प्रातिनिधिक फोटो
बिझनेस

Gold Rate: सोने ७०० रुपयांनी वाढून ७६,४०० रुपये; सलग सहाव्या दिवशी तेजी

देशाच्या राजधानीत बाजारात सलग सहाव्या सत्रातील वाढीमुळे गुरुवारी ९९.५ टक्के शुद्ध सोन्याचा भाव ७०० रुपयांनी वाढून ७६,४०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला.

Swapnil S

नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत बाजारात सलग सहाव्या सत्रातील वाढीमुळे गुरुवारी ९९.५ टक्के शुद्ध सोन्याचा भाव ७०० रुपयांनी वाढून ७६,४०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. मागील सत्रात हा दर ७५,७००रुपये प्रति १० ग्रॅम ​​होता, असे ऑल इंडिया सराफा असोसिएशनने म्हटले. मात्र, चांदीचा भाव मागील सत्रातील ९४,४०० रुपयांवरून ४०० रुपयांनी घसरून ९४ हजार रुपये प्रतिकिलो झाला.

स्थानिक ज्वेलर्सकडून होत असलेल्या सततच्या खरेदीमुळे सोन्याचे भाव वाढले, असे असोसिएशनने म्हटले आहे. रुपयातील कमजोरीमुळे सोन्याचे दर वाढण्यास हातभार लागला. तर परदेशी बाजारात कॉमेक्स सोन्याचा भाव प्रति औंस ६.९० टक्क्यांनी वाढून २,४६६.८० डॉलर प्रति औंस झाला. न्यूयॉर्कमध्ये चांदीचा भावही किरकोळ वाढून ३०.६६ डॉलर प्रति औंस झाला. गुरुवारी सोन्याचा व्यवहार सकारात्मक झाला. याव्यतिरिक्त, व्यापारी पुढील आठवड्यात सादर होणाऱ्या अर्थसंकल्पावर लक्ष ठेवून आहेत. सरकारकडून होऊ घातलेल्या संभाव्य नियामक बदलांवर लक्ष ठेवून आहेत, असे जतीन त्रिवेदी, व्हीपी संशोधन विश्लेषक - कमोडिटी आणि चलन, एलकेपी सिक्युरिटीज म्हणाले.

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

शिखर धवनला ED कडून समन्स; दोषी आढळल्यास माजी क्रिकेटपटूवर काय कारवाई होणार?

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

मुंबईची वाढती तहान भागवायला आणखी दोन धरणांचा प्रस्ताव

सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारला नोटीस; कॉ. पानसरे यांच्या कुटुंबीयांच्या याचिकेवर निर्देश