बिझनेस

ॲमेझाॅन, फ्लिपकार्ट विक्रेत्यांच्या कार्यालयांवर छापे; ED ची देशव्यापी कारवाई

ॲमेझाॅन, फ्लिपकार्टवर नोंदणी केलेल्या काही विक्रेत्यांच्या कार्यालयांवर अंमलबजावणी संचालनालयाने गुरुवारी छापे टाकले. परदेशी चलन व्यवहाराच्या (फेमा) कथित उल्लंघनाच्या चौकशी संदर्भात ही शोधमोहीम विविध १६ हून अधिक ठिकाणी राबवण्यात आली.

Swapnil S

नवी दिल्ली : ॲमेझाॅन, फ्लिपकार्टवर नोंदणी केलेल्या काही विक्रेत्यांच्या कार्यालयांवर अंमलबजावणी संचालनालयाने गुरुवारी छापे टाकले. परदेशी चलन व्यवहाराच्या (फेमा) कथित उल्लंघनाच्या चौकशी संदर्भात ही शोधमोहीम विविध १६ हून अधिक ठिकाणी राबवण्यात आली.

नवी दिल्ली, मुंबई, गुरुग्राम, हैदराबाद आणि बंगळुरू येथील निवडक विक्रेत्यांच्या कार्यालयांवर छापे टाकण्यात आले.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेने तपास अधिकाऱ्यांच्या हवाल्याने नवी दिल्ली, मुंबई आणि बंगळुरू येथील निवडक विक्रेत्यांच्या कार्यालयांवर छापे टाकल्याचे म्हटले. तर अन्य एक वृत्तसंस्था पीटीआयने, गुरुग्राम आणि हैदराबादमध्येही छापे टाकण्यात आल्याचे म्हटले आहे.

ॲमेझाॅन आणि फ्लिपकार्टच्या विक्रेत्यांवर छापे टाकणे हा तपास यंत्रणांच्या चौकशीचा एक भाग असून परकीय चलन कायद्याच्या कथित उल्लंघनाबाबत ही कारवाई करण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. भारतीय स्पर्धा आयोगाने ॲमेझाॅन, फ्लिपकार्ट या दोन्ही कंपन्यांना त्यांच्या संकेतस्थळावर निवडक विक्रेत्यांनी देशाच्या स्पर्धा कायद्यांचे उल्लंघन केल्याचे वृत्त दिल्यानंतर ही घटना घडली आहे. कंपन्यांना त्यांच्या अलीकडील आर्थिक स्टेटमेन्टमध्ये बदलून नेमका कोणता दंड आकारला जाईल, हे ठरवण्याचे निर्देश दिले होते, असेही म्हटले आहे.

ई-कॉमर्स कंपन्यांवरील कारवाई ही केंद्र सरकारवर त्यांचे कामकाज रोखण्यासाठी वाढत्या दबावादरम्यान आली आहे. १४ सप्टेंबरला कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे प्रवीण खंडेलवाल यांनी सरकारला ॲमेझाॅन, फ्लिपकार्टची कार्यपद्धती थांबविण्याची विनंती केली. त्यांची पद्धती देशाच्या उत्पादन क्षेत्राचे मोठे नुकसान करत असून त्यांनी निष्पक्ष स्पर्धा कायद्यांचे उल्लंघन रोखण्यासाठी अशा कंपन्यांसाठी कठोर नियम करण्याचे आवाहन केले. वाढत्या दबावानंतरही ॲमेझाॅन आणि फ्लिपकार्टने ई-कॉमर्सच्या वाढत्या प्रवेशामुळे व्यवसायात वाढ होत राहिली आहे.

ॲमेझाॅनने सांगितले की, ॲमेझाॅन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल २०२४ या वार्षिक सणासुदीच्या विक्रीदरम्यान १४० कोटी ग्राहकांनी संकेतस्थळाला एकूण भेट दिली. तर फ्लिपकार्टसाठी सणासुदीच्या काळात २०२४ मध्ये ७२० कोटी ग्राहकांनी संकेतस्थळाला भेट झाली.

दर्जाहीन कृत्रिम वाळूवर टाच! एम-सँड धोरणात मोठी सुधारणा; अंमलबजावणीचे अधिकार शासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांना; निर्णय जारी

Mumbai News : मध्य आणि पश्चिम रेल्वेवर BMC मेहेरबान; रेल्वेकडे ५०० कोटी रुपयांचे पाणी बिल थकीत!

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या निधीची चौकशी होणार; राज्य सरकारकडून निधी तपासण्याचे आदेश

महाराष्ट्राचे स्वप्न साकार झाले; ठाण्यातील ‘त्या’ फलकाची चर्चा!

कर्नाटकमधील सिद्धरामय्या सरकारला हायकोर्टाचा दणका; ‘आरएसएस’ला लक्ष्य करण्याच्या निर्णयाला स्थगिती