बिझनेस

सोने ३,५०० डॉलर प्रति औंसपर्यंत वाढण्याचा अंदाज

जर सोन्याची बिगर-व्यावसायिक खरेदी १० टक्क्यांनी वाढली, तर पुढील १८ महिन्यांत सोन्याच्या किमती १६ टक्क्यांनी वाढून ३,५०० अमेरिकन डॉलर प्रति औंसपर्यंत वाढू शकतात, असे बँक ऑफ अमेरिका (BofA) ने आपल्या एका संशोधन अहवालात हा दावा केला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : जर सोन्याची बिगर-व्यावसायिक खरेदी १० टक्क्यांनी वाढली, तर पुढील १८ महिन्यांत सोन्याच्या किमती १६ टक्क्यांनी वाढून ३,५०० अमेरिकन डॉलर प्रति औंसपर्यंत वाढू शकतात, असे बँक ऑफ अमेरिका (BofA) ने आपल्या एका संशोधन अहवालात हा दावा केला आहे. यासोबतच एप्रिलमध्ये होणाऱ्या पतधोरण धोरण समितीच्या (एमपीसी) बैठकीत आरबीआय पुन्हा एकदा रेपो दर कमी करू शकते, असेही अहवालात म्हटले आहे.

अहवालानुसार, सोन्यातील गुंतवणुकीत थोडीशी वाढही या वर्षी सोन्याच्या किमतीवर मोठा परिणाम करू शकते. जर गुंतवणुकीची मागणी फक्त १ टक्क्यांनी वाढली तर २०२५ मध्ये सोने सरासरी ३,००० अमेरिकन डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचू शकते. तसेच बिगर व्यावसायिक खरेदी १० टक्क्यांनी वाढल्यास, येत्या १८ महिन्यांत सोने अंदाजे ३,५०० अमेरिकन डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचू शकते, असे अहवालात म्हटले आहे.

अहवालात महटल्याप्रमाणे सोन्याच्या किमती ३,५०० डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचण्यासाठी, गुंतवणुकीची मागणी १० टक्क्यांनी वाढणे आवश्यक आहे, जे आव्हानात्मक आहे. परंतु अशक्य नाही. किमती वाढण्याची काही कारणेही अहवालात देण्यात आली आहेत. अहवालानुसार, सोन्याच्या किमती वाढण्यावर परिणाम करणारा एक प्रमुख घटक म्हणजे चीनचा विमा उद्योग, जो आपल्या मालमत्तेच्या १ टक्के सोन्यात गुंतवणूक करू शकतो. ही रक्कम एकूण वार्षिक सोन्याच्या बाजाराच्या सुमारे ६ टक्के इतकी असेल.

अहवालानुसार, जगभरातील केंद्रीय बँकांच्या साठ्यात सध्या सुमारे १० टक्के सोने आहे. त्यांचा पोर्टफोलिओ अधिक कार्यक्षम करण्यासाठी ते त्यांच्या सोन्याचा साठा ३० टक्क्यांनी वाढवू शकतात. मध्यवर्ती बँकांनी अशी रणनीती स्वीकारल्यास मौल्यवान धातूच्या मागणीत लक्षणीय वाढ होऊ शकते. किरकोळ गुंतवणूकदारही सोन्याची मागणी वाढवण्यात भूमिका बजावत असल्याचे अहवालात म्हटले आहे. यूएस, युरोप आणि आशियामध्ये फिजिकल बॅक्ड गोल्ड एक्स्चेंज-ट्रेडेड फंड (ईटीएफ) मधील व्यवस्थापनाखालील मालमत्तेमध्ये वार्षिक ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यावरून असे दिसून येते की अधिक वैयक्तिक गुंतवणूकदार सोन्यात त्यांची गुंतवणूक वाढवत आहेत.

गुंतवणूकदारांची खरेदी हे सोन्याच्या किमतीवर परिणाम करणारे मूलभूत घटक आहेत. गुंतवणुकीची मागणी वाढत राहिल्यास येत्या काही महिन्यांत सोन्याचे भाव मजबूत राहू शकतात, असे अहवालात सुचवण्यात आले आहे.

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांचे आक्रमक भाषण; म्हणाले ''हिंदू आणि हिंदुस्थान मान्य आहे; पण हिंदीची सक्ती मान्य नाही!''

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

दोघा पुतण्यांचे हात धरून सुप्रिया सुळेंनी काकांच्या शेजारी केलं उभं; पहा Video

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल