायालयाने नाकारली गर्भपाताची परवानगी; खर्च राज्यशासनाने करण्याचे आदेश