बिझनेस

सोने चांदीच्या दरात घसरण; सोने ७००, तर चांदी २ हजारांनी स्वस्त

जागतिक बाजारात मौल्यवान धातूंच्या दरात घसरण झाल्याने सोमवारी राष्ट्रीय राजधानीत सोन्याचा भाव ७०० रुपयांनी घसरून ७३,५०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला.

Swapnil S

नवी दिल्ली : जागतिक बाजारात मौल्यवान धातूंच्या दरात घसरण झाल्याने सोमवारी राष्ट्रीय राजधानीत सोन्याचा भाव ७०० रुपयांनी घसरून ७३,५०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. शुक्रवारी हा दर ७४,२०० रुपये प्रति १० ग्रॅम होता. अखिल भारतीय सराफा असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, औद्योगिक युनिट्स आणि नाणे निर्मात्यांच्या कमी मागणीमुळे सोमवारी सोन्याचा मागोवा घेत चांदीचे भाव २ हजार रुपये प्रति किलोग्रामने घसरून ८३,८०० रुपये झाले. मागील सत्रात चांदीचा भाव ८५,८०० रुपये प्रति किलो होता. दरम्यान, ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भावही ५०० रुपयांनी घसरून ७३,८५० रुपयांवरून ७३,३५० रुपये प्रति १० ग्रॅम झाला.

जागतिक स्तरावर कॉमेक्स सोने ०.०७ टक्क्यांनी घसरून २,५२२.९० अमेरिकन डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत होते. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा भाव किरकोळ वाढून २८.४४ डॉलर प्रति औंस होता, असे एचडीएफसी सिक्युरिटीजमधील कमोडिटीजचे वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी यांनी सांगितले.

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता