Republic Day Alert: '२६-२६' कोडमुळे देशभरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क; गुप्तचर यंत्रणेकडून दहशतवादी हल्ल्याचा इशारा

काही संशयास्पद ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर वारंवार दिसणाऱ्या '२६-२६' या गूढ कोडमुळे देशभरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
Republic Day Alert:  '२६-२६' कोडमुळे देशभरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क; गुप्तचर यंत्रणेकडून दहशतवादी हल्ल्याचा इशारा
Published on

नवी दिल्ली : काही संशयास्पद ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर वारंवार दिसणाऱ्या '२६-२६' या गूढ कोडमुळे देशभरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. हा कोड २६ जानेवारी २०२६, म्हणजेच प्रजासत्ताक दिनाशी संबंधित असण्याची शक्यता सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे दिल्लीसह देशातील महत्त्वाच्या धार्मिक आणि संवेदनशील ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या गुप्तचर माहितीनुसार, पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांकडून संभाव्य हल्ल्याचा धोका असल्याने भारतीय यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारतीय सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केल्यानंतर जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा या संघटनांचे नेते भडकवणारे भाषण देत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सूडहल्ल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Republic Day Alert:  '२६-२६' कोडमुळे देशभरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क; गुप्तचर यंत्रणेकडून दहशतवादी हल्ल्याचा इशारा
Mira Bhayandar Protest : "जाणीवपूर्वक मोर्चाचा मार्ग..."; फडणवीसांनी सांगितलं मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारण्याचं कारण

दिल्ली मुख्य लक्ष्य, आयएसआयचा सहभाग असल्याचा संशय

अलर्टनुसार, पाकिस्तान अधिकृत काश्मीरमधील अनेक दहशतवादी गटांना पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय (ISI) मदत करत असल्याचा संशय आहे. हे गट एकाच वेळी देशातील मोठ्या शहरांमध्ये हल्ले करण्याचा कट रचत असल्याची माहिती आहे. यामध्ये दिल्ली हे प्रमुख लक्ष्य असू शकते.

तसेच, पंजाबमधील काही गँगस्टर्स आणि दहशतवादी संघटनांमध्ये नवीन साखळी तयार झाल्याचा इशाराही गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे.

‘फाल्कन स्क्वाड’ची उघड धमकी

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, काश्मीरमधील कट्टरतावादी संघटना ‘फाल्कन स्क्वाड’नेही भारताला धमकी दिली आहे. ‘Kashmir Fights Falcon X’ या एन्क्रिप्टेड सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय असलेल्या या गटाने, “आमची मालमत्ता जप्त केली तर गंभीर परिणाम होतील. प्रजासत्ताक दिनाच्या आसपास मोठी कारवाई केली जाईल,” असा इशारा दिला आहे.

Republic Day Alert:  '२६-२६' कोडमुळे देशभरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क; गुप्तचर यंत्रणेकडून दहशतवादी हल्ल्याचा इशारा
तपासणीच्या बहाण्याने विमानतळ कर्मचाऱ्याचे कोरियन महिलेसोबत अश्लील कृत्य; पुरुषांच्या वॉशरूमजवळ घेऊन गेला अन्...

जैशचे सोशल मीडिया हँडल सक्रिय

जैश-ए-मोहम्मदकडून चालवले जाणारे ‘इस्लाह-ए-उम्मत’ नावाचे सोशल मीडिया अकाउंट सध्या सक्रिय असून, युवकांना चिथावणी देण्याचे काम करत असल्याचे गुप्तचर अहवालात नमूद केले आहे. या माध्यमातून संवेदनशील ठिकाणांवर हल्ल्याचे आवाहन केले जात असल्याची माहिती आहे.

२६-२६ म्हणजे नेमकं काय?

गुप्तचर यंत्रणांच्या मते, '२६-२६' हा कोड २६ जानेवारी २०२६ शी संबंधित असून ऑपरेशन सिंदूरच्या हल्ल्याचा बदला, भारताच्या अफगाणिस्तान आणि बलूचिस्तान मुद्द्यांवरील भूमिकेला प्रत्युत्तर आणि मोठ्या प्रमाणावर समन्वित दहशतवादी हल्ल्याचा कट यांसाठी असू शकतो.

माहितीनुसार, प्रजासत्ताक दिनाच्या सुरक्षेसाठी सध्या दिल्ली, अयोध्या, राम मंदिर परिसर, विमानतळे, सरकारी इमारती आणि इतर संवेदनशील ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in