बिझनेस

धनत्रयोदशीपूर्वी सोन्याची विक्रमी झेप; २०२६ पर्यंत दर १.५ लाखांवर जाण्याची शक्यता, तज्ज्ञांचा अंदाज

सणासुदीच्या दिवसांमध्ये सोन्याचा भाव अक्षरशः 'सोन्यावाणी' वाढत आहे. धनत्रयोदशीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या बाजारात विक्रमी तेजी पाहायला मिळत आहे.

नेहा जाधव - तांबे

सणासुदीच्या दिवसांमध्ये सोन्याचा भाव अक्षरशः 'सोन्यावाणी' वाढत आहे. धनत्रयोदशीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या बाजारात विक्रमी तेजी पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर डिसेंबर करारासाठी सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमसाठी तब्बल १,२२,२८४ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तज्ज्ञांचा अंदाज आहे, की धनत्रयोदशीच्या सुमारास हा भाव १.३ लाखांच्या वर जाऊ शकतो. एवढंच नाही, तर २०२६ च्या सुरुवातीस तो तब्बल १.५ लाख प्रति १० ग्रॅमपर्यंत झेप घेऊ शकतो, असा अंदाज जागतिक ब्रोकरेज संस्था आणि बाजारतज्ज्ञांनी वर्तवला आहे.

दरवर्षीप्रमाणेच या वर्षीही धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या काळात सोन्याच्या खरेदीला वेग आला आहे. परंतु, अर्थतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार यंदा जागतिक आर्थिक अस्थिरता, मध्यवर्ती बँकांकडून जोरदार खरेदी आणि व्याजदर कपातीची अपेक्षा या घटकांमुळे किमतींमध्ये नेहमीपेक्षा अधिक वाढ झाली आहे.

'गोल्ड'चा रॉकेट स्पीड

गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या किंमतींनी अक्षरशः रॉकेट स्पीड घेतला आहे. जागतिक स्तरावर शुक्रवारी स्पॉट गोल्डने प्रति औंस ४,०६० डॉलर्सचा विक्रमी उच्चांक गाठला. जो सलग आठव्या आठवड्यात वाढला. तर चांदीही १.१% वाढून ५१ डॉलर्स प्रति औंसवर पोहोचली. MCX वरील व्यवहारातही सोन्याचे डिसेंबर फ्युचर्स १.६२% वाढून १,२३,३१३ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले, तर चांदीच्या किंमती ३.४४% वाढून १,५१,५७७ रुपये प्रति किलोवर गेल्या आहेत.

गुंतवणूकदारांसाठी सोन्यावाणी संधी

कमकुवत होत चाललेला अमेरिकन डॉलर, जागतिक राजकीय अस्थिरता, आणि कमी व्याजदर यामुळे गुंतवणूकदार सोन्यात अधिक गुंतवणूक करत आहेत. गोल्ड ईटीएफमधील वाढलेली गुंतवणूकही या तेजीला चालना देत आहे. धनत्रयोदशीच्या खरेदीसाठी बाजार सज्ज आहे आणि सोन्याच्या दागिन्यांपासून नाण्यांपर्यंत सर्वत्र ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे. या वर्षीची धनत्रयोदशी गुंतवणूकदारांसाठी खऱ्या अर्थाने 'सुवर्णसंधी' ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.

नवी मुंबई विमानतळावर प्रवासी चाचणी यशस्वी; २५ डिसेंबरपासून उड्डाणांना हिरवा कंदील

आंध्रात ‘दितवाह’ चक्रीवादळामुळे जोरदार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा इशारा

संसदेचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार; ‘एसआयआर’वरील चर्चेवर विरोधक ठाम

मुंबईच्या अतिखराब हवेला बांधकाम, वाहन प्रदूषण जबाबदार; IIT चे हवामान शास्त्रज्ञ अंशुमन मोदी यांचा आरोप

राज्यात २० जिल्ह्यांतील नगर परिषद निवडणुका पुढे ढकलल्या; नव्याने अर्ज दाखल करण्याची मुभा, सुधारित कार्यक्रमानुसार २० डिसेंबरला मतदान